अजय वाळिंबे

आयआयएफएल फायनान्स लिमिटेड  ही भारतातील एक आघाडीची बँकेतर वित्तीय कंपनी (एनबीएफसी) असून, मुख्यत्वे तिच्या सहाय्यक कंपन्यांसह कर्ज, गृह वित्त आणि सोने  गहाण ठेवण्याच्या व्यवसायात ती गुंतलेली आहे. कंपनी होम लोन, गोल्ड लोन, बिझनेस लोन, मायक्रो-फायनान्स, कॅपिटल मार्केट फायनान्स, वेल्थ मॅनेजमेंट, ब्रोकिंग आणि कन्स्ट्रक्शन फायनान्स इत्यादी विविध उत्पादनांचे विस्तृत गुच्छ प्रस्तुत करते.

Take stringent action against those who trouble harass industries Fadnavis directs police
द्योजकांना त्रास देणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
India Manufacturing PMI Hits Six-Month High in January
अर्थव्यवस्थेसाठी सुसंकेत, उत्पादन क्षेत्राला जानेवारीत दमदार गती; ‘पीएमआय’ सहा महिन्यांच्या उच्चांकी
builders January
वर्षाची सुरुवात बांधकाम व्यावसायिकांसाठी सकारात्मक, मागील १३ वर्षांतील जानेवारीमधील घरविक्रीचा उच्चांक
Increase in foreign direct investment in insurance sector in the budget
कीमत जो तुम चाहो
Tax Benefits For House Owners
Union Budget 2025 : दोन घरांचे मालक असणाऱ्यांना अर्थसंकल्पातून मोठी भेट, जाणून घ्या कशी मिळणार दोन्ही घरांवर कर सवलत
Budget 2025 IIT IIM MBBS seats
Budget 2025 : IIT च्या ६,५०० व वैद्यकीय महाविद्यालयांतील ७५,००० जागा वाढवणार! अर्थमंत्र्यांची घोषणा
dsp mutual funds
फंडांचा फंडा: डीएसपी मिड कॅप फंड

आयआयएफएल होम फायनान्स, आयआयएफएल समस्ता फायनान्स तसेच आयआयएफएल ओपन फिनटेक लिमिटेड या तिच्या उपकंपन्या आहेत. अनुभवी प्रवर्तक आणि संचालक मंडळ असलेल्या या कंपनीने सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत कंपनीच्या व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता (अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट – एयूएम) ५५,३०२ कोटींवर गेली असून त्यात  गृह कर्जाचा वाटा ३६ टक्के, गोल्ड लोनचा वाटा ३२ टक्के  तर बिझनेस लोनचा वाटा १४ टक्के आहे. जवळपास ९५ टक्के कर्ज रिटेल क्षेत्रात असून त्यापैकी ६९ टक्के कर्ज प्रायॉरिटी अर्थात प्राधान्य क्षेत्रातील ग्राहकांना कंपनीकडून वितरित केले गेले आहे. त्यामुळेच आयआयएफएलचे  कर्जवसुलीचे प्रमाण देखील चांगले आहे. सप्टेंबर २०२२ पर्यंत कंपनीचे अनुत्पादित कर्ज (एनपीए) केवळ १.२ टक्के  इतके आहे. आयआयएफएल होम फायनान्स ही कंपनीची गृह वित्त व्यवसाय कंपनी देखील उत्तम कामगिरी करत असून दोन महिन्यांपूर्वी आबूधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने  (आडिया)  या कंपनीत सुमारे २,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे कंपनीच्या नेट वर्थमध्ये ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या अफोर्डेबल अर्थात परवडणाऱ्या गृहनिर्माणाच्या योजना तेजीत असल्याने या गुंतवणुकीचा आयआयएफएलला मोठा फायदा होईल.  

कंपनीचे सप्टेंबर २०२२ साठी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचे तसेच पहिल्या सहामाहीचे लेखापरीक्षित आर्थिक निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या पहिल्या सहामाहीच्या कालावधीत कंपनीने २,४२१.५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७२६.८ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते अनुक्रमे ३७ टक्के व ४० टक्क्यांनी अधिक आहेत. ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीसाठी कंपनीचे एकूण सर्वसमावेशक उत्पन्न ४६ टक्क्यांनी वाढून ४२२ कोटींवर गेले आहे. तर करपश्चात निव्वळ नफा ३९७ कोटी रुपयांवर गेला आहे. मुख्य उत्पादनांमध्ये कर्जाची वाढ मजबूत होती – सुवर्ण कर्ज आणि गृहकर्ज अनुक्रमे ३१ टक्के आणि २५ टक्क्यांनी वाढले. मायक्रो-फायनान्स आणि व्यवसाय कर्ज अनुक्रमे ४९ टक्के आणि १४ टक्क्यांनी वाढले. गत वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत एकूण कोअर कर्ज पोर्टफोलिओ २८ टक्क्यांनी वाढला आणि नॉन-कोर (प्रामुख्याने बांधकाम आणि स्थावर मालमत्ता वित्तपुरवठा) पोर्टफोलिओ ९ टक्क्यांनी कमी झाला.

वित्तीय तसेच एनबीएफसी कंपन्यांना कोविडपश्चात पुन्हा एकदा बरे दिवस आले आहेत. इतर कंपन्यांच्या तुलनेत आयआयएफएलची कामगिरी सरस असून आगामी कालावधीत देखील कंपनीच्या कामगिरीत भरीव वाढ अपेक्षित आहे. सध्या ४०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर दोन वर्षांत उत्तम परतावा देऊ शकेल.

* दोन महिन्यांपूर्वी (सोमवार, १ ऑगस्ट २०२२) याच स्तंभातून सुचविलेल्या टीजीव्ही स्राक लिमिटेडचे समभाग मूल्य उत्तम आर्थिक निकालामुळे ३० टक्क्यांहून अधिक वर गेले आहे. गुंतवणूकदारांनी या समभागातील किमान ५० टक्के विक्री करून आपला नफा पदरात पडून घ्यावा.

आयआयएफएल फायनान्स (बीएसई कोड -५३२६३६)

शुक्रवारचा बंद भाव : रु.  ४११/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. ४१७/२६६

बाजार भांडवल : रु. १५,५९८ कोटी

भरणा झालेले भागभांडवल :. ७५.९५ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक २४.९०   

परदेशी गुंतवणूकदार      २५.५७

बँका/ म्यु. फंड/ सरकार   ३.४१

इतर/ जनता     ४६.१२

संक्षिप्त विवरण

* शेअर गट            :  लार्ज कॅप

* प्रवर्तक         :  निर्मल जैन

* व्यवसाय क्षेत्र :   एनबीएफसी

* पुस्तकी मूल्य  :      रु. २२०

* दर्शनी मूल्य    :   रु. २/-

* गतवर्षीचा लाभांश : १७५%

शेअर शिफारशीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :  ३५.३० रु.

*  पी/ई गुणोत्तर :       ११.६

*  समग्र पी/ई गुणोत्तर :        २५.१

*  डेट इक्विटी गुणोत्तर :       ३.७५

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :     १.५७

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : ११.३

*  बीटा :      ०.८   

सध्याची बाजारातील अनिश्चितता

पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. 

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

stocksandwealth@gmail.com

Story img Loader