वैभवी कुलकर्णी सप्टेंबर महिन्याच्या अतिथी विश्लेषकाच्या भूमिकेत आहेत. त्या ‘ब्लॅक ओशन कॅपिटल पार्टनर्स’ या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सल्लागार कंपनीच्या भागीदार आहेत. त्यांची कंपनी परदेशी परदेशी गुंतवणूकदारांना सेवा पुरविते.
अरिवद लिमिटेड ही ब्रॅण्डेड कापडाची प्रमुख उत्पादक व कापड विक्री दालनांची शृखला असलेली देशातील एक प्रमुख कंपनी आहे. तसेच डेनिम या कापड प्रकाराची जगातील सर्वात मोठी उत्पादक आहे. ‘अरिवद’चे प्रवर्तक लालभाई उद्योगसमूह आहे. ही भारतातील उत्पादन सुरु असलेली सर्वात प्राचीन म्हणजे अरिवदची ऐंशी वर्षांची जुनी कापड गिरणी आहे.
३० जून २०१४ रोजी कंपनीच्या भाग भांडवलात प्रवर्तकांचा वाटा ४३.४६ टक्के होता. सद्य आíथक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचे अरिवदचे निकाल उत्कृष्ट आहेत. निव्वळ नफ्यात ४२.१ टक्के वाढ झाली आहे. या कंपनीकडे अॅरो, ली, रँगलर, फ्लाइंग मशीन, न्यू पोर्ट, रफ अॅँड टफ, वंडर ब्रा या जागतिक ब्रॅण्ड्सचे भारतातील उत्पादन व विक्रीचे हक्क आहेत.
कंपनी आपली कापड व तयार कपडे उत्पादने स्वत:च्या विक्री दालनांतून विकत आहे. ३१ जून २०१४ रोजी कंपनीच्या विक्री दालनांची  संख्या २४१ होती. या व्यवसायाला कंपनी लाइफस्टाइल स्टोअर्स असे संबोधते. कंपनीची उत्पादने पाच गटात विभागली आहेत. फॅब्रिक म्हणजे शर्ट व पॅन्टसाठीची कापडे; डेनिम म्हणजे जीन्ससाठीचे कापड; गारमेंट म्हणजे तयार कपडे जे कंपनी एखाद्या ब्रॅण्डने विकते. वोयल म्हणजे सूती साड्या व नीटेड म्हणजे अंतर्वस्त्रे व टी शर्ट असे हे पाच गट आहेत.
या व्यतिरिक्त अरिवद टेलिकॉम व अरिवद इन्फ्रास्ट्रक्चर्स या अनुक्रमे दूरसंचार व मालमत्ता विकास क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दोन उपकंपन्या आहेत. यापकी मालमत्ता विकासात असलेल्या अरिवद इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंपनीची स्वतंत्र कंपनी म्हणून शेअर बाजारात नोंदणी होणार आहे. अरिवदचे दहा समभाग असलेल्यास अरिवद इन्फ्रास्ट्रक्चर्सचा एक समभाग मोफत मिळणार आहे. आमच्या मते ही अतिशय सकारात्मक घटना आहे. यामुळे अरिवद ही प्रामुख्याने वस्त्रोद्योग व ब्रॅण्डस् वितरणाचे हक्क असलेली कंपनी असेल. अरिवद इन्फ्रास्ट्रक्चर्सचे एकूण ५३ लाख चौरस फूट बांधकाम असलेले विविध प्रकल्प सुरु आहेत. या मालमत्ता एक तर अरिवद इन्फ्रास्ट्रक्चर्स स्वत: विकसित करत आहेत किंवा हे प्रकल्प संयुक्तरित्या भागीदारीने विकसित होत आहेत. या प्रकल्पातून पुढील पाच वष्रे दरवर्षी १०० कोटी रुपये अरिवदला मिळणे अपेक्षित आहे.
एकूण व्यावसायिक पुनर्रचनेमुळे कंपनीचे दीर्घकालीन भवितव्य उत्तम असले तरी नजीकच्या काळातील काही प्रश्न दुर्लक्षून चालणार नाहीत. अरिवद ही कंपनी महत्वाची निर्यातदार आहे. रुपया सुदृढ होत असल्याने वस्रोद्योग व्यवसायातील नफ्याचे प्रमाण दीड ते अडीच टक्क्याने घटणे अपेक्षित आहे. कंपनीचा मेगा मार्ट व्यवसाय अजूनही तोट्यात असून मागील तिमाहीत या विभागांतून होणारी विक्री ३.५ टक्क्यांनी घटली. इतके असूनही अरिवदकडे असलेल्या जगातील वेगवेगळ्या ब्रॅण्ड्स वितरणाचे हक्क व भारतातील जनसंख्येत असलेले तरुणांचे प्रमाण पाहता अरिवदमध्ये गुंतवणूक करणे दीर्घकालीन फायद्याचे ठरेल याबद्दल शंका नाही.
महत्वाचा खुलासा :
विश्लेषकांनी त्यांच्या कंपनीकडून सल्ला घेणाऱ्या ग्राहकांना या कंपनीच्या समभागांत गुंतवणुकीची शिफारस केली आहे. त्यानुसार ‘हेज फंडां’कडून ही गुंतवणूक झालीही असेल किंवा भविष्यात ते गुंतवणूक करतील. यामुळे या कंपनीच्या समभागांच्या किंमतीत वाढ होणे हे विश्लेषकाच्या स्वारस्याचे ठरू शकते, याची वाचकांनी दखल घ्यावी.     

Story img Loader