अनावश्यक किंवा चुकीच्या पॉलिसीबाबत आणखी धोका हा आपल्या विश्वासातील बॅकेच्या अधिकाऱ्याकडून असतो. प्राप्तीकर वाचविण्यासाठी ५ वर्षांच्या मुदत ठेवीत पसे गुंतविण्यासाठी ग्राहक बँकेत जातो. मुदत ठेवीत नसलेले अनेक लाभ विमा पॉलिसीमध्ये आहेत. शिवाय विमाछत्रही आहे, असे समजावून सांगितल्यावर ग्राहक आपसुकच विमा पॉलिसी घेण्यास प्रवृत्त होतो.
पारंपारिक पॉलिसींमध्ये विमाधारकाच्या रकमेची गुंतवणूक मुख्यत: कर्ज रोख्यांमध्ये केली जाते. जास्तीत जास्त १५ टक्के इतकी रक्कम शेअर बाजारामध्ये गुंतविली जाते. ८५ टक्के किंवा त्याहूनही अधिक रक्कम कर्ज रोख्यांमध्ये गुंतविणे सक्तीचे आहे. म्हणजेच ८५ टक्के रक्कम ८ टक्के परतावा मिळणाऱ्या कर्जरोख्यांमध्ये गुंतविली आणि १५ टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतविणे आले. शेअर बाजाराच्या सेन्सेक्सची १९७८ पासूनची सरासरी वाढ द.सा.द.शे १७ टक्के आहे. ही वाढ जर गृहित धरली तर विमाइच्छुकाला सरासरी सुमारे ९.३५ टक्के परतावा मिळायला हवा. परंतु त्याला प्राप्त होणारा परतावा ५.५० टक्केच असतो. याचा अर्थ त्याच्या पहिल्या वर्षीच्या प्रिमियममधील सुमारे ६० टक्के रकमेचीच प्रत्यक्षात गुंतवणूक होते. आश्चर्याची बाब म्हणजे गुंतवणूकदाराने त्याच्या स्वत:च्या रकमेमधील किती रक्कम प्रत्यक्षात गुंतविली जाते, अशी विचारणा केली तर त्याला अपेक्षेनुसार प्रतिसाद मिळत नाही. पहिल्या वर्षीच इतकी कमी रक्कम गुंतविली गेली तर गुंतवणूकदाराच्या पहिल्या वर्षीच्या प्रिमियमच्या रकमेएवढी रक्कम होण्यासाठी त्याच्या गुंतवणुकीवर सुमारे ६६ टक्के परतावा मिळवावा लागेल तेव्हा कुठे गुंतवणूकदार ना नफा ना तोटा (ु१ीं‘ी५ील्ल स्र््रल्ल३) पातळीवर येईल. गुंतवणुकीच्या पर्यायांबाबत जी बंधने आहेत त्यांमध्ये इतका परतावा मिळणे केवळ अशक्य आहे.
या पडद्यामागे घडणाऱ्या घटनांची गुंतवणूकदारांना कल्पना नसल्याने ते या नफ्यासकटच्या पॉलिसींची खरेदी करतात. त्यात भर म्हणजे विमा विक्रेत मनाला येईल ते परताव्याचे आमिष दाखवून ‘विमाइच्छुकाची दिशाभूल करणे’ हा एक कलमी कार्यक्रम राबवत असतात. विमा कंपन्यांनाही या प्रकाराची कल्पना आहे. परंतु कंपनीत पसा जमा होत आहे आणि पर्यायाने कंपनीची भरभराट होत आहे म्हणून कंपन्या त्याकडे कानाडोळा करतात. त्यामुळे हा सगळा ‘मिली – जुली’ कारभार आहे, या शंकेला वाव आहे. अजाण अशा सामान्य माणसाच्या आíथक असाक्षरतेचा फायदा घेऊन ही कायदेशीर फसवणूक गेली अनेक वष्रे अव्याहत सुरू आहे.
अशाच फसवणुकीचे बळी ठरलेल्या लाखो लोकांपौकी एक आहे निलेश. तो आज ३७ वर्षांचा आहे. २००९ मध्ये एका विमा विक्रेत्याने खोटे आमिष दाखवून ‘जीवन सरल’ ही पॉलिसी त्याला दिली. (आय.आर.डी.ए.च्या नवीन नियमावली नुसार १ जानेवारी २०१४ पासून या पॉलिसीची विक्री बंद करण्यात आलेली आहे.)
पॉलिसीचा तपशील :
* टर्म : ३५ वष्रे
* वार्षकि प्रिमियम : रु. १२,०१० (अपघाती मृत्युच्या अतिरिक्त विमाछत्रास काट)
* विमा छत्र : रु. २,५०,०००
* अपघाती विमाछत्र : रु. २,५०,०००
एल.आय.सी.चे बोधचिन्ह (लोगो) असलेला तक्ता निलेशला दाखविण्यात आला होता. त्यानुसार तो पॉलिसीची टर्म तरुन गेला तर ३५ वर्षांनंतर त्याला मिळणारी रक्कम होती सुमारे रु. ३६,७१,००० (चक्रवाढ व्याजाने परतावा द.सा.द.शे. १० टक्के).
पुढील वर्षी म्हणजे २०१० मध्ये त्याच विक्रेत्याने निलेशला ‘जीवन सरल’ची दुसरी पॉलिसी विकली. या दुसऱ्या पॉलिसीचा बाकी तपशील आदल्यावर्षी सारखाच आहे. परंतु टर्म २७ वर्षांची आहे. आणि २७ वर्षांनी मिळणारी रक्कम आहे रु. १६,७३,०००. वयाच्या साठीला त्याला १६,७३,००० लाख रुपये आणि ६७ व्या वर्षी ३६,७१,००० लाख रुपये प्राप्त होणार म्हणून निलेश खूष!
खरे तर निलेशने या दोन्ही पॉलिसींची कागदपत्रे नीट वाचूनही घेतली नव्हती. जानेवारी २०१४ पासून या पॉलिसीच्या विक्रीवर बंदी आली म्हणून त्याला शंका आली आणि म्हणून त्याने बारकाईने ती कागदपत्रे वाचली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. ३५ वर्षांच्या टर्मबाबत विक्रेत्याने ३६.७१ लाख रुपये मिळतील म्हणून सांगितले होते; परंतु पॉलिसीच्या कागदपत्रांमध्ये पूर्णावधी विमाछत्र (टं३४१्र३८ र४े अ२२४१ी)ि या मथळ्याखाली रु. ४,८७,३०० ही रक्कम छापली होती. तसेच २७ वर्षांच्या पॉलिसीबाबत विक्रेत्याने सांगितलेल्या १६,७३,००० लाख रुपयांऐवजी ३,७६,३२० रुपये दाखविले होते. निलेश गोंधळून गेला आणि त्याने विक्रेत्याकडे याबाबत विचारणा केली. अशा बाबतीत नेहमीप्रमाणे विक्रेत्याकडून अपेक्षित (की उपेक्षित?) असा जो प्रतिसाद मिळतो, तिच गोष्ट निलेशबाबत घडली. थातूर मातुर अशी काहीतरी उत्तरे त्याला मिळू लागली.
निलेशने या बाबत स्वत:च कृती करायचे ठरविले. त्याच्या समोर दोन पर्याय होते.
१. गेली चार – पाच वष्रे केलेला खूळचटपणा लक्षात आल्यानंतरही पुढील २५ ते ३० वष्रे तो तसाच सुरु ठेवायचा. की २. आतापर्यंत झालेले सुमारे १,३२,००० रुपयांचे नुकसान भोगून नवी टर्म पॉलिसी घ्यायची.
त्याने अभ्यासपूर्ण असा धाडशी निर्णय घेतला आणि दुसरा पर्याय निवडला. त्यामध्ये त्याचे जास्तीत जास्त १,३२,००० रुपये इतके नुकसान होण्याची शक्यता आहे. आज त्याच्याकडे वार्षकि २४,००० इतकी रक्कम उपलब्ध आहे. त्यामध्ये त्याने दुसऱ्या कंपनीची (क्लेम सेंटलमेंट रेशो ९५ टक्के पेक्षा जास्त) १५ लाख रुपये विमाछत्राची २५ वर्षांची पॉलिसी घेतली तर त्याचे वार्षकि प्रिमियम होते ५,७०० रुपये. उरलेले १८,३०० रुपये त्याने प्राप्तीकरात सूट मिळणाऱ्या आणि ठोस परतावा मिळणाऱ्या दुसऱ्या पर्यायात गुंतविली तर ३० वर्षांंनी त्याची गंगाजळी होते २५,६४,००० लाख रुपये.
थोडक्यात, १,३२,००० रुपयांचे नुकसान सहन करुन तो तब्बल तिप्पट विमाछत्र घेऊ शकतो आणि खात्रीलायक अशी तिप्पट गंगाजळी तयार करु शकतो.
निलेशने आणखी थोडय़ा खोलात जाऊन विचार केला. त्याच्या आजच्या वार्षकि कमाईसमोर १५ लाख रुपयांचे विमाछत्र त्याच्या कुटुंबासाठी अगदीच तुटपुंजे आहे. अगदी ०.०१ टक्के का होईना मृत्युच्या संभावनेमध्ये १५ लाख रुपयांमध्ये त्याचे कुटूंब फार काळ तग धरु शकणार नाही. बऱ्याच विचाराअंती शेवटी त्याने विचार पक्का केला.
आज त्याच्याकडे ५० लाख रुपयांची २५ वर्षांची ‘प्युअर टर्म’ पॉलिसी आहे. तिचे वार्षकि प्रिमियम आहे ९,८०० रुपये. बाकीची १४,२०० रुपये (२४,०००-९,८००) त्याने वरील प्राप्तीकर बचतीच्या पर्यायामध्ये दरवर्षी गुंतविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापकी या वर्षीच्या रकमेचा हप्ता भरुन झाला आहे. सध्याच्या ठोस परताव्याच्या दराने २५ वर्षांनी प्राप्तीकरमुक्त आणि खात्रीलायक अशी १३,०३,००० रुपये इतकी गंगाजळी तयार होणार आहे. आकस्मिक मृत्युच्या संभावनेत त्याच्या कुटुंबाला मिळणार आहेत ५० लाख रुपये. विमाछत्र आणि गुंतवणूक (आणि प्राप्तीकर बचत) या दोन्ही आघाडय़ांवर आज त्याने बाजी मारली आहे.
(सदर लेख प्रत्यक्ष घटनेवर आधारित आहे आणि उद्देश विमाधारकांना योग्य मार्ग दाखविणे हाच आहे.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा