अनाहूत टिप्सपासून सावध!
ल्ल सध्या शेअर बाजारातील तेजीचे वातावरण पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना आकर्षति करणारे आहे. आम्ही शेअर चढय़ा भावात घेतो आणि शेवटी कंटाळून नुकसानीत विकतो. अनेकदा फटका खाऊनसुद्धा आमच्यात सुधारणा नाहीच. सध्याची तेजी कितपत खरी आहे याचाही अभ्यास करून मगच गुंतवणुकीचे निर्णय घ्यायला हवेत. आपली गुंतवणूक अशी हवी की बाजारात मंदी आली तरीही आपल्याला जास्त नुकसान होता कामा नये. म्हणूनच फंडामेंटल्स महत्त्वाचे. खरं तर गेल्या दोन महिन्यांत विशेष असं काहीच घडलेलं नाही की ज्यामुळे कंपन्यांचे फंडामेंटल्स अचानक बदलतील. परंतु राजकीय परिस्थिती बदलेल या आशेवर शेअर बाजारात सध्या खूपच उत्साही वातावरण आहे. अगदी हवा तसा सत्ताबदल झाला तरीही रातोरात आíथक परिस्थितीत कुठलाही बदल होणे शक्य नाही आणि पुन्हा एकदा सत्ताकेंद्री कडबोळं झालं तर विचारायलाच नको. म्हणूनच गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेऊन वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यावेत, पण डुबकी मारू नये. अशाच वेळी कधीही न ऐकलेल्या कंपन्यांची नावे बाजारात फिरू लागतात, नव्या टिप्स अनाहूत मिळू लागतात आणि शेअर बाजाराला जुगार समजणारी मंडळी पुन्हा शेअर बाजाराकडे आकर्षति होतात. लार्जकॅपवरून पेनी स्टॉकवर साधा गुंतवणूकदार सहज वळतो आणि मग अडकून पडतो. १-२ रुपयांना मिळणारे शेअर्स आता या तेजीत अचानक वाढताना दिसतील. ज्या गुंतवणूकदारांना धोका घ्यायला आवडतो त्यांना ही सुवर्णसंधीच आहे. ज्यांची गुंतवणूक बराच काळ नुकसानीत होती त्यांनाही आता बाहेर पडायची संधी आहे. परंतु तेजीतच सावधानता महत्त्वाची हे लक्षात ठेवायलाच हवे.
(वाचकांनी लेख कसा वाटला किंवा शंका असल्यास जरूर कळवाव्यात. परंतु कृपया वैयक्तिक प्रश्न वा सल्ला विचारू नये, ही पुन्हा नम्र विनंती)
अनपेक्षित विजेता!
लवासा प्रकल्पामुळे वादात सापडलेल्या, गेली दोन वष्रे नुकसानीत असलेल्या आणि कर्जाचा प्रचंड बोजा असणाऱ्या िहदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (एचसीसी)चा शेअर गुंतवणुकीसाठी सुचविल्यामुळे अनेक जाणकार गुंतवणूकदारांच्या भुवया उंचावल्या असतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-04-2014 at 01:09 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindustan construction company ltd