लवासा प्रकल्पामुळे वादात सापडलेल्या, गेली दोन वष्रे नुकसानीत असलेल्या आणि कर्जाचा प्रचंड बोजा असणाऱ्या िहदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (एचसीसी)चा शेअर गुंतवणुकीसाठी सुचविल्यामुळे अनेक जाणकार गुंतवणूकदारांच्या भुवया उंचावल्या असतील. परंतु लेखात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सध्या तेजीच्या वातावरणात काही शेअर्सना झळाळी येण्याची शक्यता आहे. त्यातील एक एचसीसी आहे. गेल्या तीन महिन्यांत २१७० कोटींची कंत्राटे मिळविणाऱ्या या कंपनीला नुकतेच दिल्ली मेट्रोचेही सुमारे ३०० कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. डिसेंबर २०१३अखेर समाप्त तिमाहीसाठी एचसीसीने ५.४ कोटी रुपयांचा नफा कमावून गुंतवणूकदारांना सुखद धक्काही दिला आहे. एचसीसीचा महत्त्वाकांक्षी असा लवासा प्रकल्प रखडला असला तरीही आता परिस्थिती निवळली असून येत्या दोन वर्षांत कंपनी या प्रकल्पात निर्गुतवणूक करू शकेल अशी अपेक्षा आहे. लवासा प्रकल्पात अडकल्याने तसेच गेल्या दोन वर्षांतील मंदीमुळे कंपनीवरील कर्जाचा डोंगर मोठा झाला आहे. गेली दोन वर्षे कंपनी नुकसानीतही आहेच. मात्र तरीही येत्या अर्थसंकल्पात कुठेलेही सरकार आले तरीही इन्फ्रास्ट्रक्चरवर भर द्यावाच लागेल. एचसीसी ही या क्षेत्रातील जुनी, नावाजलेली आणि बऱ्यापकी मोठी कंपनी असल्याने तेजीचा फायदा नक्कीच होईल. गेले काही दिवस रोज नवा उच्चांक गाठणारा हा हाय बीटा शेअर एक डार्क हॉर्स म्हणून सुचवत आहे. लागला तर तुम्हाला ५०% फायदा मिळवून देऊ शकेल. अशा शेअरच्या खरेदीला स्टॉप लॉस मात्र हवाच.
अनाहूत टिप्सपासून सावध!
ल्ल सध्या शेअर बाजारातील तेजीचे वातावरण पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना आकर्षति करणारे आहे. आम्ही शेअर चढय़ा भावात घेतो आणि शेवटी कंटाळून नुकसानीत विकतो. अनेकदा फटका खाऊनसुद्धा आमच्यात सुधारणा नाहीच. सध्याची तेजी कितपत खरी आहे याचाही अभ्यास करून मगच गुंतवणुकीचे निर्णय घ्यायला हवेत. आपली गुंतवणूक अशी हवी की बाजारात मंदी आली तरीही आपल्याला जास्त नुकसान होता कामा नये. म्हणूनच फंडामेंटल्स महत्त्वाचे. खरं तर गेल्या दोन महिन्यांत विशेष असं काहीच घडलेलं नाही की ज्यामुळे कंपन्यांचे फंडामेंटल्स अचानक बदलतील. परंतु राजकीय परिस्थिती बदलेल या आशेवर शेअर बाजारात सध्या खूपच उत्साही वातावरण आहे. अगदी हवा तसा सत्ताबदल झाला तरीही रातोरात आíथक परिस्थितीत कुठलाही बदल होणे शक्य नाही आणि पुन्हा एकदा सत्ताकेंद्री कडबोळं झालं तर विचारायलाच नको. म्हणूनच गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेऊन वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यावेत, पण डुबकी मारू नये. अशाच वेळी कधीही न ऐकलेल्या कंपन्यांची नावे बाजारात फिरू लागतात, नव्या टिप्स अनाहूत मिळू लागतात आणि शेअर बाजाराला जुगार समजणारी मंडळी पुन्हा शेअर बाजाराकडे आकर्षति होतात. लार्जकॅपवरून पेनी स्टॉकवर साधा गुंतवणूकदार सहज वळतो आणि मग अडकून पडतो. १-२ रुपयांना मिळणारे शेअर्स आता या तेजीत अचानक वाढताना दिसतील. ज्या गुंतवणूकदारांना धोका घ्यायला आवडतो त्यांना ही सुवर्णसंधीच आहे. ज्यांची गुंतवणूक बराच काळ नुकसानीत होती त्यांनाही आता बाहेर पडायची संधी आहे. परंतु तेजीतच सावधानता महत्त्वाची हे लक्षात ठेवायलाच हवे.
(वाचकांनी लेख कसा वाटला किंवा शंका असल्यास जरूर कळवाव्यात. परंतु कृपया वैयक्तिक प्रश्न वा सल्ला विचारू नये, ही पुन्हा नम्र विनंती)

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
hearing in bombay high court after two years in pmc bank scam
पीएमसी बँक घोटाळ्यात दोन वर्षांनंतर आज सुनावणी
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका