निप्पो बॅटरीज् हे नाव तसे सर्वाच्या परिचयाचे आहे. इंडो नॅशनल ही मत्सुशिता इलेक्ट्रिक इंडस्ट्रियल कंपनी या कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने जागतिक दर्जाच्या बॅटरीजचे उत्पादन करते. देशांतर्गत ३१% बाजार हिस्सा असलेल्या या कंपनीचे भारतभरात ३५ डेपो असून सुमारे ४,००० विपणन केंद्रे आहेत. निप्पोकडे मोठ्या ग्राहकांची म्हणजे ओनिडा, अजंता, वेबेल निकको, बीएचईएल, िहदुस्तान एअरोनॉटिक्स, युनिलीव्हर, ओएनजीसी, इस्रो अशा कंपन्यांची मांदियाळी आहे. अतिशय छोटे म्हणजे केवळ ३.७५ कोटी रुपये भागभांडवल असलेली ही कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करीत आली आहे. गेल्या आíथक वर्षांच्या पाहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदा नक्त नफ्यात १३० टक्क्य़ांची वाढ दाखवून कंपनीने ‘अच्छे दिन आये’ ची चुणूक दाखविली आहे. सध्या ६०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर खरेदी करून पोर्टफोलिओत जरूर ठेवा. वर्ष- दोन वर्षांत चांगल्या नफ्याबरोबर बक्षिस समभागांची अपेक्षा करायलाही हरकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा