हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
निर्देशांक कुठपर्यंत वर जाईल याबाबत मतमतांतरे असली तरी निर्देशांक वर नेण्यात बँकांच्या समभागांचे मोठे योगदान असेल यावर सर्वाचेच एकमत आहे. विविध सात निकषांवर अव्वल ठरलेल्या सात बँकांच्या वित्तीय निकालांच्या आढाव्याचा हा उत्तरार्ध. गुंतवणुकीत समतोल राखण्यासाठी या सात बँकाचे आपल्या पोर्टफोलियोत एकत्रित मिळून २५%च्या आसपास प्रमाण असायलाच हवे.
सरकारने गेल्या आर्थिक वर्षांतील चौथ्या तिमाहीचे व आíथक वर्ष २०१२-१३ च्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचे आकडे शुक्रवारी जाहीर केले. चौथ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनात ४.८% तर संपूर्ण वर्षभरात ५% वाढ नोंदवली. २०१४ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनात ६% च्या दरम्यान (५.७५%-६.२५%) वाढ होईल, असा अंदाज आहे.
१७ जूनला रिझव्र्ह बँक पतधोरणाचा मध्य तिमाही आढावा घेणार आहे. त्याआधी मे महिन्याच्या महागाईचे व एप्रिल महिन्याच्या औद्योगिक उत्पादनाचे आकडे जाहिर होतील. रिझव्र्ह बँकेला दर कपातीस अतिशय मर्यादित वाव असल्यामुळे पाव टक्क्याची दर कपात व अध्र्या टक्क्याची रोख राखीव दरातील कपात होण्याची आशा अधिक आहे. वरील दोन्ही आकडे जाहीर झाल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल. संभाव्य दरकपात लक्षात घेता बँकेसारख्या समभागांतील गुंतवणूक अल्प व दीर्घ कालावधीसाठी लाभदायक ठरू शकेल.
भारतीय स्टेट बँकेच्या गेल्या आíथक वर्षांच्या चौथ्या तिमाहीचे निकाल हे नफा कमी झाल्याच्या भीतीने भाव ८% आपटावा इतके मुळीच वाईट नाहीत. तिमाहीत कर्जे मागील तिमाहीपेक्षा ६.९% वाढली आहेत. वैयक्तिक ग्राहकांनी घेतलेल्या कर्जात वाढ होण्यास वाहन कर्जे ३५.५% तर गृहवित्त पुरवठा १६.७% वाढली. या तिमाहीअखेर कर्जाचे ठेवींशी असलेले प्रमाण (CD Ratio) ३.८१% वाढून ८६.९% झाले आहे.
व्याजाचे उत्पन्न ५.३% घटल्यामुळे तर तरतुद व वार्षिक करपूर्व नफा १९.१% घट झाली आहे. यापकी ९५० कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या वेतन थकबाकीच्या तरतुदीचे आहे. त्यामुळे परिचलन खर्चात २०.३% वाढ दिसून येते. अनुत्पादित कर्जाच्या प्रमाणात घट झाली आहे. जास्त तरतूद केल्यामुळे निव्वळ नफ्याचे तरतुदींशी असलेले प्रमाण (Provision Coverage Ratio) ५.०९% ने सुधारले आहे.
संपूर्ण वर्षांचा नफा मागील वर्षांपेक्षा २०.५०% वाढून १४,१०५ कोटी रुपये झाला. पर्याप्त भांडवलाच्या प्रमाणात (Capital Adequacy Ratio) ०.७१% सुधारणा झाली आहे. निकालांनंतर बँकेचे पुस्तकी मूल्य वाढून रु. १,८३२ झाले.
एचडीएफसी बँक
या वेळच्या निकालांचे वैशिष्टय़ म्हणजे एचडीएफसी बँकेने अव्वल निकाल देण्याची परंपरा या तिमाहीत कायम राखली. व्याजाच्या निव्वळ उत्पन्नात (कर्जावरील व्याज व ठेवींवरील व्याजातील फरक) २०.६% घटूनही संपूर्ण वर्षांच्या नफ्यात ३०.१% वाढ झाली. अनुत्पादित कर्जाच्या पोटी कराव्या लागणाऱ्या तरतुदीत मोठी घट झाली आहे. या शेअरमधील गुंतवणूकीतून लगेचच मोठा परतावा मिळणार नाही. हा शेअर ६४०-६५० पर्यंत येण्याची वाट पाहून खरेदी करावा.
बँक ऑफ इंडिया
बँकेच्या या वर्षीच्या निकालांचे वैशिष्टय़ म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा हिस्सा वाढल्यामुळेच शुल्क आधारित उत्पन्नात वाढ झाली. अनुत्पादित कर्जापोटी करावी लागणारी तरतुदीत एकूण उत्पन्नाच्या तुलनेत फारसा फरक झालेला नाही. यानंतरच्या दोन तिमाहीत अर्थव्यवस्था सुधारली तर तरतुदींचे प्रमाण घसरेल असे वाटते. सध्याचा भाव प्रति समभाग उत्पन्नाच्या आठ पट आहे. ही गुंतवणूक वर्षभरात बँकेक्सच्या अपेक्षित परताव्या प्रमाणे (१०-१२%) परतावा मिळेल.
कॉर्पोर्पोरेशन बँक
मागील वर्षांपेक्षा यावर्षी शुल्क आधारित उत्पन्नात ३५.३% वाढ झाली तर व्याजाच्या निव्वळ उत्पन्नात ११.६५% वाढ झाली. अनुत्पादित कर्जापोटी करावे लागणारी तरतूद मागील वर्षांच्या तुलनेत कमी झाली हे वैशिष्टय़च म्हणावे लागेल. कर्जे १८.८% तर ठेवी १६.६% वाढली.
एकूण ठेवीत चालू व बचत खात्याच्या प्रमाणात जवळजवळ अध्र्या टक्क्याची कमतरता आली आहे. निधी व्यवस्थापनातून (Treasury) मिळालेले उत्पन्न ९६ कोटी रुपयांवरून १२४ कोटी रुपये झाले आहे. येत्या तिमाहीत एकूण ठेवीत चालू व बचत खात्यांच्या ठेवींचे प्रमाण बँकिंग उद्योगाच्या सरासरीच्या वर पुन्हा वाढविण्याचे धोरण बँक आखेल. अध्र्या टक्क्याची वाढ येत्या दोन तिमाहीत गाठण्याची शक्यता लक्षात घेता जानेवारी २०१४ पर्यंत भाव रु. ४५० असेल.
जम्मू काश्मीर बँक
जुल ऑगस्ट २०१२ मध्ये मिडकॅपच्या शृंखलेतून ज्या दोन बँकांची शिफारस केली होती त्यापकी या बँकेची ९०० भाव असताना शिफारस केली होती. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी या बँकेच्या समभागाने १,४७३ चा उच्चांक प्रस्थापित केला होता. निव्वळ व्याजाच्या उत्पन्नात २३% वाढ झाली असून इतर उत्पन्नातील वाढ ही एका विमा कंपनीतील हिस्सा विकल्यामुळे झाली आहे. पर्याप्त भांडवलाचे प्रमाण १०.८% आहे. बँकेला बाझल-३ साठी इतर खाजगी बँकांप्रमाणे भांडवलाची गरज दोन वष्रे भासणार नाही. सध्या ६८९ शाखा व ६१३ एटीएमच्या माध्यमातून बँक व्यवसाय करते. येत्या दोन वर्षांत ३०० नवीन शाखा ही बँक उघडणार आहे. या शाखा विस्तारानंतर एकूण संख्या १,००० चा टप्पा पार करेल. आणि म्हणूनच सर्वात जास्त भांडवल वृद्धीची शक्यता असणारी ही बँक आहे. बँकेचे कर्जाचे ठेवींशी प्रमाण खूपच कमी आहे. हे प्रमाण वाढेल, अशी नफाक्षमता वाढेलेली दिसेल.
युनियन बँक ऑफ इंडिया
तीन लाख कोटी रुपयांपेक्षा मोठा ताळेबंद असलेल्या सहा राष्ट्रीयकृत बँकांमधील युनियन बँक म्हणजे सातत्य. यावर्षी अनुत्पादित कर्जापोटी करावे लागणाऱ्या तरतुदीत अपेक्षेपेक्षा जास्तच वाढ झाली. व्याज व्यतिरिक्त उत्पन्न व निधी व्यवस्थापनातून आलेल्या उत्पन्नात ६.५% वाढ झाली. ठेवींमध्ये १८.३५% वाढ झाली त्यापकी १७.०२% वाढ चालू खाते बचत खाते ‘CASA’ यांच्यामार्फत झाली. ३१ मार्च रोजी या ठेवींचे प्रमाण ३०.९% होते.
३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेच्या लौकिकास हे प्रमाण कमी वाटते. अनुत्पादित कर्जापोटी करावे लागणाऱ्या तरतुदीत वाढ झाली असली तरी एकूण कर्जाच्या तुलनेत अनुत्पादित कर्जाचे प्रमाण ०.४६% कमी झाले आहे. चौथ्या तिमाहीत बँकेने १,४०० कोटी रुपयांच्या कर्जाची पुनर्रचना केली आहे. या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत व्याजातील फरकात (NIM) सुधारणा होणे अपेक्षित आहे. बँकेच्या सध्याचा समभाग मूल्याचे पुस्तकी किमतीशी गुणोत्तर ०.६५ आहे.