येणाऱ्या दिवसातील बाजाराच्या घातक चढ-उतारांसाठी सुसज्जता करणारे हे विवेचन
आर्थिक विकासदर पाच टक्क्यांच्या आसपास रेंगाळणार, डिसेंबरअखेर औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग हा एक टक्क्यांच्या खाली म्हणजे उणे ०.६% आला आहे, रिझव्र्ह बँकेने कठोर उपाययोजना करून अजूनही महागाई म्हणावी तशी आटोक्यात येत नाही आहे. (जानेवारी अखेर चलनवाढ दर ६.६२% आहे.) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल तेजीचा आलेख दाखवीत आहे. तेव्हा येणाऱ्या दिवसात या सर्व निराशाजनक बातम्या तेजीच्या वारुला (घोडय़ाला) लगाम घालणार की परदेशस्थ गुंतवणूकदार अर्थसंस्थांच्या पशावर स्वार होऊन नवीन उच्चांकाला गवसणी घालणार याचा आढावा निश्चितच लाखमोलाचा ठरतो.
नोव्हेंबर २०१२ पासून जी तेजी सुरु झाली तिचे प्रायोजकत्व हे परदेशस्थ गुंतवणूकदार संस्था अर्थात ‘एफआयआय’कडे जाते. त्यांच्या नजरेतून आपण तेजी-मंदीचा तुलनात्मक आढावा घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा