जून महिना सुरू झाला की वेध लागतात ते अग्रिम कर (Advance Tax) भरण्याचे. प्राप्तिकर खात्याच्या जाहिराती वर्तमानपत्रात झळकू लागतात. कर भरण्याचे आवाहन करणारा रेडिओवर जाहिरातींचा मारा सुरू असतो. अग्रिम कर कोणाला भरावा लागतो, किती भरावा आणि कसा भरावा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. प्राप्तिकर कायद्यातील या बाबतीतील तरतुदी काय आहेत याचा आढावा घेऊ या.
अग्रिम कर कोणी भरावा :
प्राप्तिकर कायदा कलम २०८ प्रमाणे ज्या व्यक्तींचे अंदाजित करदायित्व (उद्गम कर वजा जाता) १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात. ज्या नागरिकांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत ते म्हणजे १. ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे, २. जे निवासी भारतीय आहेत आणि ३. ज्यांच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश होत नाही. या सर्व अटींची पूर्तता झाल्यास अग्रिम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत.
बाजूच्या कोष्टक क्रमांक १ मध्ये आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी (करनिर्धारण वर्ष २०१८-१९) अग्रिम कराच्या तरतुदी उदाहरणादाखल दर्शविल्या आहेत. त्यातील उदाहरण १ मध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या उत्पन्नामध्ये धंदा-व्यवसायाचा समावेश होत असल्यामुळे उद्गम कराच्या तरतुदी लागू होतात. या करदात्याचे एकूण करदायित्व १,४४,२०० रुपये आहे आणि उद्गम कर १ लाख रुपये कापला गेला आहे आणि बाकी कर ४४,२०० रुपये आहे म्हणजेच १०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे अग्रिम कर भरावा लागेल.
उदाहरण २ मध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाचा समावेश नाही आणि वर दर्शविलेल्या सर्व अटींची पूर्तता होत असल्यामुळे या करदात्याला उद्गम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत. हा कर त्याने विवरणपत्र भरताना म्हणजेच ३१ जुलै २०१८ पूर्वी भरला तरी चालेल. त्याला व्याज भरावे लागणार नाही.
उदाहरण ३ मध्ये करदात्याचा एकूण करदायित्व १,०५,५७५ रुपये आहे आणि उद्गम कर १५,००० रुपये कापला गेला आहे आणि बाकी कर ९०,५७५ रुपये आहे म्हणजेच १०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे अग्रिम कर भरावा लागेल.
उदाहरण ४ मध्ये एकूण कर ४,४०,३२५ रुपये आहे आणि उद्गम कर ४,३५,००० रुपये कापला गेला आहे आणि बाकी कर ५,३२५ रुपये आहे म्हणजेच १०,००० रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे या करदात्याला अग्रिम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत.
अग्रिम कर किती भरावा :
प्रत्येक करदात्याला ज्यांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात, त्यांना वर्षांच्या सुरुवातीला आपले उत्पन्न, गुंतवणूक आणि त्यावर देय कर किती याचा अंदाज बांधावा लागतो, उद्गम कर किती होईल हेसुद्धा विचारात घ्यावे लागते. असा उद्गम कर वजा जाता देय कर १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे अशांना अग्रिम कर चार हप्त्यात भरावा लागतो. पूर्वी कंपनीव्यतिरिक्त अन्य करदात्यांना तो तीन हप्त्यात भरावा लागत होता.
वेतन, मानधन आदी नियमित मिळकतींसाठी एकूण उत्पन्नाचा आणि कराचा अंदाज वर्तविणे शक्य आहे. परंतु काही उत्पन्न असे असते की त्याचा अंदाज करता येत नाही. उदा. जर एखाद्याने काही भांडवली संपत्ती विकली आणि त्याला नफा झाला आणि हा नफा वर्षांच्या सुरुवातीला अग्रिम करासाठी विचारात घेणे शक्य नव्हते. अशा वेळी ज्या काळात असा भांडवली नफा झाला त्यावरील कर पुढील अग्रिम कराचा हफ्ता भरताना भरावा लागेल. म्हणजे जर एका करदात्याने नोव्हेंबरमध्ये संपत्ती विकली आणि त्यावर भांडवली नफा झाला तर त्यावरील अग्रिम कर हा १५ डिसेंबरपूर्वी भरावा लागेल.
अग्रिम कर कसा भरावा :
अग्रिम कर हा चलन २८० अन्वये भरावा लागतो. हा कर दोन पद्धतीने भरता येतो. नेट बँकिंगद्वारे आणि बँकेत चलन भरून दोन्ही प्रकारे तो भरता येतो.
कंपनी आणि इतर करदात्यांसाठी ज्यांना लेखापरीक्षण बंधनकारक आहे त्यांना नेट बँकिंगद्वारे अग्रिम कर भरणे बंधनकारक आहे. आणि इतरांसाठी बँकेत चलन भरून अग्रिम कर भरता येतो. जर १५ तारखेला बँक बंद असेल तर तो पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी भरता येतो.
अग्रिम कर वेळेवर भरला नाही तर?
अग्रिम कर वेळेवर भरला नाही किंवा कमी भरला असेल तर व्याज भरावे लागते. हे व्याज दोन कलमांप्रमाणे भरावे लागते.
- कलम २३४ सी : या कलमानुसार प्रत्येक हप्त्यासाठी १% दरमहा असे ३ महिन्यांसाठी व्याज भरावे लागते. जसे वरील उदाहरणात अग्रिम कराचा पहिला हप्ता १५ जूनपर्यंत ६,६३० रुपये भरावयाचा आहे तो न भरल्यास पूर्ण ६,६३० रुपयांवर १% दरमहा ३ महिन्यांसाठी व्याज किंवा त्याऐवजी फक्त ५,००० रुपये भरल्यास बाकी १,६३० रुपयांवर १% दरमहा व्याज ३ महिन्यांसाठी भरावे लागेल. तसेच पुढील सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये अग्रिम कराचा हफ्ता न भरल्यास किंवा कमी भरल्यास पुढील ३ महिन्यांचे व्याज भरावे लागेल आणि मार्च महिन्यात १ महिन्याचे व्याज भरावे लागेल. हे व्याज आर्थिक वर्षांची समाप्ती म्हणजे ३१ मार्चपर्यंत गणले जाते.
- कलम २३४ बी : या कलमानुसार १ एप्रिल ते कर भरल्यापर्यंतच्या महिन्यापर्यंत १% दरमहा या दराने व्याज भरावे लागते. आर्थिक वर्षांपर्यंत एकूण देय कराच्या ९०% पेक्षा कमी कर दिला असेल तर या कलमानुसार व्याज भरावे लागते. एखाद्या करदात्याने आर्थिक वर्ष २०१७-१८ सालचा देय अग्रिम कर ३१ मार्च २०१८ पूर्वी न भरता जुलै २०१८ मध्ये भरल्यास कलम २३४ बी नुसार १ एप्रिल २०१८ पासून जुलै २०१८ पर्यंत म्हणजे ४ महिन्यांसाठी १% दरमहा दराने व्याज भरावे लागेल.
– प्रवीण देशपांडे
(लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार आहेत.)