प्रश्न: मी माध्यमिक शाळेत शिक्षक आहे. माझा प्राप्तिकर आर्थिक वर्ष २०१०-११ पासून दरवर्षी नियमित पगारातून कापला जातो. माझ्याकडे त्याचे फॉर्म १६ आहेत. तरीसुद्धा प्राप्तिकर विभागाकडून मला सूचना आली असून मला आर्थिक वर्ष २०१०-११, २०११-१२ आणि २०१२-१३ या तीन वर्षांचे अनुक्रमे ३,९७० रुपये, २,५०० रुपये आणि ६,५१० रुपये इतके कर मला भरावयाचा आहे असे दाखविले आहे. माझ्या कार्यालयाने उद्गम कर न भरल्याने हा कर भरणा करा अशी सूचना आली आहे. कार्यालयाने उद्गम कर न भरल्याचा फटका आम्ही कर्मचाऱ्यांनी सहन का करावा? मला या संबंधी काय करावे लागेल?

  • विवेक चव्हाण, शहापूर

(असाच प्रश्न श्री. हेमंत खैरनार यांनीही विचारला आहे.)

Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती
GST Council Meeting (1)
जीएसटी परिषदेची बैठक संपन्न! देशात काय स्वस्त, काय महागणार?
National Health Policy What percentage of expenditure from the public health fund from the budget
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, आरोग्यावर फक्त ४.९१ टक्के खर्च ; ‘कॅग’चे आरोग्य यंत्रणेवर ताशेरे
Supreme Court decision regarding credit card payments print eco news
क्रेडिट कार्ड देयकाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; थकबाकीचा भरणा उशिराने केल्यास वार्षिक ३० टक्के व्याजदराची मर्यादा रद्दबातल
Rupee continues to decline against US dollar
रुपयाची ८५ पार धूळदाण
gst on sin goods
‘पातकी वस्तूंवर ३५ टक्के दराने जीएसटी लादणे अविचारच’, स्वदेशी जागरण मंचाचा केंद्राला घरचा अहेर

उत्तर : ज्या कर्मचाऱ्यांचा उद्गम कर कापला गेला आहे त्याने फॉर्म १६ कार्यालयाकडे मागणे हा त्यांचा हक्क आहे. फॉर्म १६ कर्मचाऱ्याला देणे ही कार्यालयाची जबाबदारी आहे आणि विवरण पत्र भरणे ही कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. फॉर्म १६ जरी कर्मचाऱ्याला मिळाला नसला तरी विवरणपत्र वेळेवर दाखल करावे. काही वेळेला कार्यालयाने कर भरलेला नसल्यामुळे तो ‘फॉर्म २६ एएस’मध्ये दिसत नाही आणि अशा वेळेला आपल्याला कर भरावयाची सूचना येते. जर कार्यालयाने उद्गम कर कापला असेल आणि तो सरकारकडे जमा केला नसेल तर ही बाब प्राप्तिकर अधिकाऱ्याच्या नजरेस आणून दिली पाहिजे. हा उद्गम कर आपण आपल्या विवरणपत्रात दाखवा त्याचा दावा करा. हा दावा ग्राहय़ धरला जाणार नाही. कर्मचाऱ्याची चूक नसल्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार अशा बाबतीत प्राप्तिकर अधिकाऱ्याने कराची मागणी कर्मचाऱ्याकडे न करण्याची सूचना देण्यात आली आहे. मात्र अशा न भरलेल्या उद्गम करामुळे करदात्याने कर परताव्याचा (रिफंड) दावा केला असेल तो कदाचित मिळणार नाही.

 

  • प्रश्न: माझ्या अमेरिकास्थित मुलाने, त्याच्या एनआरई खात्यातून ७,००,००० रुपये माझ्या बचत खात्यात जमा केले. सदर रक्कम मी त्याच दिवशी गोल्ड बॉण्डमध्ये माझ्या नावावर गुंतवली. तर सदर मूळ रक्कम मला करपात्र आहे का? आणि सदर रक्कम मला विवरणपत्र दाखल करते वेळी कोणत्या शीर्षकाखाली दाखवावी लागेल? त्याचप्रमाणे सदर बॉण्डवर मिळणारे व्याज कोणास करपात्र असेल?
    • अजित जोशी, ई-मेलद्वारे

उत्तर : ठरावीक नातेवाईकांना दिलेल्या भेटी करमुक्त असतात. मुलाने वडिलांना दिलेली भेट ही करपात्र नाही. याला रकमेची मर्यादा नाही. यासाठी भेट पत्र (गिफ्ट डीड) करणे उचित होईल. अमेरिकेतील कायद्यानुसार काही ठरावीक रकमेपेक्षा जास्त रकमेच्या भेटीवर कर (गिफ्ट टॅक्स) अमेरिकेत भरावा लागतो. मुलाकडून मिळालेली रक्कम ही भारतात उत्पन्नात गणली जात नसल्यामुळे ती विवरणपत्रात दाखविण्याची गरज नाही. परंतु काहींच्या मते ही रक्कम ‘करमुक्त उत्पन्न’ या सदरात दाखविणे हिताचे आहे. गोल्ड बॉण्डवर मिळणारे व्याज हे करपात्र आहे. ही रक्कम आपण गोल्ड बॉण्डमध्ये आपल्या नावाने गुंतविली आहे त्यामुळे ती आपल्यालाच करपात्र आहे.

 

  • प्रश्न: मी २०१२ मध्ये एक सदनिका ४१ लाख रुपयांना विकत घेतली होती. ती आता २०१६ मध्ये मी ७२,५०,००० रुपयांना विकली. महागाई निर्देशांकानुसार खरेदी किंमत ५८,७५,८०० रुपये इतकी आली आणि मला १३,७४,२०० रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला. हा दीर्घ मुदतीचा नफा मी भांडवली रोख्यात गुंतविल्यास राहिलेली रक्कम मी म्युच्युअल फंडात गुंतवू शकतो का?
    • एक वाचक, डोंबिवली

उत्तर : प्राप्तिकर ‘कलम ५४ ईसी’नुसार दीर्घ मुदतीच्या नफ्याएवढी रक्कम विक्रीच्या सहा  महिन्यांच्या आत भांडवली रोख्यांत गुंतविली तर कर भरावा लागत नाही. ही भांडवली नफ्याएवढी रक्कम गुंतविल्यानंतर राहिलेली रक्कम आपण आपल्या मर्जीप्रमाणे इतरत्र कुठेही गुंतवू शकता.

 

  • प्रश्न: मी तळेगाव येथे एक सदनिका १९९६ मध्ये २,५०,००० रुपयांना खरेदी केली होती. काही कारणाने मला ती २०१६ मध्ये २० लाख रुपयांना विकावी लागली. मला किती कर भरावा लागेल? मला रोख्यांमध्ये गुंतवणूक करता येईल का?
    • शशिकांत टिल्लू, ई-मेलद्वारे

उत्तर : आपल्याला झालेला भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असेल. त्यामुळे महागाई निर्देशांकाचा लाभ मिळेल. दीर्घ मुदतीचा नफा खालीलप्रमाणे :

सदनिका विक्री किंमत : २०,००,००० रुपये

सदनिका खरेदी किंमत : २,५०,००० रुपये

महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य :

१९९६-९७ चा महागाई निर्देशांक-  ३०५

२०१६-१७ चा महागाई निर्देशांक – ११२५

महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य : २,५०,००० गुणिले ११२५ भागिले ३०५   = ९,२२,१३१ रुपये

दीर्घ मुदतीचा भांडवली नफा: १०,७७,८६९ रु.

या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर २०.६ टक्के (शैक्षणिक कर धरून) इतका कर भरावा लागेल. परंतु आपल्याला मुद्रांक शुल्कासाठी बाजारभाव मूल्य किती आहे हेसुद्धा विचारात घ्यावे लागेल. या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याएवढी रक्कम भांडवली रोख्यांत गुंतविली तर कर भरावा लागणार नाही.

 

  • प्रश्न: मी २०१५-१६ या आर्थिक वर्षांचे विवरणपत्र आयटीआर १ नमुन्यामध्ये वेळेवर दाखल केले आणि त्याचा परतावादेखील मिळाला. परंतु या आर्थिक वर्षांत लघू मुदतीचा भांडवली तोटा चुकीने दाखवला गेला नाही. हा तोटा विवरणपत्र आयटीआर २ मध्ये दाखवून सुधारित विवरणपत्र दाखल करू शकतो का?
    • किशोर खरात, सिंदखेडराजा

उत्तर : मूळ विवरणपत्र जर मुदतीत दाखल केले असेल तर सुधारित विवरणपत्र हे (१) करनिर्धारण वर्ष संपल्यानंतर एक वर्षांच्या आत किंवा (२) कर निर्धारण पूर्ण होण्याच्या पूर्वी (या दोन्हींपैकी जे आधी होईल ते) दाखल करता येते. आपल्याला कर परतावा (रिफंड) मिळाला म्हणजे आपले कर निर्धारण झाले असे नाही. त्यामुळे आपण रिफंड मिळाल्यानंतरदेखील सुधारित विवरणपत्र दाखल करू शकता. मूळ विवरणपत्रात झालेली चूक ही सुधारित विवरणपत्र दाखल करून सुधारता येते. भांडवली तोटा जर पुढील वर्षांत कॅरी फॉरवर्ड करावयाचा असेल तर विवरणपत्र मुदतीत दाखल करणे गरजेचे असते. आपल्या बाबतीत मूळ विवरणपत्र मुदतीत दाखल केले असल्यामुळे सुधारित विवरणपत्रात तोटा दाखवून ते दाखल करता येईल. या बाबतीत करदात्यांच्या पक्षात लवादाने (ट्रिब्युनल) न्याय दिला आहे. सुधारित विवरण पत्र हे ‘आयटीआर २’ नमुन्यात भरता येईल.

 

  • प्रश्न: मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. माझे वय ६२ वर्षे आहे. मला १९९५ साली विकत घेतलेल्या एका खासगी कंपनीचे शेअर्स विक्रीतून ५,७५,००० रुपयांचा दीर्घ मुदतीचा नफा झाला. याशिवाय माझ्या उत्पन्नामध्ये ५०,००० रुपयांचे बँकेतील मुदत ठेवींवरील व्याज, ८,५०० रुपये बचत खात्यावरील व्याज आणि ४,५०,००० रुपये म्युच्युअल फंड आणि कंपन्यांचे शेअर्सवरील लाभांश (करमुक्त) यांचा समावेश आहे. मी १,५०,००० रुपये कलम ८० क नुसार बँकेत मुदत ठेवीत गुंतविले आहेत आणि १८,००० रुपयांचा मेडिक्लेम हप्ता भरला आहे. मला किती कर भरावा लागेल?
    • अनंत कुलकर्णी, ई-मेलद्वारे

उत्तर : आपले करपात्र उत्पन्न खालीलप्रमाणे :

(सोबतचे कोष्टक पाहावे)

कलम ८० च्या अंतर्गत मिळणाऱ्या वजावटी भांडवली नफ्यातून घेता येत नाहीत. त्यामुळे कलम ८० नुसार मिळणाऱ्या १,७६,५०० रुपयांच्या वजावटी फक्त भांडवली नफ्याव्यतिरिक्त, म्हणजेच ५८,५०० रुपयांच्या व्याजाच्या उत्पन्नाएवढय़ाच घेता येतात. या वजावटी घेतल्यानंतर आपले नियमित उत्पन्न शून्य असल्यामुळे भांडवली नफ्यातून ३,००,००० रुपयांपर्यंतचे कमाल करमुक्त उत्पन्न (ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे) वजा होऊन त्यावर २०.६% इतका कर भरावा लागेल.

 

untitled-4

प्रवीण देशपांडे

लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार असून, वाचक त्यांना   pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर आपले प्रश्न पाठवू शकतील.

 

Story img Loader