अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड ही आशियातील एक आघाडीची वैद्यकीय सेवा पुरविणारी मोठी कंपनी आहे. उच्च दर्जाची स्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि चिकित्सालये तसेच संपूर्ण देशात मेडिकल स्टोअर्सची शृंखला उघडणारी ही भारतातील किंबहुना आशियातील पाहिली कंपनी असेल. स्पेशालिटी हॉस्पिटल्स सुरू करण्यासाठी किंवा चालवण्यासाठी लागणारी माहिती तंत्रज्ञान सेवाही अपोलो पुरविते.  ‘३२० स्लाइस सी टी स्कॅनर’ सेवा पुरवणारी अपोलो ही देशातील पहिलीच कंपनी. अपोलो हॉस्पिटल्स समूहाची सध्या भारतात आणि भारताबाहेर सुमारे ५४ हॉस्पिटल्स (एकूण ८,५००बेड्स) असून अपोलो फार्मसी, वैद्यकीय बीपीओ, आरोग्य विमा आणि क्लिनिकल रिसर्च इत्यादी व्यवसायही कार्यरत आहेत. कंपनीने टान्झानिया सरकारशी २५० बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि विविध आरोग्यसेवा पुरविण्याचा करार केला आहे. २०१५ आथिक वर्षां अखेपर्यंत कंपनी आणखी १५ हॉस्पिटल्स (३१४० बेड्स) सुरू करेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षांसाठी ‘बेस्ट एशियन हॉस्पिटल मॅनेजमेंट अ‍ॅवॉर्ड’ मिळवणाऱ्या या कंपनीने नुकतीच कोलकाता आणि हैदराबाद येथे द विन्सी सी रोबटिक सिस्टीम कार्यरत केली. ३१ डिसेंबर २०१२ साठी संपणाऱ्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने उत्तम कामगिरी करून नक्त नफ्यात ५९% वाढ दाखविली आहे. ‘क्रिसिल’ या नामांकित पतमापन संस्थेने अपोलोचे मानांकन सर्वोत्तम म्हणजे ५/५ असे  वाढविले आहे. उत्तम प्रवर्तक, व्यवस्थापन आणि आíथक कामिगिरीचा चढता आलेख या तिन्ही बाबींमुळे अपोलो हॉस्पिटल हा एक उत्तम आणि आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय वाटतो.
अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड
प्रवर्तक                अपोलो समूह
सद्य बाजारभाव             रु. ८१३
प्रमुख व्यवसाय             वैद्यकीय सेवा
भरणा झालेले भाग भांडवल          रु. ६९.५६ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा              ३४.३५ %
पुस्तकी मूल्य :  रु. १८३.२             दर्शनी मूल्य : रु. ५
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस)        रु. २०.१
प्राइस अìनग गुणोत्तर    (पी/ई)        ४० पट
मार्केट कॅपिटलायझेशन        रु. १०,७४५ कोटी
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक     :     रु. ९०३ / रु. ५५३
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
 
प्रवर्तक    ३४.३५  
परदेशी गुंतवणूकदार    ३८.२८       
बँका / म्युच्युअल फंडस्    २.५४  
सामान्यजन  व इतर    २४.८३