एचआयएल म्हणजे पूर्वाश्रमीची हैदराबाद इंडस्ट्रीज लिमिटेड. १९४६ मध्ये स्थापन झालेली सी के बिर्ला समूहाची ही ध्वजाधारी अग्रेसर कंपनी. मुख्यत्वे फायबर सीमेंट शीट्स, एरोकॉन प्रीफॅब पॅनल्स आणि एएसी ब्लॉक्सचे उत्पादन ही कंपनी करते. भारतात कंपनीची १२ उत्पादन केंद्रे असून पाच मुख्य विपणन कार्यालये आहेत. ‘चार मिनार’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या सीमेंट पत्रे (शीट्स) प्रामुख्याने इंडस्ट्रियल शेड्स, पोल्ट्री फाम्र्स, गॅरेज, ओसरी, गोदामे आदींच्या छपरांसाठी वापरली जातात. तर एरोकॉन पॅनल्स मुख्यत्वे पार्टशिन्स, पोटमाळे इ. कारणांसाठी वापरली जातात. गेल्या आíथक वर्षांत सुमार कामगिरी करणाऱ्या या कंपनीने यंदाच्या आíथक वर्षांत मात्र उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. गत वर्षीच्या तुलनेत कंपांनीच्या उलाढालीत २७% वाढ होऊन ती १,१०७.८ कोटीवर गेली आहे तर नक्त नफ्यात तब्बल ७०८% इतकी घसघशीत वाढ होऊन तो ६९.३ कोटींवर गेला आहे. सध्याच्या म्हणजे आíथक वर्ष २०१५-१६ साठी देखील कंपनीकडून अशीच उत्तम कामगिरी अपेक्षित आहे. सध्या ९२.९ रुपये प्रति समभाग उत्पन्न असलेल्या या स्मॉल कॅप कंपनीचे प्राइस अìनग गुणोत्तर इतर कंपन्यांच्या तुलनेत (सरासरी १२.४ पट) खूपच कमी असल्याने हा शेअर ६५० च्या भावात सुद्धा आकर्षक वाटतो. वर्षभरात २०% परतावा मिळायला हरकत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2015 रोजी प्रकाशित
वर्षभरात २० टक्के परतावा नक्कीच!
एचआयएल म्हणजे पूर्वाश्रमीची हैदराबाद इंडस्ट्रीज लिमिटेड. १९४६ मध्ये स्थापन झालेली सी के बिर्ला समूहाची ही ध्वजाधारी अग्रेसर कंपनी.

First published on: 18-05-2015 at 01:05 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hil limited