portfolio4जुल महिना गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा. कारण या महिन्यात पहिल्या तिमाहीचे आíथक निकाल कंपन्या जाहीर करीत असतात. गेल्या वर्षीचे लेखापरीक्षित निकाल आणि वार्षकि अहवाल देखील आता तुमच्या हातात पडू लागतील. आपण गुंतवणूक केलेल्या कंपनीचे यंदाचे वर्ष कसे असेल यांची चुणूक तुम्हाला पहिल्या तिमाहीत कळू  लागते. म्हणूनच जुल महिना महत्वाचा असतो. नुकत्याच जाहीर झालेल्या काही महत्वाच्या निकालांमध्ये सन फार्मा आणि इन्फोसिस या दोन मोठय़ा कंपन्यांचे नाव आणि चर्चा बाजारात ऐकायला मिळाली असेल. रॅनबॅक्सी ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदाच आलेले सन फार्माचे यंदाचे आíथक निकाल तितकेसे चांगले आले नाहीत. त्यामुळे एकाच दिवसात या कंपनीचा शेअर १५ टक्क्य़ांनी आपटला होता. आपण केलेली गुंतवणूक दीर्घकालीन असल्याने गुंतवणूकदारांनी विचलित न होता असे शेअर्स राखून ठेवावेत किंवा पडेल भावात आणखी खरेदी करावेत. इन्फोसिसचे निकाल माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची स्थिती आता पुन्हा सुधारत असल्याचे सूचित करतात. म्हणूनच सध्या आकर्षक भावात उपलब्ध असलेले केपीआयटी किंवा एचसीएल टेक आणि टेक मिहद्रसारखे शेअर्स गुंतवणुकीसाठी योग्य वाटतात.
भारतीय बाजारपेठेत गेले काही वर्ष बँकाची परिस्थिती बिकट बनली आहे. अनुत्पादित कर्जाचे वाढते प्रमाण आणि जागतिक बाजारातील घडामोडी हे त्या मागील महत्वाचे कारण आहे. मात्र तरीही काही खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर जर आकर्षक किमतीत उपलब्ध असतील तर अशी खरेदी करून ठेवायला काहीच हरकत नाही. १९९४ मध्ये िहदुजा समूहाने इंडसइंड बँकेची स्थापना केली. गेल्या २१ वर्षांत बँकेच्या ७४५ शाखा कार्यरत झाल्या असून १,६३५ एटीएम आहेत. खरं तर खाजगी क्षेत्रातील एक लहान बँक असूनही बँकेने गेल्या काही वर्षांत आपला विस्तार चांगलाच वाढवला आहे. ३० जून २०१५ रोजी संपणाऱ्या पहिल्या तिमाहीचे आíथक निष्कर्ष नुकतेच जाहीर झाले असून बँकेच्या नक्त नफ्यात २५% वाढ होऊन तो ५२५ कोटीवर गेला आहे. येत्या दोन वर्षांत बँकेचे ‘कासा’ ठेवींचे गुणोत्तर ४०% वर नेण्याचा व्यवस्थापनाचा इरादा असून याच कालावधीत कर्जाचे वाटप आणि इतर सेवांचे शुल्क उत्पन्नही  वाढेल अशी आशा आहे. गेल्या आíथक वर्षांत जवळपास १,८०० कोटी रूपयांचा नफा कमावणारी इंडसइंड बँक मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीची उत्तम संधी असू शकते.
av-03
stocksandwealth@gmail.com

Story img Loader