दसरा सरला की दिवाळीचे वेध लागतात आणि दिवाळी म्हटली की नवीन खरेदी आलीच. कपडे, सोने याच्या जोडीला शेअर बाजारदेखील लक्ष्मीपूजन व मुहूर्ताचे सौदे करून आपल्या पद्धतीने दिवाळी साजरी करीत असतो. या वर्षी तर बाजार सार्वकालिक उच्चांकाच्या नजीक आहे. म्हणून या वर्षीची दिवाळी ही बाजारासाठी खासच! मागील वर्षांपासून दिवाळीच्या मागेपुढे ‘अर्थ वृत्तान्त’सुद्धा दिवाळीसाठी विशेष खरेदी सुचवीत असतो. या वर्षी दसरा व दिवाळी हे दोन्ही सण ऑक्टोबर महिन्यात आले आहेत. म्हणून गतवर्षीप्रमाणेच आम्ही विश्लेषकांना त्यांनी मागील वर्षभरात अभ्यासलेल्या कंपन्यांपकी एका कंपनीची निवड करण्यास सांगितले. ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’च्या अतिथी विश्लेषकांच्या पसंतीच्या आठ कंपन्या घेऊन येत आहोत..
सर्वागाने पुढारपण..
रिलायन्स इंडस्ट्रीज लि.
(बीएसई कोड – ५००३२५)
” ९३८.३०
वार्षिक उच्चांक/नीचांक :
“११४३ / “७९४
दर्शनी मूल्य : ” १०  
 पी/ई : १३.४७
* शेअर बाजारातील प्रत्येक तेजीचे नेतृत्व कायम एका उद्योग क्षेत्राकडे आजवर राहिले आहे. १९९२च्या तेजीचे नेतृत्व सीमेंट उद्योगाकडे, २०००च्या च्या तेजीचे नेतृत्व माहिती तंत्रज्ञान उद्योगाकडे, २००८च्या तेजीचे नेतृत्व बँकिंग उद्योगाकडे होते. विद्यमान तेजीचे शिखर पुढील दिवाळीत असेल असे तांत्रिक विश्लेषक मानतात. याच बरोबर विद्यमान तेजीचे नेतृत्व तेल व वायू उद्योगाकडे असेल असा निधी व्यवस्थापकांचा कयास आहे. रिलायन्स ही तेल व वायू क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने आपले अर्धवार्षकि निकाल नुकतेच जाहीर केले. चालू आíथक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ५,९७६ कोटींचा निव्वळ नफा झाला. मागील तिमाहीच्या तुलनेत नफ्यात वाढ झाली नसली तरी वर्षभरापूर्वीच्या नफ्यापेक्षा हा नफा १.५ टक्के अधिक आहे. ही वाढ मुख्यत्वे तेल शुद्धीकरणात झालेल्या नफ्यामुळे आहे. मागील वर्षी तेल शुद्धीकरणातील नफा ८.३ डॉलर प्रतििपप होता. या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत तेल शुद्धीकरणातील नफा ८.८ डॉलर प्रतििपप इतकी वाढ झाली. सध्या कच्च्या तेलाच्या किंमती ८५ डॉलर प्रति िपप असल्याने तेल शुद्धीकरणातील नफा ९.२० डॉलरच्या जवळपास असण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे. तसे झाल्यास कंपनीचा पुढील तीन महिन्यांचा नफा सुमारे ६,००० कोटी असेल. सुधारलेल्या अर्थव्यवस्थेमुळे रिलायन्सच्या पॉलिस्टर यार्न या प्रमुख उत्पादनाच्या मागणीत दोन आकड्यात वाढ दिसून आली आहे. तर किरकोळ व्यवसायाने मागील तिमाहीत ९९ कोटी नफ्याचा टप्पा पार केला आहे. कंपनीकडे ३० सप्टेंबर २०१४ अखेर ८३,४५६ कोटींची रोकड सममूल्य गुंतवणूक असून या तिमाहीत कंपनीने ४५,००० कोटींचा भांडवली खर्च केला आहे. हा भांडवली खर्च प्रामुख्याने कंपनीच्या जामनगर, दहेज व हाजिरा येथील पेट्रो रसायन संकुलाची क्षमता वाढ व उत्पादनातील अडथळे दूर करण्यावर खर्च झाले. यापकी २०,००० कोटी रिलायन्स जिओच्या ‘फोर जी’ प्रकल्पाचा पाया रचण्यासाठी खर्च झाले.
युरोप अमेरिकेतील हिवाळ्याला नोव्हेंबरपासून सुरुवात होते. इंधनाची मागणी वाढल्यामुळे येत्या तिमाहीत आशियातील तेल शुद्धीकरण कारखान्यांचा नफा अर्धा ते पाऊण टक्का अधिक असण्याची शक्यता वाटते. तेल व वायू मंत्रालयाकडून नसíगक वायू दरवाढीची घोषणा विधानसभेच्या निवडणुका उरकरल्याने लवकरच होणे अपेक्षित आहे. आíथक वर्ष २०१५ चे उत्सर्जन (ईपीएस) ८८ तर २०१६ चे उत्सर्जन ९२ असणे अपेक्षित आहे. आम्ही येत्या वर्षभरासाठी १,१९८ रुपये भावाचे लक्ष्य निर्धारीत करीत आहोत.
* निशा शर्मा nisha.sharma@krchoksey.com .ूे
(केआर चोक्सी या दलाल पेढीत तेल व वायू क्षेत्राच्या विश्लेषक आहेत)
(टीप: ही शिफारस शनिवारी झालेल्या वायू दर निश्चितीच्या निर्णयापूर्वी केली गेली    आहे.)

नफ्याला निश्चित भरते!
रेमंड लिमिटेड
(बीएसई कोड – ५००३३०)
” ४४६.००
वार्षिक उच्चांक/नीचांक :
“५०५ / “२४५
दर्शनी मूल्य : ” १०  
 पी/ई : २७.६०
* रेमंड लिमिटेड ही कंपनी ‘रेमंड’ या नाममुद्रेने तयार सूट, पँट व शर्ट तसेच या वस्त्रांचे प्रकार शिवण्यासाठी कापड, ‘पार्क अ‍ॅव्हेन्यू’ या नाममुद्रेने टाय कफिलग ‘जेके हेलन कर्टिस’ या नाममुद्रेने विकले जाणारे आंघोळीचा साबण, पावडर, क्रीम, शाम्पू, शेिव्हग क्रीम आदी पुरुषांनी वापरावयाची पूरक उत्पादने, ‘कामसूत्र’ या नाममुद्रेने कंडोम, शृंगारपूरक साखळी उत्पादने ‘कलरप्लस’ या व्यतिरिक्त जेके फाईल्स, ड्रील, कटिंग टूल्स, हँडहेल्ड टूल्स अशा विविधांगी उत्पादनांची निर्मिती व वितरण या व्यवसायात रेमंड व तिच्या उपकंपन्या आहेत.
दर तिमाही निकालांनंतर रेमंड व्यवस्थापनाकडून नवीन उत्पादने, ग्राहकांच्या पसंतीत झालेले बदल, नफाक्षमता आदी विषयांवर आम्ही माहिती घेत असतो. या आíथक वर्षांच्या पहिल्या तिमाही निकालानंतर झालेल्या भेटीचा हा लेखाजोखा-    
सुटिंग्ज व्यवसायाच्या नफ्यात वाढ: कंपनीने सुटिंग्ज उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी व नफाक्षमता वाढविण्यासाठी एक प्रकल्प हाती घेतला असून एका आंतरराष्ट्रीय सल्लागाराची या प्रकल्पासाठी नेमणूक केली आहे. या प्रकल्पाअंतर्गत उत्पादनखर्चात बचत, मालवाहतुकीच्या खर्चात बचत करण्याचे योजले आहे. यामुळे सुटिंग्ज विभाग जो एकूण विक्रीच्या ४२ टक्के योगदान देतो त्याच्या उत्पादन खर्चात बचत झाल्यास नफाक्षमतेत वाढ होईल. हा प्रकल्प फेब्रुवारी २०१५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. एप्रिल २०१५ पासून या प्रकल्पाचा परिणाम म्हणून कंपनीची नफाक्षमता ७-८ टक्के वाढणे अपेक्षित आहे.      
तयार कपडे विभाग: नाममुद्रांकित (ब्रॅण्डेड) वस्त्रप्रावरणे व्यवसाय वार्षकि १५ ते १८ टक्के दराने वाढत आहे. कंपनीची ‘रेमंड स्टोअर्स’ या नावाने असलेली विक्री दालने ३६ महिन्यांऐवजी ३० महिन्यात नफा कमावू लागली आहेत. पुरवठा साखळीत सुधारणा केल्याने खेळत्या भांडवलाची गरज ११० दिवसांवरून ६० दिवसांपर्यंत कमी झाली आहे. या कारणाने व्याजाच्या खर्चात मोठी बचत अपेक्षित आहे. तयार कपडे विभागाची नफाक्षमता ही कापड (फॅब्रिक) विभागाहून अधिक असल्याने दरवर्षी नवीन दुकाने उघडण्याच्या जोडीलाच दरवर्षी ५०-६० विक्रीदालनांचे नूतनीकरणही करण्यात येणार आहे. जानेवारी २०१५ पासून ‘स्प्रिंग समर कलेक्शन’ नावाने वस्त्रांची नवीन श्रेणी तयार असून, नोंदलेल्या मागणीत १५-१८ टक्के वाढ दिसून येत आहे.
ई कॉमर्स व्यवहाराला सुरुवात: तरुणाईचा कल हा दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन व्यवहार करण्याकडे असल्याने रेमंडने देखील तरुणाईला साद घालण्यासाठी  raymondnext.com हे पोर्टल विकसित केले आहे. कोणी मध्यस्थ नसल्याने कमाल विक्री किंमतीवर सूट द्यावी लागत नाही. पुढील वर्षी ई कॉमर्स व्यवहारतून होणारी विक्री या वर्षीपेक्षा दुप्पट होण्याची कंपनीला आशा आहे.
सद्य बाजार भावाचे २०१५ च्या कंपनीच्या प्रति समभाग मिळकतीशी गुणोत्तर १५ पट तर २०१६च्या प्रति समभाग संभाव्य मिळकतीशी गुणोत्तर १२ पट आहे. कंपनीने हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नफाक्षमता वाढणार असल्याने आम्ही पुढील एका वर्षांसाठी ५२५ रुपयांचे लक्ष्य निर्धारित करीत आहोत
* अभिषेक रंगनाथन /abhishekr@phillipcapital.in
* नेहा गर्ग /  ngarg@phillipcapital.in
( दोन्ही विश्लेषक फिलीप कॅपिटल या आंतरराष्ट्रीय
दलाल पेढीचे)

वाहन विक्रीत सुधाराचा लाभार्थी
एनआरबी बेअिरग्ज लि.
(बीएसई कोड – ५३०३६७)
” १२६.००
वार्षिक उच्चांक/नीचांक :
“१३७.६५ / “३१.३०
दर्शनी मूल्य : ” २  
 पी/ई : २७.५२
* या कंपनीची स्थापना १९६५ मध्ये मुंबईत नीडल रोलर बेअिरग्ज इंडिया लिमिटेड या नावाने नेडीला या फ्रान्सच्या कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने झाली. १९६६ मध्ये ठाणे येथील पहिल्या कारखान्यातून उत्पादनास प्रारंभ झाला. कंपनीचे महाराष्ट्रात ठाणे येथे, दोन वाळुंज- औरंगाबाद जालना येथे, झारखंड राज्यात रांची व उत्तराखंड राज्यात पंतनगर व तेलंगणा राज्यात हैदराबाद व थायलंड येथे कारखाने आहेत. १९९० मध्ये कंपनीचे नांव एनआरबी बेअिरग्ज असे बदलण्यात आले. कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या वापरासाठी बेअिरगचे उत्पादन करते. कंपनीच्या उत्पादनांमध्ये व्यापारी वाहने, प्रवासी वाहने, रेल्वे, ऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या बेअिरगचे उत्पादन करते. कंपनीच्या एकूण विक्रीपकी ७८ टक्के विक्री देशांतर्गत तर २२ टक्के निर्यातीतून होते. कंपनीच्या विक्रीपकी दुचाकी, चार चाकी वाहनांसाठी अनुक्रमे २२ टक्के व २४ टक्के, १६ टक्के यंत्रसामग्री तर उर्वरित विक्री दुरुस्तीसाठी (फीस्र्’ूंीेील्ल३) वापरल्या जाणाऱ्या बेअिरग्जमधून होते. नीडल रोलर बेअिरग या प्रकारच्या बेअिरगच्या देशांतर्गत बाजारपेठेत ७० टक्के हिस्सा असलेली एनआरबी बेअिरग्ज बाजारपेठेत नेतृत्व करते.   
या कंपनीची दिवाळी खरेदीसाठी शिफारस करण्यामागची कारणे   
०  नफाक्षमता अन्य बहुराष्ट्रीय बेअिरग उत्पादकांच्या इतकीच आहे.
०  करपूर्व नफ्याचे प्रमाण अन्य बेअिरग उत्पादकांच्या तुलनेत अव्वल.
०  देशांतर्गत वाहन विक्री सुधारत असल्याचा प्रत्यक्ष लाभार्थी. परिणाम करपश्चात नफ्याचे प्रमाण या आर्थिक वर्षांत २२ टक्के अशी आजवरची सर्वाधिक पातळी गाठण्याची शक्यता.
०  एनआरबीकडे स्वत:चे संशोधन व विकास केंद्र असल्याने अन्य उत्पादकांना संशोधन वापरल्याबद्दल तिला स्वामित्व शुल्क द्यावे लागते.
परिणामी एका वर्षांनंतरचे २१० रुपयांचे लक्ष्य निर्धारित करून खरेदी करण्याचा सल्ला आम्ही देत आहोत.   
* मुकेश सराफ / रोहित कृष्णन
indo national ltd. shares,shares,investment,majha portfolio,economy,arthvrutant,loksatta,loksatta news,marathi,marathi news
(स्पार्क कॅपिटल या दलाल पेढीचे हे दोघे विश्लेषक आहेत)

Story img Loader