वयाच्या तिशीच्या आसपास एखादे मूल जन्माला आले की तरुण आई-वडिलांना अचानक जबाबदारीची जाणीव होते आणि गुंतवणूक आणि विमाछत्र या दोन गोष्टींचा ते गंभीरपणे विचार करायला लागतात. विचार स्तुत्य आहे. परंतु हे सर्व प्रत् क्षात आणण्यासाठी जी आíथक साक्षरता लागते त्याची उणीव असते. दुर्दैवाने स्वत:मधील या उणिवेची कित्येकांना कल्पनाही नसते. घरामधील वडिलधाऱ्यांना, मित्राला किंवा विमा विक्रेत्याला किंवा विश्वासाच्या बँक कर्मचाऱ्याला सल्ला विचारला जातो. यापकी पहिल्या दोन व्यक्ती नकळतपणे चुकीचा सल्ला देतात. त्यामागे त्यांचा काही लाभ किंवा सुप्त हेतू नसतो. विमा एजंट किंवा बँक कर्मचारी यांचा सल्ला देण्यापेक्षा पॉलिसीच्या विक्रीवर जास्त भर असतो. विमा एजंटला कमिशनमध्ये इंटरेस्ट असतो तर बँक कर्मचाऱ्याला त्याचे नेमून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करायचे असते.
एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळ या भारतातील अग्रगण्य सार्वजनिक विमा कंपनीची एक लोकप्रिय पॉलिसी जीवन आनंद आणि त्याच कंपनीची लिमिटेड पेमेन्ट व्होल लाइफ पॉलिसी या दोन पॉलिसींचे एकत्रीकरण करून सुपर आनंद ही पाककृती तयार केली आहे. ‘मॅजिक मिक्स’ या नावाने ती विकली जाते.
वयाच्या तिशीच्या आसपास एखादे मूल जन्माला आले की तरुण आई-वडिलांना अचानक जबाबदारीची जाणीव होते आणि गुंतवणूक आणि विमाछत्र या दोन गोष्टींचा ते गंभीरपणे विचार करायला सुरुवात करतात. विचार स्तुत्य आहे. परंतु हे सर्व प्रत्यक्षात आणण्यासाठी जी आíथक साक्षरता लागते त्याची उणीव असते. दुर्दैवाने स्वत:मधील या उणिवेची कित्येकांना कल्पनाही नसते. घरामधील वडिलधाऱ्यांना, मित्राला किंवा विमा विक्रेत्याला किंवा विश्वासाच्या बँक कर्मचाऱ्याला सल्ला विचारला जातो. यापकी पहिल्या दोन व्यक्ती नकळतपणे चुकीचा सल्ला देतात. त्यामागे त्यांचा काही लाभ किंवा सुप्त हेतू नसतो. विमा एजंट किंवा बँक कर्मचारी यांचा सल्ला देण्यापेक्षा पॉलिसीच्या विक्रीवर जास्त भर असतो. विमा एजंटला कमिशनमध्ये इंटरेस्ट असतो तर बँक कर्मचाऱ्याला त्याचे नेमून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करायचे असते. आता तर बँकांनी नवा फतवा काढला आहे. ८ नोव्हेंबरच्या वृत्तानुसार जो कर्मचारी जीवन विम्याची विक्री जास्त करेल त्याला परदेशात प्रशिक्षणासाठी पाठविण्याबाबत प्राधान्य दिले जाईल. आता बोला!
३३ वर्षांच्या रमेशला (नाव बदलेले आहे) गुंतवणूक, विमा आणि प्राप्तिकर बचत या तीन गोष्टींमध्ये रस होता. त्याच्या माहितीनुसार हे तीन पक्षी एकाच दगडात मारायचे असतील तर उत्तम पर्याय म्हणजे एलआयसी. रमेश कंपनीच्या संकेतस्थळावर स्वत:ची माहिती नोंदवतो आणि त्याला कंपनीच्या थेट विक्री करणाऱ्या विभागातून विक्री अधिकाऱ्याचा फोन येतो. प्रत्यक्ष भेटीची वेळ ठरते आणि वरिष्ठ विक्री प्रतिनिधी (सिनीयर सेल्स एक्झिक्युटिव्ह) हुद्दा धारण करणारी एक तरुणी त्याला येऊन भेटते. जीवन आनंद, रिटायर अ‍ॅण्ड एन्जॉय वैगरे पर्यायांची त्याला माहिती देते. त्याच्या गरजांसाठी सुपर आनंद मॅजिक मिक्स हे मिश्रण (कॉम्बो प्लान) अगदी योग्य आहे, हे रमेशला पटवून देते. एकाच बठकीत गुंतवणूक दीर्घ पल्ल्याचे विमाछत्र आणि प्राप्तिकर बचत ही तिन्ही उद्दिष्टे साध्य झाल्याने रमेश एकदम खूश.
रमेशला देऊ केलेल्या सुपर आनंदची माहिती.
पॉलिसी १) जीवन आनंद २) व्होल लाइफ लिमिटेड पेमेन्ट प्लान.
पॉलिसींच्या टर्म १) ६७ वष्रे २) ४७ वष्रे
प्रीमियम भरायच्या टर्म १) २१ वष्रे २) २१ वष्रे
विमाछत्र १) रु. १७,५०,००० २) रु. ३,५०,००० एकूण रु. २१,००,०००
अतिरिक्त अपघाती मृत्यू १) रु. ५,००,००० रु. २) रु. ३,५०,००० एकूण रु. ८,५०,०००
वार्षकि प्रीमियम १) रु. ९१,०६९ २) रु. १२,२११ एकू ण रु. १,०३,२८०
पॉलिसींचे लाभ :
१. दोन्ही पॉलिसींना वार्षकि बोनस लागू आहे. सध्याचा दर आहे १) ४८ रु. प्रति हजार २) ७० रु. प्रति हजार.
२. दोन्ही पॉलिसींचा सध्याचा फायनल अ‍ॅडिशनल बोनसचा दर आहे १) १०० रु. प्रति हजार २) ३,५५० रु. प्रति हजार
हे आजचे दर पूर्ण कालावधीसाठी गृहीत धरले तर पॉलिसीच्या २२ व्या वर्षी, म्हणजे रमेशच्या वयाच्या ५५व्या वर्षी त्याला रु. ३६,८९,००० प्राप्त होणार. त्या कालावधीत त्याच्या मृत्यूच्या संभावनेत त्याच्या वारसाला रु. २१,००,००० अधिक जमा बोनस इतकी रक्कम प्राप्त होणार. अपघाती मृत्यू झाला तर रु. २९,५०,००० + जमा बोनस इतकी रक्कम मिळणार.
रमेशच्या वयाच्या ५४ व्या वर्षांनंतर त्याला प्रीमियम भरायची गरज नाही. परंतु त्याच्या ८० व्या वर्षांपर्यंत दर वर्षी त्याचे विमाछत्र + जमा बोनस वाढत जाणार. ८०व्या वर्षांची रक्कम आहे रु. ४४,९४,०००. ८१ व्या वर्षी त्याला रु. २७,४४,००० मिळणार आणि त्या वर्षांपासून त्याच्या शंभरीपर्यंत त्याचे विमाछत्र असणार रु. १७,५०,०००. कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्याने दिलेल्या चित्रांकनाचा त्याने खोलात जाऊन विचार केला की, कंपनी तर व्यवसाय करण्यासाठी बाजारात उतरलेली आहे. तर मग ‘माझ्या मृत्यूच्या संभवनेत माझ्या वारसाला पसे देणार. मी टर्म ‘तरून’ गेलो तर मला पसे देणार आणि त्यानंतर एकही पसा न भरता केव्हाही मृत्यू झाला तरी वारसाला पसे देणार. हे गौडबंगाल काय आहे? कंपनी माझ्यावर इतकी का मेहेरबान?’
सर्वसाधारणपणे कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की ती आपल्याला हवी, हा कल. रमेश जरा वेगळ्या विचारसरणीचा आहे. त्याला काही फुकट मिळत असेल तर तो जरा जास्त जागरूक होतो. या त्याच्या स्वभावानुसार त्याने एका तज्ज्ञाकडून ‘मॅजिक मिक्स’चे विश्लेषण करून घेतले आणि इतर काय पर्याय आहेत का त्याची माहिती काढली.
विश्लेषण :
१. रमेश २१ वर्षांमध्ये प्रीमियम पोटी एकूण रु. २१,६८,८८० भरणार आहे, आणि त्याचे मूळ विमाछत्र आहे २१ लाख रुपयांचे.
२. दाखविलेले बोनसचे आकडे हे आजच्या दरानुसार गृहीत धरलेले आहेत. ती रक्कम कमी किंवा जास्तही होऊ शकते. कंपनी त्याबाबतीत कोणत्याही प्रकारची हमी देत नाही. म्हणजे गुंतवणुकीच्या बाबतीत तो पूर्वनियोजित धोका पत्करणार आहे.
३. वयाच्या ६० ते ६५च्या आसपास रमेशची कमाई बंद होणार आहे. त्यामुळे त्याची ‘इकॉनॉमिक व्हॅल्यू’ शून्य होणार. जीवन विम्याच्या मूलभूत तत्त्वानुसार त्या वेळी जीवनविम्याची गरजच नाही.
 ४. रमेशचा ८० व्या वर्षी (म्हणजे जेव्हा त्याचे विमाछत्र आणि बोनस मिळून सर्वात जास्त रक्कम असणार तेव्हा) मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला ४४,९४,००० रुपये मिळणार. वार्षकि १० टक्के भाववाढीचा विचार केला तर त्या रकमेची आजची बाजारी किंमत होते रु. ५१,०००. जर ८५ व्या वर्षी मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला मिळणाऱ्या रु. १७,५०,००० ची आजची बाजार किंमत होते रु. १२,३२०.
पर्याय :
विमाछत्र आणि गुंतवणूक या दोन गोष्टी वेगवेगळ्या हाताळल्या तर रमेशला जास्तीचे विमाछत्र मिळू शकते आणि गुंतवणूकही जास्त प्रमाणात परतावा देऊ शकते. त्यासाठी त्याच्याकडे दोन पर्याय आहेत. ‘क्लेम सेटलमेंट’च्या बाबतीत टॉपच्या दोन कंपन्यांपकी कोणत्याही एका कंपनीची त्याने ५० लाख रुपयांच्या विमाछत्राची ३० वर्षांच्या टर्मची प्युअर टर्म पॉलिसी घेतली तर काय होते ते पाहू या –
कंपनी क्र.१ : वार्षकि प्रीमियम रु. २०,२५०. ३० वर्षांचे एकूण प्रीमियम रु. ६,०७,५००. सुपर आनंदच्या एकूण प्रीमियमच्या तुलनेत बचत रु. १५,६१,३८० (२१,६८,८८०-६,०७,५००). ही रक्कम त्याने वार्षकि रु. ७८,१०० प्रमाणे गुंतवणुकीच्या ठोस पर्यायामध्ये गुंतविली तर त्याला प्राप्तिकरात सूटही मिळेल आणि २० वर्षांनी त्याच्याकडे प्राप्तिकरमुक्त अशी रु. ४१,९९,३८० इतकी गंगाजळी तयार होईल आणि तीदेखील खात्रीलायक.
कंपनी क्र . २ : वार्षकि प्रीमियम रु. ८,४३१. ३० वर्षांचे एकूण प्रीमियम रु. २,५२,९३०. बचत रु. १९,१५,९५०. ही रक्कम वार्षकि रु. ९५,८०० प्रमाणे वरील पर्यायामध्ये गुंतविली तर रमेशच्या वयाच्या ५३ व्या वर्षी त्याच्याकडे प्राप्तिकरमुक्त आणि खात्रीलायक अशी रु. ५१,५१,४८५ इतकी गंगाजळी तयार होईल.
तुलनात्मक आढावा :
विमाछत्र १) सुपर आनंदचे मूळ विमाछत्र आहे २१ लाख रुपये. त्यात दर वर्षी बोनसची रक्कम जमा होत गेल्याने ते ४४.९४ लाख रुपयांपर्यंत वाढत जाते. कंपनी क्र.१ आणि २ चे पहिल्या दिवसापासूनचे विमाछत्र आहे ५० लाख रुपयांच्या मृत्यूच्या संभावनेत विमाछत्राच्या रकमेत इतर गुंतवणुकीची रक्कम जमा केली. एकूण रक्कम वाढत जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता तर बँकांनी नवा फतवा काढला आहे. ८ नोव्हेंबरच्या वृत्तानुसार जो कर्मचारी जीवन विम्याची विक्री जास्त करेल त्याला परदेशात प्रशिक्षणासाठी पाठविण्याबाबत प्राधान्य दिले जाईल. आता बोला!

विमाछत्र २) सुपर आनंदचे विमाछत्र रमेशच्या वयाच्या शंभरीपर्यंत आहे. खरे तर अर्थार्जनाचा काळ संपला की विमाछत्राची गरज नसते. आणि भाववाढीचा विचार केला तर आजपासून ५० वर्षांनंतर क्लेमपोटी मिळणाऱ्या रकमेची आजची किंमत बघितली तर ती फारच क्षुल्लक असते. क्र. १ आणि २ चे विमाछत्र रमेशच्या वयाच्या ६३ वर्षांपर्यंत आहे. ६०व्या वर्षी निवृत्त झाल्यावर त्याला वाटले तर त्याने पुढील हप्ते भरू नयेत.
गुंतवणूक :
सुपर आनंदमध्ये रमेशच्या वयाच्या ५५ व्या वर्षी मॅच्युरिटीपोटी त्याला, ज्याची हमी नाही, अशी ३८.८० लाख रु. इतकी रक्कम मिळणार.
कंपनी क्र. १ आणि २ च्या इतर गुंतवणुकीमध्ये त्याच्या वयाच्या ५३ व्या वर्षी अनुक्रमे ४१.९९ किंवा ५१.५१ लाख रुपये मिळणार.
वयाच्या ५५ व्या वर्षांपर्यंत त्याने प्राप्तिकर वजा जाता ६ टक्के परताव्याच्या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक केली तर वयाच्या ५५ व्या वर्षी त्याच्याकडे ४७.१७ लाख रुपये किंवा ५७.८७ लाख रुपये इतकी गंगाजळी तयार होईल.
कंपनी क्र. १ आणि २ मधील इतर गुंतवणुकीपासून त्याच्या ५५ व्या वर्षी प्राप्त होणाऱ्या गंगाजळीमधून सुपर आनंदमध्ये मिळणाऱ्या ३६.८९ लाख रु. इतकी रक्कम त्याने स्वत:कडे ठेवली आणि बाकीच्या गंगाजळीची प्राप्तिकर वजा जाता ६ टक्के परताव्याच्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये गुंतवणूक केली.
यामुळे त्याच्या वयाच्या ८० व्या वर्षीची गंगाजळी होते अनुक्रमे ४४.१२ लाख रु. किंवा ९०.०४ लाख रु. त्या वेळी त्याचे सुपर आनंदचे गृहीत परताव्यानुसार विमाछत्र आहे ४४.९४ लाख रु. त्यानंतर त्याच्या शंभरीपर्यंत त्याचे विमाछत्र आहे १७.५० लाख रु.
या काळात इतर गुंतवणुकीची रक्कम वाढतच जाणार आहे. समजा रमेश शंभरीपर्यंत जगला गेला तर सुपर आनंदच्या तक्त्यानुसार त्याला १७.५० लाख रु. प्राप्त होणार. तोपर्यंत त्याच्या इतर गुंतवणुकीची गंगाजळी होते १४१.५ लाख रु. किंवा २८८.७८ लाख रु.
थोडक्यात – विमाछत्र आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून केल्या तर रमेश दोन्ही आघाडय़ांवर बाजी मारू शकतो.
(सदर लेख प्रत्यक्ष घटनेवर आधारित आहे आणि विमा इच्छुकांनी आणि गुंतवणूकदारांनी रंगीबेरंगी तक्त्यांमधील आकडेवारीला न भूलता बौद्धिक परिपक्वतेने निर्णयाप्रत पोहोचावे हा उद्देश आहे.)