‘सेलन एक्सप्लोरेशन टेक्नोलॉजी’ (सेलन) ही तेल व वायू उत्खनन क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीकडे स्वत:ची पाच तेल क्षेत्रे आहेत. पहिल्या टप्प्यात सरकारने दिलेली तीन तेल क्षेत्रे असून त्यातून कच्चे तेल काढले जाते. दुसऱ्या टप्प्यात एक तेल व एक वायू क्षेत्र या कंपनीला सरकारने बहाल केले. या दोन ठिकाणांहून अद्याप तेल अथवा वायू काढण्यास सुरुवात झालेली नाही. ही पाचही तेल क्षेत्रे गुजरात राज्यात असून जमिनीवरची आहेत. ही पाचही तेल व वायू क्षेत्रे Category-1प्रकारात मोडतात. याचा अर्थ या ठिकाणी तेल व वायूचा मुबलक साठा आहे, असा होतो. येत्या अर्थसंकल्पात तेल व वायू सुधारणांना वेग येईल, अशी पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. इंधन अनुदाने कमी करणे हे या तेल कंपन्यांना फायद्याचे ठरेल म्हणून तेल व वायू क्षेत्रातील माणिक मोती शोभेल अशी ही कंपनी आणली आहे.
या व्यवसायात नफ्याचे प्रमाण भरपूर आहे. सध्या सरकारने तेल व वायू क्षेत्रात आíथक सुधारणेचा जोर लावला आहे. तेल उत्खननाचा खर्च ९-१० डॉलर/िपप आहे. या व्यतिरिक्त साधारणत: ५ डॉलर सरकारला स्वामित्वशुल्क द्यावे लागते. आजच्या घडीला ‘न्यूयॉर्क र्मकटाइल एक्स्चेंज’वर कच्चे तेल ११० डॉलर/िपप आहे. गेल्या पाच वर्षांची नफाक्षमता २०% वर तर गेल्या तीन वर्षांचा २३% भांडवलावर परतावा या कंपनीने कमावला आहे. आज भांडवलावर (ROC) २०% नफा मिळविणाऱ्या कंपन्या मोजायला दोन्ही हाताची बोटे पुरेशी आहेत. आज या तीन तेलक्षेत्रावर भांडवली खर्च करून झालेला आहे. त्यामुळे इथून या तेल क्षेत्रांवर पुढील ७-८ वष्रे खर्च करण्याची आवश्यकता नाही. हायड्रोकार्बन संचलनालयाने परवानगी देण्यास उशीर केल्यामुळे उर्वरित दोन ठिकाणी तेल व वायू उत्खननास सुरु करण्यास उशीर झाला आहे. येत्या सहा महिन्यात सर्व परवानगी मिळून प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ होईल. २००० मध्ये कंपनीचे भागभांडवल रु. १८.५० कोटी होते. एक वर्षांआड कंपनी आपले शेअर हे बाजारातून पुनर्खरेदी करत आहे. त्यामुळे आता भांडवल २००९ मध्ये रु. १४.२१ कोटी इतके कमी झाले होते. प्रवर्तकांनी आपली ‘वॉरंट्स शेअर’मध्ये केलेले परिवर्तन व २०११ मध्ये १:१० या प्रमाणात दिलेले बक्षीस समभाग यामुळे ते आता रु. १७ कोटी आहे. सध्या कंपनी आपल्या शेअरची सातत्याने पुनर्खरेदी करत आहे.
नवीन तेल विहिरी खोदण्यासाठी परवानगी देण्याची बंद झालेली प्रक्रिया पुन्हा सुरु झाली आहे. रिलायन्स व केर्न यांना परवानगी मिळाली आहेत, असे वृत्त आहे. तेव्हा ‘सेलन’ला बहाल केलेल्या २०० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात पाच तेल विहिरी विकसित करण्याचा परवानगी मागणारा अर्ज मंजूर होऊन मार्चच्या आधी बांधकामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर येत्या वर्षभरात वार्षकि १.५ ते २ लाख िपप तेल उत्पादन वाढेल. सध्या कंपनी वार्षकि २ लाख िपप तेल उत्पादन करून वार्षकि रु. १०० कोटींच्या विक्रीवर रु. ५० कोटींचा नफा कमावत आहे. दोन ते तीन वर्षांत तेलाचे उत्पादन आणि विक्री दुप्पट होणे अपेक्षित आहे. सध्या कंपनीकडे रु. १२५ कोटी रोख व रोख सममूल्य निधी असून ही तेलक्षेत्रे विकसित करण्यास हा निधी पुरेसा आहे. त्यासाठी बाजारातून पसे उभारण्याची आवश्यकता नाही. भारतीय शेअर बाजाराचा गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतल्यास भांडवली वस्तू (Capital Goods) व तेल आणि वायू निर्देशांक फारसे वाढले नाहीत. किंबहुना गेल्या वर्षभरात सर्वात जास्त नकारात्मकत (डिझेल दरवाढ करण्यापूर्वी) परतावा या दोन निर्देशाकांनी दिला. सेलनही या गोष्टीला अपवाद नाही.
रिलायन्स प्रश्नावरून माजी पेट्रोलियम मंत्री एस. जयपाल रेड्डी यांनी रिलायन्सच्या केजी डी-६ या क्षेत्रातून वायू निर्मितीवर घातलेली बंधने, त्याची महालेखापाल यांच्याकडून करायची हिशोब तपासणी, त्याला असलेला कंपनीचा विरोध ही प्रमुख कारणे आहेत. सध्याचे पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांना सरकारी धोरण लकव्यामुळे तुंबलेले निर्णय वेगाने घेण्यासाठीच या खात्यात पाठविण्यात आले आहे. रेड्डी यांनी स्वत: नवीन धोरणे आखली नाहीत. तसेच त्यांनी जुन्या नियमांच्या आधारेच मंत्रालयाचा कारभार आखला. हा प्रकार रिलायन्सला तितकासा पसंत नव्हे नव्हता. रिलायन्स कंपनी आपल्या व्यवसायाला फायद्याची धोरणे सरकारला ठरवायला भाग पाडते. नवीन मंत्र्यांनी कारभार हाती घेताच दिल्लीच्या शात्री भवनात, जिथून पेट्रोलियम मंत्रालयाचा कारभार हाकला जातो तिथे रिलायन्ससह इतर सर्वच कंपन्यांचे नवीन तेल विहिरींचे प्रस्ताव मंजूर होऊ लागले आहेत. सेलनचे नव्या तेल विहिरींचे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दोन वर्षांत वार्षकि दीड ते दोन लाख िपप तेल उत्पादन वाढवता येईल. तसे झाले तर नफा दुप्पट होईल. येत्या पाच वर्षांत हा शेअर बहुप्रसवा (Multi-Bagger) असेल याविषयी शंका नाही. तेल व नसíगक वायू क्षेत्र ‘मुठ्ठी’मध्ये घेण्यास तयार असलेला ‘कोहिनूर’ घेऊन येत्या सोमवारी भेटीला येईन.
सेलन एक्स्प्लोरेशन टेक्नॉलॉजी
बंद भाव : रु ३०५.६५ (८ फेब्रु. रोजी)
दर्शनी मूल्य : रु. १०
वर्षांतील उच्चांक : रु. ३५०
वर्षांतील नीचांक : रु. २५५
गुंतवणुकीतील जोखीम
* ही कंपनी ‘मिडकॅप’ असल्यामुळे या क्षेत्रातील ‘लार्जकॅप’ कंपन्या ओएनजीसी, ऑईल इंडियापेक्षा बाजाराच्या सध्याची पातळी लक्षात घेता या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा धोका अधिक आहे.
* पहिली गोष्ट यंदाच्या अर्थसंकल्पात या क्षेत्रात धोरणात्मक बदल होतील, ही अपेक्षा आहे.
* सरकारने कुठलेही धोरण आखल्यानंतर त्याची फळे मिळण्यास तीन-चार वष्रे जावी लागतात. तेव्हा हा शेअर विकत घेतल्यास तीन ते चार वर्ष थांबण्याची तयारी हवी. मध्यंतरीच्या काळात भाव खाली जाऊ शकतो.
* आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव घसरणे तसेच रुपया मजबूत होणे हे कंपनीसाठी नकारात्मक आहे.
बंद भाव पीई बाजारभाव / बाजारमूल्य
(८ फेब्रु. रोजी) पुस्तकी मूल्य (कोटी रुपये)
ओएनजीसी ३१३.४५ ११.०१ २.३७ २,६८,१७१.८४
केर्न इंडिया ३१४.८५ ४.५६ १.८८ ६०,१३६.१९
ऑईल इंडिया ५३२.६५ ९.५८ २.०३ ३२,०१९.५१
सेलन एक्स्प्लोरेशन ३०५.६५ १०.९१ २.४८ ५१४.७८
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा