फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, तोपडी, शेले, शाली,
त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पठणी
नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी.
माझी आजी लग्नामधे ही पठणी नेसली होती
पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती
पठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची..अनोळखीची..जाणीव गूढ आहे त्यास..
पठणी – शांता शेळके
मराठी स्त्रीच्या मनात पठणीला खास जागा असते. आणि ती पठणी जर आजीची असेल तर त्याला वेगळे भावनिक मोल असते. शांताबाईनी अशाच एका पठणीचे वर्णन त्यांच्या या कवितेत केले आहे. आज शिफारस करण्यात आलेली कंपनीदेखील आपल्या गुंतवणुकीतील पठणीचे स्थान असलेली अशीच आहे.
प्रकल्प व्यवस्थापन, औद्योगिक उत्पादने, यंत्रसामग्री, माहिती तंत्रज्ञान, अवजड अभियांत्रिकी, वीजनिर्मिती उपकरणे, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, पतपुरवठा, रस्ते बांधणी, म्युच्युअल फंड व्यवस्थापन अशा अनेक व्यवसायात असलेली ही कंपनी आता बँकिंग परवाना मिळविण्याच्याही प्रयत्नात आहे, असे वारंवार ऐकण्यास मिळते. अभियांत्रिकीकडून वित्तीय सेवा व म्युच्युअल फंड व्यवस्थापनापर्यंत केलेली वाटचाल ही बँकिंग व्यवसायाच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे. रिझव्र्ह बँक जेव्हा बँकिंग व्यवसायासाठी नवीन परवाने देईल तेव्हा या कंपनीला परवाना मिळेल, अशी आशा करावयास हरकत नाही.
गुंतवणूक करायची कारणे :
* प्रकल्प व्यवस्थापन विभाग (ईपीसी) : खते, पेट्रो – रसायने संकुल, खोल समुद्रातील तेल उत्खनन आदी प्रकल्पांबरोबरच कंपनीचे खोल समुद्रात तसेच जमिनीवर तेल-गॅस वाहून नेणाऱ्या पाईपलाईनचे जाळे आहे. ओएनजीसी, ब्रिटिश गॅस, कतार पेट्रोलियम, शेल या महाकाय कंपन्या या विभागाच्या ग्राहक कंपन्या आहेत.
* एलटी पॉवर : ही कंपनी कोळसा गॅस व अणुऊर्जेवर आधारित वीजनिर्मिती क्षेत्रात आहे. सहनिर्मिती व स्वतंत्र ऊर्जा निर्मितीसाठी प्रकल्प उभारणी व परिचालन तसेच जपानच्या मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजबरोबर बाष्पक व वीजनिर्मिती उपकरणांची निर्मिती हजिरा येथे केली जाते. १,००० मेगावॅट पर्यंतची संपूर्ण वीजनिर्मिती यंत्रणा – यामध्ये कोळसा वाहतूक यंत्रणा, राख वाहतूक यंत्रणा, यासाठीचे बांधकाम अशा व्यवसायांचा या विभागात समावेश होतो.
* अवजड अभियांत्रिकी विभाग : जगातील पहिल्या तीन अवजड अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये हा समूह येतो. संरक्षण विभाग, पायाभूत सुविधा यात वीजनिर्मिती, तेल उत्खननासाठी लागणारे तरंगते फलाट, तेलवाहू कंटेनर वाहून नेणाऱ्या २०,००० टनपर्यंतच्या बोटी तसेच विविध वायू वाहून नेणाऱ्या बोटी, नाविक दलाच्या पाणबुडय़ा यांची निर्मिती या विभागात होते. कंपनीमार्फत भारतातील पहिल्या अणुइंधन पाणबुडीची उभारणी सुरू आहे.
* बांधकाम विभाग : भारतातील सर्वात मोठा बांधकाम विभाग या कंपनीचा आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, धरणे, रेल्वेचे पुल, महामार्गावरचे पुल, टोल महामार्ग आदीची आखणी, बांधणी व हस्तांतर यामार्फत होते. सध्या चच्रेत असलेल्या मंत्रालयाच्या दोन मजल्याच्या पुनर्बाधणीच्या कंत्राटासाठी कंपनीनेही निविदा भरली होती.
* विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभाग : तेलशुद्धीकरण व पेट्रो-रसायन संकुले, सीमेंट निर्मिती, पोलाद निर्मिती, कारखान्यांसाठी वीजपुरवठा या संकुलातील विविध नियंत्रण व त्यासाठी लागणारी यंत्रणा हा विभाग पुरवितो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा