portfolioआदित्य बिर्ला समूहाची आयडिया सेल्यूलर ही एक दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून ती वाचकांना नवीन नसावी. भारतात दुसऱ्या क्रमांकाची जीएसएम तंत्रज्ञान सेवा पुरवठादार आयडियाकडे भारतात एकंदर २२ विभागात सेवा देण्याचे परवाने आहेत. मोबाइल सेवेव्यतिरिक्त कंपनी जीएसएम, जीपीएस, जीपीआरएस, कॉल कॉन्फरन्स तसेच व्यवसायानुसार आवश्यक त्या इतरही दूरसंचार av-03सेवा पुरवते. दूरसंचार क्षेत्रातील व्यवसायातील बाजारपेठेत २०१२च्या सुरुवातीला सुमोर १२.९% हिस्सा असलेल्या या कंपनीचा हिस्सा यंदा १७.१% वर गेला असून कंपनीचे गेल्या काही वर्षांतील उत्पन्न सरासरी वार्षकि १८.६% दराने वाढत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दूरध्वनी लहरींच्या लिलावाला नुकतीच मान्यता दिली आहे. त्याचा लाभ सर्व दूरसंचार कंपन्यांना होणार असला तरीही भारतीसारख्या मोठय़ा कंपन्या ९०० मेगाहर्ट्झसाठी लिलावात भाग घेणार नाही, असे दिसते. याचा अप्रत्यक्ष लाभ आयडियाला होईल. डिसेंबर २०१४ अखेरच्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात २१.२% वाढ झाली असून ते ६,६०७.७० कोटींवरून ८,०१० कोटींवर गेले आहे. तर नक्त नफ्यात तब्बल ६४% वाढ होऊन तो गत वर्षीच्या तुलनेत ४६७.७३ कोटीवरून ७६७ कोटींवर गेला आहे. गेल्या तिमाहीत कंपनीच्या प्रती ग्राहक उत्पन्नात १८.९% वाढ झाली असून हे उत्पन्न १७६ रुपयांवरून १७९ रुपये झाले आहे. तसेच प्रती मेगाबाइट उत्पन्नही सरासरी २६.५ पसेवरून २६.९ पसे झाले आहे. गेल्या दोन तिमाहीत झालेल्या नगदी नफ्यामुळे कंपनी आपले कर्ज कमी करू शकली. या क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत आयडियाचे डेट इक्विटी गुणोत्तर कमी आहे. गेल्या वर्षभरात आपल्या ग्राहक संख्येत २.१ कोटींची वाढ करून ती १५.५ कोटींवर नेणाऱ्या या कंपनीकडून यंदा अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.  
मध्यम ते दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठी जगातील सहाव्या क्रमांकाची आयडिया तुम्हाला किमान ३०% परतावा देऊ शकेल.
stocksandwealth@gmail.com

Story img Loader