दसरा सरला की दिवाळीचे वेध लागतात आणि दिवाळी म्हटली की नवीन खरेदी आलीच. कपडे, सोने याच्या जोडीला शेअर बाजारदेखील लक्ष्मीपूजन व मुहूर्ताचे सौदे करून आपल्या पद्धतीने दिवाळी साजरी करीत असतो. या वर्षी तर बाजार सार्वकालिक उच्चांकाच्या नजीक आहे. म्हणून या वर्षीची दिवाळी ही बाजारासाठी खासच! मागील वर्षांपासून दिवाळीच्या मागेपुढे ‘अर्थ वृत्तान्त’सुद्धा दिवाळीसाठी विशेष खरेदी सुचवीत असतो. या वर्षी दसरा व दिवाळी हे दोन्ही सण ऑक्टोबर महिन्यात आले आहेत. म्हणून गतवर्षीप्रमाणेच आम्ही विश्लेषकांना त्यांनी मागील वर्षभरात अभ्यासलेल्या कंपन्यांपकी एका कंपनीची निवड करण्यास सांगितले. ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’च्या अतिथी विश्लेषकांच्या पसंतीच्या आठ कंपन्या घेऊन येत आहोत..
सर्वागाने पुढारपण..
रिलायन्स इंडस्ट्रीज लि.
(बीएसई कोड – ५००३२५)
” ९३८.३०
वार्षिक उच्चांक/नीचांक :
“११४३ / “७९४
दर्शनी मूल्य : ” १०
पी/ई : १३.४७
* शेअर बाजारातील प्रत्येक तेजीचे नेतृत्व कायम एका उद्योग क्षेत्राकडे आजवर राहिले आहे. १९९२च्या तेजीचे नेतृत्व सीमेंट उद्योगाकडे, २०००च्या च्या तेजीचे नेतृत्व माहिती तंत्रज्ञान उद्योगाकडे, २००८च्या तेजीचे नेतृत्व बँकिंग उद्योगाकडे होते. विद्यमान तेजीचे शिखर पुढील दिवाळीत असेल असे तांत्रिक विश्लेषक मानतात. याच बरोबर विद्यमान तेजीचे नेतृत्व तेल व वायू उद्योगाकडे असेल असा निधी व्यवस्थापकांचा कयास आहे. रिलायन्स ही तेल व वायू क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने आपले अर्धवार्षकि निकाल नुकतेच जाहीर केले. चालू आíथक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ५,९७६ कोटींचा निव्वळ नफा झाला. मागील तिमाहीच्या तुलनेत नफ्यात वाढ झाली नसली तरी वर्षभरापूर्वीच्या नफ्यापेक्षा हा नफा १.५ टक्के अधिक आहे. ही वाढ मुख्यत्वे तेल शुद्धीकरणात झालेल्या नफ्यामुळे आहे. मागील वर्षी तेल शुद्धीकरणातील नफा ८.३ डॉलर प्रतििपप होता. या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत तेल शुद्धीकरणातील नफा ८.८ डॉलर प्रतििपप इतकी वाढ झाली. सध्या कच्च्या तेलाच्या किंमती ८५ डॉलर प्रति िपप असल्याने तेल शुद्धीकरणातील नफा ९.२० डॉलरच्या जवळपास असण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे. तसे झाल्यास कंपनीचा पुढील तीन महिन्यांचा नफा सुमारे ६,००० कोटी असेल. सुधारलेल्या अर्थव्यवस्थेमुळे रिलायन्सच्या पॉलिस्टर यार्न या प्रमुख उत्पादनाच्या मागणीत दोन आकड्यात वाढ दिसून आली आहे. तर किरकोळ व्यवसायाने मागील तिमाहीत ९९ कोटी नफ्याचा टप्पा पार केला आहे. कंपनीकडे ३० सप्टेंबर २०१४ अखेर ८३,४५६ कोटींची रोकड सममूल्य गुंतवणूक असून या तिमाहीत कंपनीने ४५,००० कोटींचा भांडवली खर्च केला आहे. हा भांडवली खर्च प्रामुख्याने कंपनीच्या जामनगर, दहेज व हाजिरा येथील पेट्रो रसायन संकुलाची क्षमता वाढ व उत्पादनातील अडथळे दूर करण्यावर खर्च झाले. यापकी २०,००० कोटी रिलायन्स जिओच्या ‘फोर जी’ प्रकल्पाचा पाया रचण्यासाठी खर्च झाले.
युरोप अमेरिकेतील हिवाळ्याला नोव्हेंबरपासून सुरुवात होते. इंधनाची मागणी वाढल्यामुळे येत्या तिमाहीत आशियातील तेल शुद्धीकरण कारखान्यांचा नफा अर्धा ते पाऊण टक्का अधिक असण्याची शक्यता वाटते. तेल व वायू मंत्रालयाकडून नसíगक वायू दरवाढीची घोषणा विधानसभेच्या निवडणुका उरकरल्याने लवकरच होणे अपेक्षित आहे. आíथक वर्ष २०१५ चे उत्सर्जन (ईपीएस) ८८ तर २०१६ चे उत्सर्जन ९२ असणे अपेक्षित आहे. आम्ही येत्या वर्षभरासाठी १,१९८ रुपये भावाचे लक्ष्य निर्धारीत करीत आहोत.
* निशा शर्मा nisha.sharma@krchoksey.com .ूे
(केआर चोक्सी या दलाल पेढीत तेल व वायू क्षेत्राच्या विश्लेषक आहेत)
(टीप: ही शिफारस शनिवारी झालेल्या वायू दर निश्चितीच्या निर्णयापूर्वी केली गेली आहे.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा