मे महिन्याच्या अतिथी विश्लेषक आहेत प्राची अशोक जोशी. त्यांनी पुणे विद्यापीठातून धातूशास्त्र या विषयात बीईची पदवी घेतल्यावर काही काळ पुणे येथील टाटा मोटर्सच्या कारखान्यात अनुभव घेतला. त्या एक्सएलआरआय जमशेदपूर या संस्थेतून एमबीए झाल्या असून, त्या जेपी मॉर्गनच्या अ‍ॅसेट मॅनेजमेंट (एशिया) सिंगापूर येथे समभाग विश्लेषक होत्या. जेपी मॉर्गनमध्ये रुजू होण्यापूर्वी त्या एसबीआय म्युच्युअल फंड व आदित्य बिर्ला प्रायव्हेट इक्विटीमध्ये समभाग संशोधक म्हणून कार्यरत होत्या. ज्या कंपन्यांची उत्पादने औद्योगिक वापरासाठी (कल्ल४ि२३१्रं’ व२ी) आहेत अशा समभागांचा माग ही त्यांच्या एकूण नऊ वर्षांच्या समभाग संशोधन अनुभवाची खासियत आहे.
नॅनोसारख्या प्रवासी वाहनांपासून शेकडो टन वजनाची सागरी वाहतूक करणाऱ्या व्यापारी जहाजांना व युद्धात वापरल्या जाणाऱ्या तोफांपासून ते औष्णिक ऊर्जेसाठी वापरण्यात येणाऱ्या टर्बाईनमध्ये वापरले जाणारे अनेक सुटे भाग भारत फोर्ज तयार करते. कंपनीच्या उत्पादनात फेरस व नॉन फेरस या दोन्ही प्रकारच्या फोìजगचा समावेश होतो.
केवळ फोìजग क्षमतेच्या तुलनेत भारत फोर्ज समूहाकडे जगातील सर्वात मोठी क्षमता असलेली कंपनी आहे. कंपनीच्या उत्पादन क्षमता भारत, जर्मनी व स्वीडन या तीन देशांत आहेत. मागील भागात वाहन उद्योगात ‘क्रिटिकल कॉम्पोनंट’चे महत्त्व जाणून घेतले.
भारत फोर्ज ही व्यापारी वाहनांसाठी अनेक ‘क्रिटिकल कॉम्पोनंट’ तयार करते. जगभरात रस्त्यावर धावणारी पाचपकी तीन व्यापारी वाहने ही भारत फोर्जच्या सुटय़ा भागांवर चालतात. ‘फ्रंट अ‍ॅक्सेल’, ‘रेअर अ‍ॅक्सेल’, ‘कनेिक्टग रॉड’, ‘क्रँक शाफ्ट’ असे अनेक महत्त्वाचे सुटे भाग भारत फोर्ज तयार करते.
वाहन उद्योगावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून कंपनीने वाहन उद्योगाव्यतिरिक्त तेल व नसíगक वायू, हवाई वाहतूक, पवन ऊर्जा, खाणकाम, बांधकाम, अभियांत्रिकी अशा विविध उद्योगांसाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीसाठी सुटे भाग तयार करायला सुरुवात केली. याचे परिणाम गेल्या दोन तिमाहीपासून दिसायला लागले आहेत.
२००८ मध्ये १०० टक्के ऑटो क्षेत्राची पुरवठादार असलेल्या या कंपनीचा २०१४ मध्ये ७८ टक्के पुरवठा होणे अपेक्षित आहे. हे प्रमाण २०१८ पर्यंत ७० टक्क्यांहून कमी असेल. एकाच उद्योग क्षेत्रावर अवलंबून न राहण्याचे व जोखीम कमी करण्याचे धोरण भारत फोर्जने अवलंबिले आहे. याचाच हा एक भाग आहे.
भारत फोर्जने एका जागतिक प्रवासी वाहन उत्पादकाकडून आलेली एक मोठी मागणी नोंदली आहे. तसेच एका तेल व नसíगक वायू उत्खनन क्षेत्रातील कंपनीकडूनही दीर्घकालीन पुरवठय़ाचे कंत्राट मिळाले आहे.
कंपनीचे धोरण उच्च तंत्रज्ञान वापरून उत्पादित केलेल्या वस्तूंची निर्मिती असल्यामुळे या वस्तूंच्या उत्पादनातून मोठी नफाक्षमता गाठणे कंपनीला शक्य होणार आहे. कंपनीने आपल्या चीनमधील एफएडब्ल्यू भारत फोर्ज (चांगुम) या उपकंपनीतील ५१.८५ टक्के समभाग या संयुक्त प्रकल्पातील भागीदार कंपनीस विकून चीनमधील आठ वर्षांची भागीदारी संपुष्टात आणली आहे.

Story img Loader