सप्टेंबर सरल्याच्या निमित्ताने ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचविलेले शेअर्स कशी कामगिरी करीत आहेत हे तपासायचा मोह आवरला नाही. शिवाय पोर्टफोलियोसाठी यंदाच्या वर्षांत कोणते शेअर्स सुचविले याची बऱ्याच वाचकांकडून विचारणा होत असे. या नऊमाही आढाव्याच्या निमित्ताने सर्वच वाचकांना आतापर्यंत सुचविलेले (गेल्या दोन आठवडय़ातील सोडून) शेअर्स पुन्हा पाहता येतील. आपल्या पोर्टफोलियोची कामगिरी कशी आहे हे तक्त्यात दिसतेच आहे. परंतु यात महत्त्वाची गोष्ट अशी की याच कालावधीत मुंबई शेअर बाजाराचा परतावा (आयआरआर) केवळ ३९.५ टक्के आहे. या शेअर्सचे आता पुढे काय करायचे याचा निर्णय मात्र गुंतवणूकदारांनी स्वत:च घ्यायचा आहे. या उत्तम कामगिरीमध्ये माझा थोडा फार वाटा असला तरीही शेअर बाजारातील निरंतर तेजीचेही आभार मानायला हवेत. हॅप्पी इन्व्हेस्टिंग..!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा