* प्रश्न: मी एका कंपनीत नोकरी करतो. माझे पसे मी शेअर्स मध्ये गुंतविले आहेत. मी काही शेअर्स विकले त्यात मला खालील प्रमाणे नफा आणि तोटा झाला. मला झालेला तोटा नफ्यातून वजा करून बाकी रकमेवर कर भरता येईल का?
दीर्घ मुदतीचा भांडवली नफा २५,४०० रुपये
लघु मुदतीचा भांडवली नफा ३३,८०० रुपये
दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा १४,९०० रुपये
लघु मुदतीचा भांडवली तोटा १२,३०० रुपये
– प्रशांत जाधव, पुणे
उत्तर : दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा कलम १०(३८) प्रमाणे करमुक्त आहे. त्यामुळे दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर म्हणजेच २५,४०० रुपयांवर कर भरावा लागणार नाही. तसेच दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा करमुक्त असल्यामुळे दीर्घ मुदतीच्या भांडवली तोट्याची वजावट घेता येत नाही. लघु मुदतीचा भांडवली तोटा हा मात्र लघु मुदतीच्या नफ्यातून वजा करता येतो.
करपात्र उत्पन्न खालील प्रमाणे :
लघु मुदतीचा भांडवली नफा ३३,८०० रुपये
वजा : लघु मुदतीचा भांडवली तोटा १२,३०० रुपये
करपात्र भांडवली नफा = २१,५०० रुपये
या नफ्यावर १५.४५% (३% शैक्षणिक कर धरून) इतका कर भरावा लागेल. या व्यवहारावर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरला गेला आहे असे गृहीत धरले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा