कंपनीने जून २०१५ साठी संपणाऱ्या पहिल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणेच जाहीर केले आहेत. कंपनीने १,९५२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ११८ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ११३% ने जास्त आहे. कंपनीचे पत मापांकन देखील ‘ए+’ वरून ‘एए-’ वर गेले आहे. कंपनीने बाजारात एसयूव्हीसाठी नुकतेच आणलेले रेंजर नावाचे टायर्स उलाढाल आणि नफ्यात वाढ करतील. कंपनीचा विस्तारीकरण प्रकल्प देखील फायदेशीत ठरेल अशी आशा आहे. सध्या ११०-१२० रुपयांच्या आसपास असलेला हा हाय बीटा (१.४) शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.
stocksandwealth@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा