सज्जन जिंदल यांच्या समूहातील जिंदल साऊथ वेस्ट एनर्जी ही ऊर्जा क्षेत्रातील कंपनी. जेएसडब्ल्यू पोर्ट, जेएसडब्ल्यू स्टील अशा इतर कंपन्या या समूहात आहेत. साधारण चारेक वर्षांपूर्वी ११० रुपयांना या कंपनीचे शेअर्स आयपीओद्वारे विकण्यात आले होते. तेव्हा ऊर्जा कंपन्या तेजीत असल्याने हा आयपीओ देखील चांगलाच यशस्वी ठरला होता. गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला तर अदानी पॉवर, इंडियाबुल्स पॉवर आणि रिलायन्स पॉवर यांच्या तुलनेत जेएसडब्ल्यू एनर्जीची कामगिरी मात्र नक्कीच सरस ठरली आहे. मंदीच्या काळातही गेल्या दोन वर्षांत कंपनीने बऱ्यापकी नफा कमावून भागधारकांना लाभांशही दिला आहे. डिसेंबर २०१४ साठी संपलेल्या तिमाहीचे आíथक निकाल तितकेसे चांगले नाहीत. कंपनीच्या उलाढालीत ९% ने घट होऊन ती २,१५१ कोटींवर आली तर नक्त नफाही ४०% घसरून तो २२२ कोटींवर आला आहे. कोळशाच्या वाढणाऱ्या किंमती, वाढते इंधन दर आणि त्याच्या बरोबरीने मंदीचे वातावरण या सगळ्याचा एकत्रित परिणाम आíथक निकालावर झालेला दिसतो. मात्र कंपनीला लवकरच बारमेर येथील अतिरिक्त खाणकामाला परवानगी मिळणार असून त्यामुळे वीज उत्पादन अबाधित चालू राहील अशी अपेक्षा आहे. या खेरीज कंपनीचे वीज पुरवठय़ाचे कंत्राट २०१५ पर्यंत असल्याने विजेचे दरही अबाधित राहून निवडणुकांचा विपरीत परिणाम अपेक्षित नाही. खराब आíथक कामगिरीमुळे सध्या कंपनीचा शेअर  ६० वरुन घसरून ४२-४३ रुपयांवर आला आहे. (खरे तर सर्वच ऊर्जा कंपन्यांना ऊर्जेची गरज आहे.) यंदाच्या आíथक वर्षांतही कंपनीकडून विशेष कामगिरीची अपेक्षा नसली तरी सध्या पुस्तकी मूल्याला उपलब्ध असलेला हा शेअर वर्षभरात २५% परतावा देऊ शकेल. तसेच पुढील आíथक वर्षांत कंपनीकडून भरीव कमगिरीची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी २०% लाभांश देणाऱ्या या शेअरची खरेदी मात्र ४०च्या आसपास करावी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jindal south west energy limited