अनेक पगारदार व्यक्ती त्यांच्या आई, वडील, पत्नी, भाऊ-बहिण किंवा इतर व्यक्तींच्या मालकीच्या घरात रहात असतात. अशा व्यक्तींना जर घरभाडे भत्ता मिळत असेल तर प्राप्तिकर कायद्याच्या कलम १०(१३ अ) व नियम २ अ प्रमाणे घरभाडे भत्ता करमुक्त मिळण्यासंदर्भात तरतूद आहे.
पगाराच्या व्याख्येमध्ये बेसिक पगार आणि महागाई भत्ता या दोन रक्कमांचा समावेश केला जातो. एक उदाहरण घेऊन प्राप्तिकर नियोजनाद्वारे घरभाडे भत्ता करमुक्त कसा आणि किती मिळेल ते पाहूया:
समजा एखादी पगारदार व्यक्ती मुंबई शहरात त्याच्या वडिलांच्या नावावर मालकी असलेल्या जागेमध्ये राहात आहे. या व्यक्तीला बेसिक पगार आणि महागाई भत्ता मिळून वार्षकि 5 लाख रुपये पगार आहे. या व्यतिरिक्त या व्यक्तीला वार्षकि ५०,००० रुपये घरभाडे भत्ता मिळतो आहे.
या माहितीच्या आधारे हा घरभाडे भत्ता करमुक्त मिळण्यासाठी या व्यक्तीने काय करावे? तर ही व्यक्ती तिच्या वडिलांच्या नावे मालकी असलेल्या घरात राहात असल्याने त्या व्यक्तीने आपल्या वडिलांना दरमहा १०,००० रुपये म्हणजे वार्षकि १,२०,००० रुपये घरभाडे द्यावे. त्याची रीतसर भाडे पावती आपल्या नोकरीच्या ठिकाणी कार्यालयाच्या संबंधित खात्याला सादर करावी. काही कंपन्या भाडे पावतीसोबत, पगारदार व्यक्ती आणि ज्याला घरभाडे दिले जात आहे त्या व्यक्तीबरोबर झालेल्या करारपत्राची प्रत सादर करावयास सांगू शकतात. पण CBDT circular No 798 dated 30/10/2000 प्रमाणे दरमहा ३,००० रुपयापर्यंत घरभाडे भत्ता मिळत असेल अशा व्यक्तींनी भाडे पावती संबंधित खात्याला सादर केली नाही तरी चालते. अर्थात प्राप्तिकर खात्याकडून जर रेग्युलर असेसमेंट (Regular Assessment) झाली तर त्याला अस्सेसिंग ऑफिसरकडे भाडे पावती सादर करावी लागते.
करमुक्त घरभाडे भत्त्याची मोजणी खालील प्रमाणे:
१. पगाराच्या ५०% एवढी रक्कम म्हणजे २,५०,००० रुपये किंवा
२. प्रत्यक्षात मिळालेला घरभाडे भत्ता म्हणजे ५०,००० रुपये किंवा
३. घरभाडे रक्कम वजा पगाराच्या १०% एवढी रक्कम म्हणजे १,२०,००० वजा ५०,००० म्हणजे ७०,००० रुपये.
या तीन रकमापकी सर्वात कमी रक्कम म्हणजे ५०,००० रुपये रक्कम करमुक्त मिळेल. म्हणजेच मिळालेला घरभाडे भत्ता संपूर्णपणे करमुक्त मिळेल.
पगारदारांचा घरभाडे भत्ता प्राप्तिकरमुक्त?
पगारदार व्यक्तींना मूळ वेतन आणि महागाई भत्ता याबरोबर इतर काही भत्ते मिळू शकतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-02-2015 at 01:02 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House rent allowance hra taxability calculation