majha-portfolio321जागतिक बाजारपेठेत वातावरण फारसे उत्साहाचे नसले तरीही कच्च्या तेलाच्या पडणाऱ्या किमतीमुळे भारतासाठी पूरक परिस्थिती आहे. यंदाच्या दिवाळीत मुहूर्ताला शेअर बाजारात उत्साह असला तरीही जागतिक मंदीचे सावट होते आणि ते काही काळ राहील असे वाटते. त्यामुळे सध्याची शेअर बाजारातील परिस्थिती थोडी विचित्र आहे. तथापि देशांतर्गत ‘अच्छे दिन’ आणि बाहेर ‘बुरे दिन’ अशी ही विचित्र स्थितीही पालटेल अशा ताज्या संकेतांमुळे सरलेल्या आठवडय़ात सलग दोन दिवस निर्देशांकांनी यापूर्वी कधीही न पाहिलेला कळस दाखविला. अशा परिस्थितीत खरे तर गुंतवणूकदारांनी फक्त निफ्टी किंवा लार्ज av-03कॅपचा विचार करायला हवा. मात्र तरीही माझ्यासारखे काही गुंतवणूकदार अभ्यास करून नवीन काही तरी शोधायचा प्रयत्न करीत असतात. आज शोधलेला हा शेअर असाच काहीसा आहे. इंडियन अॅक्रिलिक्स ही १९८६ मध्ये म्हणजे सुमारे २८ वर्षांपूर्वी पंजाब स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सहकार्याने सुरू झाली. त्यानंतर १० वर्षांनी अमेरिकेतील डय़ुपाँ (ऊ४ ढल्ल३) या कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने उत्पादन क्षमता वाढविली. सध्या भारतातील अॅक्रिलिक्स फायबरमधील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाणारी इंडियन अॅक्रिलिक्स गेली काही वष्रे जागतिक मंदी, वित्तीय तूट आणि कर्जाच्या विळख्यात सापडली होती. आता मात्र बँकेच्या साहाय्याने कर्ज कमी करून कंपनीने व्याजाचा भार खूपच कमी केला आहे. जागतिक दर्जाचे उत्पादन करणाऱ्या भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील या कंपनीचे दिवस आता सुधारले असून येत्या दोन वर्षांत कंपनीची गाडी रुळावर येईल अशी आशा आहे. सध्या चार-पाच रुपयांना उपलब्ध असलेला हा शेअर दोन वर्षांत दुप्पट होईल असे वाटते. थोडाफार धोका पत्करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा मायक्रो कॅप शेअर उत्तम गुंतवणूक ठरू शकेल. सहामाहीचे निकाल तपासून मगच खरेदीचा निर्णय योग्य ठरेल.

Story img Loader