आयसीआयसीआय बँकेबद्दल खरं तर काही सांगायची गरज नाही. मोठय़ा सरकारी बँकेप्रमाणेच देशव्यापी जाळे पसरलेली आणि जनतेचा विश्वास संपादन केलेली एक मोठी खाजगी बँक म्हणून ती आपणा सर्वाना परिचयाची आहे. खाजगी बँकापकी सर्वात मोठी बँक ही आहेच. शिवाय रिझव्‍‌र्ह बँकेने अलीकडेच स्टेट बँकेसह आयसीआयसीआय बँकेला धोरणात्मक महत्वाची (सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट) बँक म्हणून घोषित केले आहे. जून २०१५ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी बँकेने १५,८०२.४५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २,९७६.१६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत तो १२ % जास्त आहे. कमी होत असलेले अनुत्पादित कर्जाचे (एनपीए) प्रमाण, येत्या पत धोरणात व्याजदरात कपातीची शक्यता आणि यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जात वाढ होण्याची शक्यता, उत्तम व्यवस्थापन या सर्वच बाबींचा सकारात्मक परिणाम बँकेच्या कामगिरीवर होईल असे वाटते. सध्या बँकिंग समभागांमध्ये मंदीचे वातावरण आहे. आयसीआयसीआय बँकेचा शेअरही त्याला अपवाद न ठरता खालच्या पातळीवर उपलब्ध आहे. याच संधीचा फायदा घेऊन हा हाय बीटा शेअर आपल्या पोर्टफोलियोत सामावून घ्यावा. वर्षभरात २५% परतावा देऊ शकेल असा हा शेअर असला तरीही दीर्घकालीन गुंतवणूक म्हणूनच याकडे पाहावे. या खेरीज येस बँक, इंडसइंड बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक इ. बँकांचा देखील गुंतवणुकीसाठी जरूर विचार करावा.
stocksandwealth@gmail.com
सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icici bank ltd shares information