समीर नेसरीकर
मुलासाठी त्याच्या वयाच्या पहिल्या वर्षी गुंतवणूक सुरू करताना भविष्यात ते पाल्य कोणते मैदान गाजवणार आहे याची कल्पना कोणालाच नसणार. परंतु एक नक्की की पालकांच्या गाठीशी एक मोठा कालावधी असतो आणि आपण नुसतेच साक्षर नसून, अर्थसाक्षरसुद्धा आहोत हे सिद्ध करण्याची ती एक संधीही असते.

आपल्या आर्थिक नियोजनाला कलाटणी देणाऱ्या टप्प्यांमधील एक महत्त्वाचा टप्पा हा ‘आईबाप’ होण्याचा. दिवस- रात्रपाळीत पालकांचे काही दिवस, महिने निघून जातात, बाळाचे नामकरण होते. मूल हळूहळू दुडुदुडु पावले उमटवत मोठे होत असते, नेमक्या याच वेळी आपली पावले मात्र योग्य आर्थिक मार्गावर आणि भक्कमपणे पडली पाहिजेत. आपण सर्व जण नुसतेच साक्षर नसून, अर्थसाक्षरसुद्धा आहोत हे सिद्ध करण्याची आणखी एक संधी चालून येते ती याच टप्प्यावर.

gst on food served in cinema hall
चित्रपटगृहातील खाद्यपदार्थ होणार स्वस्त, जीएसटी परिषदेचा मोठा निर्णय
Indian Currency_Currency Ban_Loksatta
विश्लेषण : भारतातील चलनबंदीची गाथा…
Boeing layoffs 2023
जगभरात नोकरकपातीचं संकट; Google, Amazon नंतर प्रसिद्ध एअरक्राफ्ट कंपनी २,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
idbi bank
आयडीबीआय बँकेसाठी सप्टेंबपर्यंत बोली अपेक्षित
no alt text set
क.. कमॉडिटीचा: अडला हरी म्हणून जीएम मोहरी
no alt text set
‘अर्था’मागील अर्थभान: गेम थेअरी भाग १
no alt text set
आगामी २०२३ साठी गुंतवणूक-पट बदलेल, पण कसा?
no alt text set
माझा पोर्टफोलियो:‘ग्रो अँड डिलिव्हर’ योजनेची फळे
जाहल्या काही चुका.. :‘एसआयपी’ सोडवी आता शैक्षणिक खर्चाची चिंता

मुलांसाठी गुंतवणूक करताना आपण ती पारंपरिक साधनांत करतो की, बाजाराभिमुख साधनांत (शेअर्स, म्युच्युअल फंड) या प्रमाणानुसार, मुलांच्या भविष्यकालीन खर्चाची जमाराशी ठरत असते. प्रचलित भारतीय शिक्षणपद्धतीनुसार साधारणत: दहावी, बारावी, पदवी आणि पदवीनंतरच्या शिक्षणासाठी पैशाची उभारणी करावी लागते. भारतीय मुलांचा परदेशी विद्यापीठामध्ये जाऊन प्रगत शिक्षण घेण्याचा मानस दिसून येत आहे. पुढील पंधरा-वीस वर्षांत या क्षेत्राचा चेहरामोहरा पूर्णत: बदलून जाईल असे दिसतेय. तसेच मुलांच्या लग्नाच्या खर्चाचा सध्याचा आकडा पाहता पालक याची तजवीज पहिल्यापासून करण्यास प्राधान्य देत आहेत. सेबीने ‘सोल्यूशन ओरिएंटेड’ योजनांच्या अंतर्गत ‘चिल्ड्रन फंडह्ण’ ही विशेष श्रेणी दिली आहे. पाच वर्षांचा ‘लॉक इन’ कालावधी किंवा मूल सज्ञान होईपर्यंतचा कालावधी, या दोहोंपैकी जो लवकर येईल तो, अशा पद्धतीने या चिल्ड्रन फंडांची बांधणी आहे.

काळ बदलतोय. एके काळी डॉक्टर, इंजिनीअर या प्रवाहासोबत जाण्याकडे विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा जास्त कल दिसायचा. आता मुलांना मोठेपणी स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना दुसऱ्यांना नोकऱ्या द्यायच्या आहेत, कोणी सोशल मीडियावर आपली छाप पाडण्याची स्वप्ने पाहतोय. शाश्वत, सरधोपट मार्गाने जाण्याऐवजी मुलांना स्वत:चे आवडते क्षेत्र खुणावते आहे. वयाच्या पहिल्या वर्षी गुंतवणूक सुरू करताना आपले पाल्य कोणते मैदान गाजवणार आहे याची कल्पना कोणालाच नसणार. परंतु एक नक्की आहे की पालकांकडे एक मोठा कालावधी गाठीशी असतो. आपण हे जाणतोच की ‘इक्विटी’ म्हणजे समभाग या मालमत्ता वर्गामध्ये केलेली दीर्घकालीन गुंतवणूक दुसऱ्या सर्व प्रचलित, पारंपरिक गुंतवणूक साधनांपेक्षा जास्त परतावा देते. तेव्हा आपण मोठय़ा कालावधीसाठी गुंतवणूक करताना समभागसलंग्न म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रातील महागाई डोळय़ात खुपेल इतकी आहे. ती कसा घात करेल याचा अंदाज येण्यासाठी करिअरचा तक्ता सोबत दिला आहे.
महागाईवर मात करण्यासाठी ‘इक्विटी’ला पर्याय नाही. आपण जर २५,००० रुपयांची इक्विटी फंडात ‘एसआयपी’ १५ वर्षे केली तर आपल्याला १२ टक्के माफक वृद्धीदर मानून १ कोटी २६ लाख रुपये मिळू शकतील. तसेच ‘एसआयपी टॉप अप’द्वारे (दरवर्षी ‘एसआयपी’ रक्कम वाढवत जाणे) आपण आपली ठरविलेली राशी गाठू शकता.

चिल्ड्रन फंड या श्रेणीपुरता विचार केला तर एचडीएफसी चिल्ड्रन गिफ्ट फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल चाइल्ड केअर फंड आणि एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन बेनेफिट फंड – सेव्हिंग्ज प्लॅन यांनी जुलै २०२२ अखेरीस, १० वर्षांच्या कालावधीत अनुक्रमे १५.२४ टक्के, १३.०४ टक्के आणि ११.८० टक्के असा वार्षिक वृद्धीदराने परतावा दिला आहे. या श्रेणीतील काही योजनांमध्ये लहान मुलाचे आप्तेष्ट, आजी आजोबा आपल्या नातवाच्या नावे गुंतवणूक करू शकतात, त्या वेळेस त्या सर्व मंडळींची ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण झालेली आवश्यक आहे. तसेच या श्रेणीतील काही योजनांमध्ये, सेिव्हग्ज आणि इन्व्हेस्टमेंट असे दोन पर्याय उपलब्ध आहेत, आपल्या गुंतवणूक सल्लागाराकडून याविषयीची इत्थंभूत माहिती घ्यावी.नवीन पिढी प्रयोगशील आहे, त्यांचे स्वत:चे विचार आहेत. त्यांचा मार्ग ते स्वत:च शोधतील. आपण पालक म्हणून त्यांना फक्त साथ द्यायची आहे, भावनिक आणि आर्थिक. पुढील काळात पैशाअभावी त्यांची स्वप्ने अर्धवट राहणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. म्हणूनच गुंतवणूक कर्तव्याची जाण असणे आणि त्या दिशेने आपली प्रत्यक्ष कृती होणे, हे आपल्याकडून अपेक्षित आहे.

‘हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा’ हा आशावाद आणि आत्मविश्वास पुढच्या पिढीला भविष्यात वेगळय़ाच उंचीवर नेईल, आपल्याला त्याचा अभिमान असेल.

करिअरच्या पारंपरिक मार्गावरील आजचा व १५ वर्षांनंतरचा खर्चाचा अंदाज
अभ्यासक्रम २०२२ (रु.) २०३७ (रु.)
डॉक्टर ८० लाख ३.३४ कोटी
इंजिनिअिरग १० लाख ४२ लाख
एमबीए २५ लाख १.०४ कोटी
(१५ वर्षे कालावधीसाठी सरासरी महागाई दर १० टक्के गृहीत धरून खर्चातील वाढ,नावाजलेल्या संस्थांमधून शिक्षण घेतल्यास)

(लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)
sameernesarikar@gmail. com
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)