portfolioपोर्टफोलियोमध्ये नेहमी चांगली तरलता (लिक्विडिटी) असलेले शेअर्स ठेवावेत असं म्हणतात. परंतु उत्तम नियोजनामुळे जेव्हा तुम्हाला पशांची चणचण नाही अशी परिस्थिती असेल तेव्हा काही चांगले शेअर्स भले ते लिक्विड नसले तरीही ठेवायला हरकत नाही. दीर्घ मुदतीत असे स्मॉल कॅप तुम्हाला बऱ्यापकी फायदा मिळवून देऊ शकतात. अशा शेअर्सच्या बाजारभावात  चढ उतारही मोठय़ा प्रमाणात होत असल्याने असे शेअर्स अशाच गुंतवणूकदारांसाठी असतात जे हा धोका पत्करू शकतात.
av-01िहदुस्तान कम्पोझिट्स म्हणजे पूर्वाश्रमीची िहदुस्तान फेरोडो. भारतात गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या या कंपनीला अनेक प्रकारच्या उद्योगांना पूरक उत्पादने उत्पादित, विकसित आणि विपणन करण्याचे जनक मानले जाते. यात प्रामुख्याने फ्रिक्शन शीट्स, ब्रेक लाइिनग्स, डिस्क ब्रेक पॅड, रेल्वे ब्रेक ब्लॉक्स, रोल लाइिनग्स, क्लच फेसिंग्ज्स इ. अनेक उत्पादनांचा समावेश होतो. ही उत्पादने केवळ वाहन उद्योगच नव्हे तर इंजीनीिरग, खाणकाम, रेल्वे, रसायने, पेट्रोकेमिकल्स, पोलाद, इलेक्ट्रिकल, ऊर्जा निर्मिती, खत प्रकल्प, जहाज बांधणी, तेल उत्खनन अशा अनेक उद्योगांना पूरक आहेत.
केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील सुमारे ३० देशांना निर्यात करणाऱ्या या कंपनीने गेल्या काही वर्षांत सातत्याने उत्तम कामगिरी करून भागधारकांना चांगला फायदाही करून दिला आहे. डिसेंबर २०१४ अखेर समाप्त तिमाहीसाठीचे कंपनीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७.५६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६.०७ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. तर यंदाच्या नऊमाहीसाठी १०९.७२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १७.७६ कोटी रूपयांचा नक्त नफा कमवला आहे.
केवळ ४.९२ कोटी रुपये भागभांडवल असलेल्या आणि शून्य कर्ज भार असलेल्या या कंपनीचे सध्याचे प्रति समभाग उत्पन्न ३६.०९ रुपये आहे तर १०६५ रुपये पुस्तकी मूल्य आहे. सध्या वाहन उद्योग, ऊर्जा आणि अर्थात रेल्वे उद्योगाला चालना असल्याने येती दोन वष्रे कंपनीकडून भरीव कामगिरी अपेक्षित आहे. उत्तम कामगिरी करत असल्याने भागधारकांना बक्षीस समभागांची देखील अपेक्षा आहेच. अर्थात बक्षीस समभाग मिळोत व ना मिळोत पुस्तकी मूल्याला उपलब्ध असणाऱ्या या गुंतवणुकीत फायदाच होणार, म्हणूनच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा स्मॉल कॅप शेअर तुमच्या पोर्टफोलिओत हवाच.  
 stocksandwealth@gmail.com

Story img Loader