एल अ‍ॅन्ड टी इंडिया प्रुडेंन्स फंड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या १० वर्षांचा विचार केल्यास काही बॅलन्स्ड फंडांचा ३, ५, १० वर्षांचा ‘सिप’ परतावा हा त्या फंड घराण्याच्या लार्ज कॅप फंडांच्या ३, ५, १० वर्षांच्या ‘सिप’ परताव्यापेक्षा ४ ते ५% नी अधिक आहे. बॅलन्स्ड फंडांच्या गुंतवणुकीतील रोखे गुंतवणूक समभागांच्या किमती गडगडत असताना पोर्टफोलिओला स्थर्य देतात. बहुतेक बॅलन्स्ड फंडांची समभाग गुंतवणूक ही मिड कॅपकडे झुकणारी – मल्टी कॅप प्रकारची असते. शेअर बाजाराचा कल जसा असेल त्यानुसार मिड कॅप किंवा लार्ज कॅप प्रकारच्या समभागात गुंतवणूक केली जाते. काही बॅलन्स्ड फंड परताव्याचा दर वाढविण्यासाठी आपल्या गुंतवणुकीत मिड कॅप प्रकारच्या समभागांतून गुंतवणूक करतात. गुंतवणुकीत ६५% समभाग गुंतवणूक असल्यास एका वर्षांनंतर भांडवली नफा करमुक्त असल्याने या फंडांची समभाग गुंतवणूक ६५% पेक्षा अधिकच असते. ‘सिप’साठी बॅलन्स्ड फंडांची निवड करताना केवळ पूर्वपरताव्याचा दर विचारात न घेता परताव्याच्या दरातील सातत्य, संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक परतावा, तसेच शेअर बाजाराच्या पडत्या काळात भांडवलाची सुरक्षितता या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. अन्य बॅलन्स्ड फंडांच्या तौलनिक अभ्यासानंतर ‘एल अ‍ॅन्ड टी इंडिया प्रुडेंन्स फंड’ या फंडाची ‘सिप’ गुंतवणुकीसाठी शिफारस करावीशी वाटते. सोबतच्या कोष्टक क्रमांक १ मध्ये एल अ‍ॅन्ड टी इंडिया प्रूडेन्स फंडाच्या परताव्याच्या दराची अन्य बॅलन्स्ड फंडांच्या परताव्याच्या दराशी तुलना दर्शविली आहे.

सौमेंद्र नाथ लाहिरी हे या फंडाच्या समभाग गुंतवणुकीसाठी निधी व्यवस्थापक आहेत, तर विक्रम चोप्रा फंडाच्या स्थिर उत्पन्न गुंतवणुकीसाठीचे निधी व्यवस्थापक आहेत. लाहिरी यांना एकूण २२ वर्षांचा गुंतवणूकविषयक अनुभव आहे. ‘एल अ‍ॅन्ड टी इंडिया प्रूडेन्स फंडा’च्या समभाग गुंतवणुकीचा विचार करता ३१ मार्च २०१६ च्या गुंतवणुकीच्या विवरणानुसार सर्वाधिक गुंतवणूक (१३.४७%) बँकिंग क्षेत्रातील समभागात आहे. त्याखालोखाल (८.९८%) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागात असून त्याखालोखाल गुंतवणुकीसाठी सुरक्षित क्षेत्र समजले जाणाऱ्या औषधनिर्माण क्षेत्राची निवड केली आहे. अर्थव्यवस्थेच्या आवर्तनाशी निगडित असलेल्या भांडवली वस्तू, सिमेंट बांधकाम व वाहनपूरक उद्योगाला गुंतवणुकीत स्थान दिले आहे. सद्य परिस्थितीत फंडाच्या एकूण गुंतवणुकीपकी ९.१०% गुंतवणूक रोखे प्रकारात केली आहे.

बॅलन्स फंडाचे यश हे तो फंड किती वेगाने बदलत्या परिस्थितीस आत्मसात करतो यावर ठरते. बॅलन्स फंडांनी समभाग गुंतवणुकीतील जोखीम कमी करणे अपेक्षित असते. गुंतवणूक धोरणे व फंडाची कामगिरी यापेक्षा परिस्थितीनुसार समभाग व रोखे यांच्यात योग्य विभागणी यावर ठरते. बदलत्या परिस्थितीत समभाग व रोखे यांच्यात योग्य समतोल राखण्यात व वेगाने योग्य ते बदल करण्यात फंड व्यवस्थापन यशस्वी ठरल्यामुळे म्युच्युअल फंडांची पत निश्चित करणाऱ्या मॉìनग स्टार व व्हॅल्यू रीसर्च या दोन्ही संस्थांनी एल अ‍ॅन्ड टी इंडिया प्रूडेन्स फंडाला ‘फोर स्टार’ ही सर्वोच्चपेक्षा एक पायरी कमी असलेली पत दिली आहे. चढत्या बाजारात मध्यम परतावा व पडत्या बाजारात मुदलाचे संरक्षण बॅलन्स फंडांकडून अपेक्षित असते. गुंतवणूकदारांना या दोन्ही गोष्टी देण्यात फंड यशस्वी ठरला आहे. मागील पाच वर्षांत प्रत्येक तिमाहीत या फंडाचा परतावा संदर्भ निर्देशांकापेक्षा अव्वल ठरला आहे.

मध्यम जोखीम पत्करण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळ चालणाऱ्या एसआयपीसाठी बॅलन्स फंड एक आदर्श गुंतवणूक साधन आहे; गुंतवणूकदार गुंतवणुकीचा कालावधी गुंतवणूक करताना निर्देशांकाचे मूल्यांकन या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात व नंतर पस्तावतात किंवा निधी व्यवस्थापकाला- सल्लागाराला दूषणे देतात; परंतु कुठल्याही गुंतवणुकीची भांडवली वृद्धी होण्यासाठी समभाग गुंतवणूक असल्याने किमान तीन वर्षांचा काळ देणे गरजेचे असते. सद्य परिस्थितीत ३-५ वष्रे दरम्यान ‘सिप’ करू इच्छिणाऱ्या व मध्यम जोखीम स्वीकारण्याची तयारी असणाऱ्या गुंतवणूकदारांनी १२-१५% परताव्याची अपेक्षा असणाऱ्या गुंतवणूकदारांनी या फंडाची निवड केल्यास अपेक्षेइतका परतावा मिळणे शक्य आहे.

 वसंत माधव कुलकर्णी
shreeyachebaba@gmail.com