१९९८ मध्ये स्थापन झालेली मिहद्र लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी सुप्रसिद्ध मिहद्र समूहातील एक कंपनी आहे. पूर्वी ग्रेट इस्टर्न शििपग या कंपनीच्या सहकार्याने सुरू झालेली ही कंपनी ‘मिहद्र गेस्को’ या नावाने प्रसिद्ध होती. गेल्या १५ वर्षांत कंपनीने अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित करून दाखविले असून एक उत्तम गृहनिर्माण आणि विकसक कंपनी म्हणून तिची ख्याती आहे. गेल्या वर्षांत मंदीमुळे कंपनीच्या आíथक निकालांवर परिणाम झालेला दिसतो. कंपनीच्या उलाढालीत ४.५% घट होऊन ती ७३८ कोटींवरून ७०५ कोटींवर आली आहे, तर नक्त नफ्यात तब्बल २८.८% घट होऊन तो १४१ कोटींवरून १०१ कोटींवर घसरला आहे. गेल्या तिमाहीत कंपनीने चेन्नई येथील मिहद्र वर्ल्ड सिटी (एमडब्ल्यूसी) हा महत्वाकांक्षी एसईझेड प्रकल्प पूर्ण केला असून सध्या जयपूरमध्ये याच धर्तीच्या ‘एमडब्ल्यूसी’चे काम चालू आहे. तर चेन्नई येथे २०० खोल्यांच्या हॉटेलचे काम चालू आहे. व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार कंपनीकडे सुमारे ६६ लाख चौरस फूटाचे काम असून, आगामी २०१५ मध्ये नवीन सहा प्रकल्प चालू होणार आहेत. ठाणे आणि केरळ येथील एसईझेड प्रकल्प देखील लवकरच मार्गी लागतील. मोठ्या शहरांखेरीज कंपनी घरांची मागणी विलक्षण प्रमाण वाढत असलेल्या छोट्या शहरात देखील अनेक प्रकल्प राबवत असल्याने, येती दोन आíथक वष्रे कंपनीसाठी उत्तम असतील. उत्तम प्रवर्तक, रियल इस्टेट कंपनी असूनही कर्जाचा बोजा कमी तसेच येत्या दोन वर्षांसाठी कंपनीकडे असलेले कामकाज यामुळे मिहद्र लाइफस्पेसची खरेदी आकर्षक वाटते.
काही आठवड्यांपूर्वी सुचविलेला जेएसडब्ल्यू एनर्जीचे निकाल अपेक्षेनुसार नाहीत. कंपंनीच्या नक्त नफ्यात गेल्या तिमाहीच्या तुलनेत ४८% घट झाली आहे. सध्या हा समभाग ५५ रुपयांच्या आसपास असून, विकून फायदा पदरात पडून घ्यावा.

Story img Loader