अर्थसंकल्प कसाही असो; काही कंपन्यांच्या शेअरवर त्याचा काही विपरीत परिणाम होताना दिसत नाही. अशा कंपन्यांचे शेअर पुस्तकी मूल्य, प्राइस अìनग गुणोत्तर किंवा ईपीएस अशी गुणोत्तरे तपासून थोडे महाग वाटले तरीसुद्धा पोर्टफोलियोमध्ये बाळगून केवळ फायदाच होताना दिसतो. उदा. प्रॉक्टर अँड गॅम्बल, जिलेट, ब्ल्यू डार्ट, क्रिसिल, एमआरएफ इत्यादी. अनेक कंपन्या केवळ त्यांच्या नावावर आणि गुणवत्तेवर अधिमूल्य गाजवताना दिसतात. बहुराष्ट्रीय बीपी समूहाची कॅस्ट्रॉल ही अशीच एक उत्तम कंपनी आहे. गेल्या २० वर्षांत भारतामध्ये या कंपनीने उत्तम प्रगती करून सध्या ती भारतातील तेल आणि ल्युब्रिकंट क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली आहे. डिसेंबर २०१४ साठी संपणाऱ्या आíथक वर्षांचे निकाल तसे स्थिर असले तरीही सध्या वाहन उद्योगातील मंदीचे वातावरण निवळले असून कंपनीकडून पुढील आíथक वर्षांत चांगली कामगिरी अपेक्षित आहे. गेल्या वर्षांत कॅस्ट्रॉल सीआरबी प्लस, कॅस्ट्रॉल सीआरबी टबरे, कॅस्ट्रॉल पॉवर १ आदी उत्पादने बाजारात आणतानाच पुढील वर्षीदेखील दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी कंपनी आपली नवीन उत्पादने भारतीय बाजारपेठेत आणेल. सध्या भारत बेंज, मिहद्र, फोर्ड, टाटा मोटर्स आणि फोक्सवॅगन आदी नामांकित कंपन्यांकडून कंपनीच्या उत्पादनांना मान्यता मिळाली आहे. टाटा मोटर्सच्या सहयोगाने कॅस्ट्रॉल आरएक्स सुपर मॅक्स फ्युएल सेव्हर आता बाजारात आले आहे. पेट्रोल/डिझेलचे उतरलेले दर आणि इंधन भुकेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत माइलेजचे वेड या दोहोंचा फायदा घेऊन कंपनी लवकरच आणखी उत्पादनांची श्रेणी भारतीय बाजारपेठेत आगामी काळात आणेल. उत्तम प्रवर्तक, उत्तम नाममुद्रा आणि गुणवत्ता यामुळे कॅस्ट्रॉलचे भवितव्य उज्ज्वल आहे हे निश्चित. सध्या ५०० रुपयांच्या आसपास असणारा, कुठलेही मोठे कर्ज नसलेला आणि केवळ ०.३ बीटा असणारा हा शेअर मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी आकर्षक वाटतो.
stocksandwealth@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा