portfolio4जे के टायर्स ही जे के समूहाची टायर्सचे उत्पादन करणारी एक अग्रगण्य कंपनी असून जगातील पहिल्या २५ कंपन्यांत तिचा क्रमांक लागतो. भारतात सहा आणि मेक्सिको येथे तीन उत्पादन केंद्रे असलेल्या जे के टायर्सने जगभरातील ३०० देशांत प्रवेश केलेला आहे. १९७७ मध्ये सुरुवात केल्यापासून गेल्या ३७ वर्षांत कंपनीची नऊ कारखान्यांतील एकूण वार्षकि उत्पादन क्षमता दोन कोटी टायर्सची असून, बस आणि ट्रकच्या टायर्स उत्पादनात ती अग्रेसर गणली जाते. भारतामध्ये सध्या १४३ ठिकाणांहून ४,००० डिलर्स आणि १२० रिटेल आऊटलेट असलेल्या या कंपनीची प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर वर्षभर २४ तास चालू असलेली १७ ट्रक रेडियल टायर सेंटर्स देखील आहेत. जे के टायर्स ही भारतातील जवळपास सर्वच मोठय़ा वाहन उत्पादकांना आपल्या टायर्सचा पुरवठा करते. यात प्रामुख्याने टाटा मोटर्स, अशोक लेलँड, व्होल्वो, मिहद्र, बीईएमएल, जनरल मोटर्स, मारुती इ. चा समावेश करावा लागेल.
av-01
कंपनीने जून २०१५ साठी संपणाऱ्या पहिल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणेच जाहीर केले आहेत. कंपनीने १,९५२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ११८ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ११३% ने जास्त आहे. कंपनीचे पत मापांकन देखील ‘ए+’ वरून ‘एए-’ वर गेले आहे. कंपनीने बाजारात एसयूव्हीसाठी नुकतेच आणलेले रेंजर नावाचे टायर्स उलाढाल आणि नफ्यात वाढ करतील. कंपनीचा विस्तारीकरण प्रकल्प देखील फायदेशीत ठरेल अशी आशा आहे. सध्या ११०-१२० रुपयांच्या आसपास असलेला हा हाय बीटा (१.४) शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.
stocksandwealth@gmail.com

pune Penal action against two senior officers for facilitating bogus payments at Jijamata Hospital
पिंपरी : मानधनाची २१ लाखांची बोगस बिले लाटली; दाेन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पाचशे रुपये…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sugar factory workers warn of strike Government announces committee for wage hike Mumbai news
साखर कारखाना कामगारांचा संपाचा इशारा; वेतनवाढीसाठी सरकारकडून समितीची घोषणा
Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
Mumbai Kurla Bus Accident marathi news
विश्लेषण : बेस्टच्या दुर्दशेला जबाबदार कोण? कंत्राटी गाड्या आणि चालकांचा प्रयोग कसा फसला?
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)
Story img Loader