योगायोगाने या वेळी पुन्हा एका बँकेचा शेअर गुंतवणुकीसाठी सुचवतोय. खरे तर ही बँक माझ्या रडारवर गेले अनेक दिवस आहे. मात्र काही वेळा चांगली गोष्ट घडण्यासाठी योग जुळून यावा लागतो तसे काहीसे या शेअरबाबतीत झाले. गेली ४० वष्रे सातत्याने नफ्यात असणाऱ्या आणि लाभांश देणाऱ्या या बँकेने यंदा हीरक महोत्सवी वर्षांत पदार्पण करतानाच, १ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय करून २०१२-१३च्या आíथक वर्षांत १०५५.१० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गतवर्षीच्या तुलनेत (८०३.२५ कोटी) तो ३१.३५% ने अधिक आहे. मार्च २०१३साठी संपलेल्या तिमाहीतही बँकेने गेल्या वर्षांच्या (३१ मार्च २०१२ची तिमाही) तुलनेत २०.१६% वाढ नोंदवून २५०.०८ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. सध्या ६८५ शाखा आणि ६१३ एटीएम केंद्रे असलेल्या जे अँड के बँकेचे २०१५पर्यंत १००० शाखांचे उद्दिष्ट आहे. जम्मू आणि कश्मीर राज्यातील बँकेचे प्राबल्य आणि तेथील राज्य सरकारची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर भरण्याची सुविधा असलेली ही बँक आता अन्य राज्यांतही अनेक शाखांद्वारे विविध सुविधा पुरवणार आहे. बँकेचे भागभांडवल केवळ ४८.४८ कोटी रुपयांचे असल्याने भागधारकांना यंदा स्प्लिट आणि/ किंवा बोनस भागांची अपेक्षा होती. पण हिरक महोत्सवी वर्षांचे औचित्य म्हणून बँकेने ५००% ( गेल्या वर्षी ३३५%) विशेष लाभांश जाहीर केला आहे. तरी स्र्1+ असे उच्च मानांकन असलेली ही एकमेव बँक गुंतवणूकदारांना कायम फायद्याचीच ठरेल यात शंका नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा