तेजीमध्ये कधी काय होऊ शकते ते गेल्या दोन आठवडय़ात दिसून आले. ‘माझा पोर्टफोलियो’मधून सुचविलेला ‘इंडियन अॅक्रिलिक्स’ला लागोपाठ चार दिवस वरचे सíकट लागल्यानंतर तो पडायला लागला. ४.९० रूपयांवर खरेदीची शिफारस केलेला हा शेअर चार दिवसांत ९.३८ च्या नव्या उच्चांकावर पोहोचला आणि नंतर उतरती कळा सुरू झाली. अशा वेळी गुंतवणूकदारांनी काय करावं, असा साहजिक प्रश्न काही वाचकांना पडला असणार! कारण आपण गुंतवणूक कालावधी दोन वर्षांकरिता दिला होता आणि भावाचे उद्दिष्ट तर एका आठवडय़ातच प्राप्त झाले. काही हुशार गुंतवणूकदारांनी हा शेअर उद्दिष्ट गाठल्यावर विकला असेल तर ते योग्यच म्हणायला हवे. कारण पुन्हा खालच्या भावात हा शेअर मिळणे शक्य आहे. वेळेपेक्षा उद्दिष्ट महत्वाचे असल्याने संधी मिळताच नफा पदरात पडून घेणे कधीही उत्तम!
हॅवेल्स इंडिया हे नाव बहुतांश वाचकांना परिचित असेल. रोजच्या वापरातील विजेची अनेक उपकरणे उत्पादित करणारी ही कंपनी ऊर्जा वितरणासंबंधित उपकरणांची निर्मितीही करते. घरगुती तसेच वाणिज्य उपकरणांचे उत्पादन करणारी ही भारतातील एक मोठी आणि आघाडीची कंपनी आहे. मुख्यत्वे स्विचगीयर्स , केबल्स आणि विद्युत उपकरणे यांचे उत्पादन करणाऱ्या हॅवेल्सचे देशांतर्गत सात कारखाने असून परदेशांतही युरोप, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका येथे उत्पादन केंद्रे आहेत. १९८३ मध्ये छोटय़ा स्तरावर सुरू झालेली ही कंपनी १९९२ मध्ये पब्लिक लिमिटेड कंपनी झाली आणि नंतर कंपनीचा पसारा वाढतच गेला. जर्मनीच्या क्रिस्चन गीयर या कंपनीच्या तांत्रिक सहाय्याने सíकट ब्रेकर्सचे उत्पादन तिने सुरू केले. नंतर स्टँडर्ड इलेक्ट्रिकल्स, क्रॅब ट्री इंडिया, डय़ूक अमिका इलेक्ट्रॉनिक्स, एसएलआय लाइटिंग प्रॉडक्ट्स, एसएलआय युरोप बीव्ही इ. कंपन्या ताब्यात घेऊन कंपनीने आपला विस्तार वाढवला. जगभरात वेगाने विस्तार करणाऱ्या हॅवेल्सकडे सध्या क्रॅब ट्री, सिल्वानिया, कॉन्कॉर्ड, लिनोलाइट, लुमिनान्स असे महत्त्वाचे आणि प्रसिद्ध ब्रॅण्ड्स आहेत.
३० सप्टेंबर २०१४ अखेर समाप्त तिमाहीसाठी जाहीर झालेल्या कंपनीच्या आíथक निकर्षांप्रमाणे यंदाच्या तिमाही उलाढालीत १६% वाढ होऊन ती १,३५३ कोटी रुपयांवर गेली आहे, तर नक्त नफ्यात ५% घट होऊन तो ११९.६ कोटींवर आला आहे. याच क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत हा शेअर थोडासा महाग वाटत असला तरीही मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी राखून ठेवावा असा हा शेअर आहे.
जागतिक व्यवसायात गुंतवणूक
तेजीमध्ये कधी काय होऊ शकते ते गेल्या दोन आठवडय़ात दिसून आले. ‘माझा पोर्टफोलियो’मधून सुचविलेला ‘इंडियन अॅक्रिलिक्स’ला लागोपाठ चार दिवस वरचे सíकट लागल्यानंतर तो पडायला लागला.
First published on: 17-11-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investment in global business