साधारण दोन दशकांपूर्वी बिगर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून कोलकाता येथून मॅग्मा फिनकॉर्प लिमिटेडच्या स्थापनेसह कार्यान्वयन सुरू झाले. या दोन दशकांच्या कालावधीत मॅग्माने आपला विस्तार मोठय़ा  प्रमाणात वाढवला आहे. आज या आघाडीच्या कंपनीच्या २१ राज्यांतून २०८ शाखा असून त्यामध्ये सुमारे ९,००० कर्मचारी काम करतात. मुख्यत्वे लहान उद्योगांना वित्तीय पुरवठा करणाऱ्या या कंपनीचे वाहन कर्ज, बांधकाम व्यवसायासाठी लागणाऱ्या सामग्रीसाठी कर्ज, सोने कर्ज, गृह कर्ज, शेतीची अवजारे आणि ट्रॅक्टर इ. अनेक व्यवसाय आहेत. मॅग्मा फिनकॉर्पचे, मॅग्मा हाऊसिंग फायनान्स या उपकंपनीतील भागभांडवलात १००% गुंतवणूक असून त्या खेरीज ३७% साधारण विमा कंपनीत तर ७४% मॅग्मा आयटीएल या ट्रॅक्टर कंपनीत गुंतवणूक आहे. डिसेंबर २०१३ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीचे निकाल अपेक्षेप्रमाणे असून कंपनीने ५३६ कोटीच्या उलाढालीवर ३६.२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. तर नऊमाहीसाठी गत वर्षांच्या तुलनेत उलाढालीत ३०% वाढ होऊन ती १,५५६ कोटी रुपयांवर गेली आहे, तर नक्त नफ्यातही १५% वाढ होऊन तो ११३.८ कोटींवर गेला आहे. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाप्रमाणे कंपनीच्या कर्ज वितरणात २०% वाढ होऊनही कंपनीला अनुत्पादित कर्जे मर्यादित ठेवण्यात यश आले आहे. मॅग्मा फिनकॉर्पच्या भागभांडवलात केकेआर, आयएफसी वॉिशग्टन, क्रिस कॅपिटल, मस्कत बँक इ. परदेशी अर्थसंस्थांची गुंतवणूक आहे. सध्या पुस्तकी मूल्याच्या आसपास उपलब्ध असलेल्या मॅग्मा फिनकॉर्पचा शेअर वर्षभरात तुम्हाला २५% परतावा देऊ शकेल.

Story img Loader