बलवान बरोबर असताना दुर्बलाला भीती बाळगण्याचे कारण राहत नाही. प्रत्यक्ष सावळ्या परब्रम्हाशेजारी बसल्यावर भीती आणि चिंता करण्याचे कारण असू शकत नाही, असा विचार तुकोबांनी या अभंगात मांडला आहे. आजच्या दोन कंपन्यादेखील अशाच दिग्गज आहेत. अशी कंपनी जर पोर्टफोलिओमध्ये असेल तर ‘नाही भय चिंता’ हेच खरे. मागील सोमवारी तेल व नसर्गिक वायू क्षेत्रातील नवख्या कंपनीचा आढावा घेतला. आज याच क्षेत्रातील जुन्या जाणत्या ओएनजीसीचा व ऑईल इंडियाचा परिचय करून घेऊ. ओएनजीसी ही सरकारची सर्वात जास्त नफा कमावणारी कंपनी आहे. सरकारच्या मालकीच्या कंपन्यांपकी सर्वात अधिक बाजारमूल्य असणारी कंपनी आहे. एकूण भारताच्या तेल उत्पादनापकी ७७% तेल तर ८०% वायू उत्पादन ओएनजीसी करते. डिसेंबर २०१२ ला संपलेल्या तिमाहीत कंपनीची विक्री रु. २१,०९३ कोटी नोंदली गेली. ही वार्षकि वाढ १५.८% असून मागील तिमाहीपेक्षा ६.१% अधिक आहे. या काळातील नफा रु. ५,५६२ कोटी आहे.
ऑईल इंडिया ही सरकारी मालकीची तेल उत्खनन क्षेत्रातील कंपनी असून स्वस्त कच्चे तेल काढणारी जगातली एक कंपनी असून तेल काढण्याचा खर्च प्रती िपप ८.३ डॉलर येतो. हा खर्च मर्यादित राखल्यामुळे नफा क्षमता ३०% आहे. भूगर्भातून काढलेले कच्चे तेल सरकारी तेल कंपन्यांना आंतराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा कमी दरात विकावे लागते. त्यामुळे नफाक्षमता जास्त असून ही अनुदानाच्या ओझ्याखाली या कंपनीला चांगला बाजारभाव मिळत नव्हता. सरकारने डिझेलच्या किंमतीत मर्यादित वाढ करण्यास परवानगी दिल्यामुळे अनुदानाचा बोजा कमी होईल. परंतु स्वयंपाकाच्या गॅस व घासलेट यांची अनुदाने जोपर्यंत कमी होत नाहीत तोपर्यंत सरकारी कंपनी असल्यामुळे कंपनीला पूर्ण मुल्यांकन लाभणार नाही. दुर्दैवाने आज कुठल्या दराने व किती अनुदाने या कंपनीवर व ओएनजीसीवर लादायची याचे नियम अथवा एखादे सूत्र अस्तित्वात नाही. आíथक वर्ष २०१२ मध्ये या कंपनीवर लादलेल्या अनुदानात १२३.३% वाढ होऊन रु. ७,३५२ कोटींवर अनुदाने पोहोचली होती. यावर्षी रुपयाच्या अवमुल्यनामुळे व कच्च्या तेलाचे सरासरी भाव ११० डॉलर प्रती िपप राहिल्यामुळे अनुदानात गेल्या वर्षीच्या तुलनेत ७०-८०% वाढ दिसेल. परंतु आíथक वर्ष २०१४ मध्ये अनुदानात घट झालेली दिसेल. सध्याच्या भावात हा शेअर १० ते १२% महाग वाटतो. जेव्हा कधी रु. ४८५ च्या दरम्यान हा शेअर मिळेल तेव्हा जरूर घ्यावा. केंद्र सरकारने पंतप्रधानांचे आíथक सल्लागार व रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली गॅसची किंमत ठरविण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारस राबविण्यास रासायनिक खते उत्पादकांचा विरोध आहे. सध्या ही किंमत ‘ब्रेंट क्रूडच्या’ किंमतीनुसार परंतु ६० डॉलर प्रती पिंपपेक्षा जास्त असणार नाहीत, या सुत्रावर आधारित आहेत. ही ६० डॉलरची मर्यादा काढावी, अशी शिफारस रंगराजन समितीने केली आहे. सध्या भारत सरासरी ११४ डॉलर प्रती पिंप दराने आयात करतो. रंगराजन समितीच्या शिफारशी स्वीकारल्या जातील व येत्या अर्थसंकल्पात घोषणा होणे अपेक्षित आहे. ही घोषणा झाल्यास ओएनजीसीच्या व ओईल इंडियाच्या गॅस साठय़ामुळे कंपन्यांचे मुल्यांकन कमीत कमी १५-२०% लगेचच वाढू शकते. दुसरी गोष्ट तेल विपणन कंपन्यांना जो तोटा होतो तो तोटा या दोन कंपन्यांना सोसावा लागतो. मर्यादित डिझेल दरवाढीस परवानगी दिल्यामुळे तोटय़ाने भळभळून वाहणाऱ्या जखमेवर तात्पुरती मलमपट्टी बांधली गेली आहे. याचा अप्रत्यक्ष फायदा या तेल व वायू उत्खननात असलेल्या कंपन्यांना होणार आहे. येत्या वर्षभरात तेलाचे भाव ११० डॉलर प्रती पिंप व डॉलरबरोबरच रुपयाचा विनिमय दर ५२-५४ असणे हे या दोन्ही कंपन्यांसाठी सकारात्मक ठरेल. जर सरकारने खरोखर वित्तीय तुटीला पायबंध घातला व महागाईचा दर कमी झाला तर परकीय वित्तसंस्था भारतीय बाजारात खरेदीचा जोर लावतीत तेव्हा या दोन कंपन्या त्यांच्या खरेदीच्या यादीत असतील हे नक्की.
प्रत्येक गोष्टीला दोन पर्याय असतात. आणि ते पर्यायांची स्वीकारणाऱ्याची नफ्या-तोटय़ाची आपापली गणिते असतात. आपीएल-६च्या लिलावात रिकी पॉटिंग आणि मायकेल क्लार्क यांना सर्वाधिक भाव मिळेल ही चर्चा असताना नवखा ऑस्ट्रेलियन ग्लेन मॅक्सवेल आणि केवळ एक ट्वेंटी-२० मॅच खेळलेला दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरीस यांना सर्वात जास्त भाव मिळाला. ग्लेन मॅक्सवेल (१०,००,००० डॉलर) व ख्रिस मॉरीस (६,२५,००० डॉलर) यांना इतके पसे देऊन खरेदी करणारे मूर्ख नक्कीच नव्हेत. त्यांची ही स्वत:ची गणिते आहेत. पोर्टफोलिओमध्ये सगळेच ‘स्ट्रोक प्लेयर’ घेऊन चालणार नाही. ‘स्ट्रोक प्लेयर’ म्हणून घेतलेला  भेल आयपीएलमधला ‘गांगुली’ ठरू शकतो. ‘स्ट्राईक रेट’ सांभाळणारा केव्हिन पिटरसन किंवा डेव्हीड वॉर्नर यांच्यासारखे मिडकॅप पोर्टफोलिओचा परतावा वाढवू शकतात. मागील सोमवारी शिफारस केलेला सेलन एक्सप्लोरेश, ओएनजीसी व ऑईल इंडिया म्हणजे तेल व वायू उत्खननाच्या व्यवसायातले ‘ब्रम्हा विष्णू महेश’ दोन लार्जकॅप व एक मिडकॅपही म्हणजे या क्षेत्रातील परिपूर्ण गुंतवणूक. सेलन एक्सप्लोरेश, मॅचविनर शेन वॉटसन ठरू शकण्याची शक्यता आहे. तर ओएनजीसी व ऑईल इंडिया म्हणजे पॉटिंग आणि क्लार्क. परंतु मिडकॅप कधी विकायचे हे पक्के माहित असावे लागते. नाहीतर मागील दोन आठवडय़ात मिडकॅप कसे कोसळले त्याचा अनुभव गुंतवणूकदारांनी घेतला. कधी अती सुरक्षित गुंतवणूक करायची आणि कधी जोखीम घ्यायची हे ज्याचे त्याने ठरवायचे. बहुसंख्य नवखे गुंतवणूकदार सेन्सेक्स २०,००० च्या पातळीवर असताना आक्रमक खरेदी करतात आणि सेन्सेक्स १६,००० ते १७,००० असताना नको तेवढे सुरक्षित गुंतवणुकीच्या मागे असतात. आजच्या बाजारात जो जोखीम व्यवस्थित सांभाळू शकतो तोच बाजारातून पसे कमाऊ शकतो. म्हणून जोखीम इतकीच घ्यावी जी आपण सांभाळू शकू. वायू व तेल क्षेत्र जोखीमीचे समजले जाते. कारण प्रत्यक्षात अपेक्षेइतके तेल व वायू निघत नाहीत. येत्या सोमवारी याच्या अगदी उलट अल्प जोखमीच्या ‘पॉवरग्रीड कोर्पोरेशन’चा परिचय करून घेऊ.
ओएनजीसी
बंद भाव     :    रु ३२१.८०
        (१५ फेब्रुवारी रोजी)
दर्शनी मूल्य     :    रु. ५
वर्षांतील उच्चांक     :    रु. ३५४.१०
वर्षांतील नीचांक     :    रु. २४०.१०
ऑइल इंडिया
बंद भाव     :    रु ५४५.९५
        (१५ फेब्रुवारी रोजी)
दर्शनी मूल्य     :    रु. १०
वर्षांतील उच्चांक     :    रु. ६१७.४०
वर्षांतील नीचांक     :    रु. ४३१

Story img Loader