* प्रश्न: मी एका कंपनीत नोकरी करतो. माझे पसे मी शेअर्स मध्ये गुंतविले आहेत. मी काही शेअर्स विकले त्यात मला खालील प्रमाणे नफा आणि तोटा झाला. मला झालेला तोटा नफ्यातून वजा करून बाकी रकमेवर कर भरता येईल का?
दीर्घ मुदतीचा भांडवली नफा २५,४०० रुपये
लघु मुदतीचा भांडवली नफा ३३,८०० रुपये
दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा १४,९०० रुपये
लघु मुदतीचा भांडवली तोटा १२,३०० रुपये
– प्रशांत जाधव, पुणे
उत्तर : दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा कलम १०(३८) प्रमाणे करमुक्त आहे. त्यामुळे दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर म्हणजेच २५,४०० रुपयांवर कर भरावा लागणार नाही. तसेच दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा करमुक्त असल्यामुळे दीर्घ मुदतीच्या भांडवली तोट्याची वजावट घेता येत नाही. लघु मुदतीचा भांडवली तोटा हा मात्र लघु मुदतीच्या नफ्यातून वजा करता येतो.
करपात्र उत्पन्न खालील प्रमाणे :
लघु मुदतीचा भांडवली नफा ३३,८०० रुपये
वजा : लघु मुदतीचा भांडवली तोटा १२,३०० रुपये
करपात्र भांडवली नफा = २१,५०० रुपये
या नफ्यावर १५.४५% (३% शैक्षणिक कर धरून) इतका कर भरावा लागेल. या व्यवहारावर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरला गेला आहे असे गृहीत धरले आहे.
* प्रश्न: मी एका खाजगी कंपनीत नोकरी करत आहे. आमची कंपनी रजेचे वेतन दरवर्षी मार्च महिन्यात देते. या रजेच्या वेतनावर कंपनी उद्गम कर कापून घेते. हे बरोबर आहे का?
– प्रकाश राणे, कळवा
उत्तर : रजेचे वेतन निवृत्ती किंवा नोकरी सोडतांना मिळाले असेल तर त्यातील ठरावीक रक्कम (गर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी) करमुक्त असते. आणि सरकारी कर्मचार्याना ती पूर्णपणे करमुक्त असते. परंतु नोकरी चालू असतांना जर रजेचे वेतन मिळाले तर ते पूर्णपणे करपात्र असते. त्यामुळे कंपनीने त्या वेतनावर उद्गम कर कापून घेतला आहे हे बरोबर आहे.
* प्रश्न: माझा इमारतीची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचा व्यवसाय आहे. मला एका सहकारी संस्थेच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम मिळाले आहे. माझ्याकडे पर्मनन्ट अकाऊंट नंबर (पॅन) नाही. ही सहकारी संस्था माझ्या देय रकमेतून २०% उद्गम कर कापून घेणार आहे असे सांगितले. माझे वार्षकि उत्पन्न दोन ते अडीच लाखापर्यंत आहे. आता मला काय करावे लागेल याबद्दल मार्गदर्शन करा.
– संदीप मिस्त्री, नवी मुंबई</strong>
उत्तर : जर एखाद्याकडे ‘पॅन’ नसेल तर त्याला मिळणाऱ्या रकमेवर २०% उद्गम कर (टीडीएस) कापण्याची तरतूद आहे. त्यामुळे आपल्याकडे पॅन नसेल तर संस्था देय रकमेच्या २०% उद्गम कर कापेल. आपल्याकडे पॅन असता तर आपण केलेल्या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामाच्या देय रकमेवर 1% उद्गम कर कापला गेला असता. आपण त्वरित ‘पॅन’साठी फॉर्म ४९ अ मध्ये अर्ज करावा. योग्य कागदपत्रे जोडून जवळच्या एनएसडीएल किंवा यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या केंद्रावर सादर करावा. दहा ते पंधरा दिवसात आपल्याला पॅन कार्ड मिळेल. हा पॅन सहकारी संस्थेला कळवा म्हणजे ती संस्था २०% ऐवजी १% उद्गम कर कापेल.
* प्रश्न: माझा मुलगा १२ वर्षांचा आहे. माझ्या मुलाच्या नावाने सार्वजनिक भविष्य निधी (ढढा) खाते उघडले आहे. या खात्यात मी किती रक्कम जमा करू शकतो? आणि त्यामध्ये जमा केलेल्या रकमेवर मला ८० क कलमाप्रमाणे वजावट मिळू शकेल का?
– सुदर्शन सुर्वे, मुंबई</strong>
उत्तर : स्वतच्या आणि अजाण मुलाच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) खात्यात आपण एकूण दीड लाख रुपये एका वर्षांत जमा करू शकता. आपल्या अजाण मुलाच्या नावाने उघडलेल्या पीपीएफ खात्यात भरलेल्या रकमेची वजावट आपल्या कलम ८० क नुसार घेता येईल.
* प्रश्न: मी जून २०१५ मध्ये बिल्डर कडून घर विकत घेतले. या घरासाठी मी ३० लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले आहे. हे माझे दुसरे घर आहे. या घराचा ताबा मला मार्च, २०१६ मध्ये मिळणार आहे. या गृह कर्जाची परतफेड २०१५-१६ या आíथक वर्षांत ३६,००० रुपये आणि २,०७,००० रुपये व्याज मला भरावे लागणार आहे. प्राप्तिकरात मला सवलत मिळू शकेल का? आणि मिळाली तर किती मिळू शकते?
– हितेश जोशी
उत्तर : जर आपण घराचा ताबा मार्च २०१६ मध्ये म्हणजेच २०१५-१६ या आíथक वर्षांत मिळविला तर व्याजाची आणि मुद्दत परतफेडीची वजावट मिळू शकते. जर काही कारणाने ताबा एप्रिल २०१६ मध्ये किंवा त्यानंतर घेतला तर या वजावटी २०१५-१६ या आíथक वर्षांत मिळणार नाहीत. ताबा घेण्यापूर्वी भरलेल्या व्याजाची १/५ रकमेची पुढील पाच वर्षांत विभागून वजावट घेता येते. जर घराचा ताबा मार्च २०१६ मध्ये मिळाला तर व्याजाची संपूर्ण म्हणजे २,०७,००० रुपयांची वजावट उत्पन्नातून या वर्षांत घेता येईल. हे आपले दुसरे घर असल्यामुळे गृहकर्जाच्या व्याजावरील २ लाख रुपयांची मर्यादा लागू होत नाही. कलम ८० क नुसार ३६,००० रुपयांची गृहकर्ज मुद्दल परतफेडीची वजावट सुद्धा घेता येईल. परंतु या घराचे घरभाडे उत्पन्न (जरी उत्पन्न मिळाले नाही तरी) दाखवावे लागेल.
* प्रश्न: मी आíथक वर्ष २०१४-१५ (कर निर्धारण वर्ष २०१५-१६) सालचे विवरणपत्र संगणकाद्वारे जुल २०१५ मध्ये भरले. या विवरणपत्रात मी ७,८०० रुपयांचा कर परताव्याचा दावा केला होता. मला नुकतीच प्राप्तीकर खात्याकडून एक सूचना ईमेलद्वारे कलम १४३(१) नुसार मिळाली आहे. या सुचनेनुसार मला ५,२५० रुपये इतका कर भरण्यास सांगितले आहे. आता या सूचनेला मी कसे उत्तर देऊ आणि मला माझा कर परतावा कसा मिळेल?
– शिल्पा कुलकर्णी, ठाणे</strong>
उत्तर : कलम १४३ (१) नुसार मिळणाऱ्या सूचनेमध्ये विवरणपत्रातील गणना आणि दावे तपासले जातात. या सूचनेमध्ये विवरणपत्रात भरलेल्या रकमा आणि प्राप्तीकर खात्यानुसार रकमा असा तुलनात्मक तक्ता असतो. ही सूचना मिळताच कोणत्या रकमेमध्ये फरक आहे हे शोधून काढावे. जर यामध्ये करदात्याची चूक असेल तर ही सूचना स्वीकारावी आणि जर कर देय असेल तर तो भरून टाकावा. उदा. उद्गम कराची रक्कम विवरणपत्रात करदात्याने चुकून जास्त दाखविली आणि प्राप्तीकर खात्याने ती बरोबर दाखविली असेल तर. जर आपण दाखविलेली रक्कम बरोबर असेल आणि प्राप्तीकर खात्याने एखादी रक्कम चुकीची घेतली असेल तर कलम १५४ प्रमाणे दुरुस्तीचा अर्ज ऑनलाईन दाखल करावा.
प्रवीण देशपांडे
लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार आहेत. वाचकांनी त्यांना आपले प्रश्न ई-मेल : pravin3966@rediffmail.com वर पाठवावेत.