आशीष ठाकूर

या स्तंभातील ऑक्टोबर महिन्यातील विविध लेखांमधून अधोरेखित केलेले वाक्य होते – ‘निफ्टी निर्देशांकावर तेजीची कमान ही १७,००० च्या स्तरावर आधारलेली असून, निफ्टीसाठी १७,६०० हा महत्त्वाचा केंद्रिबदू /वळणिबदू (टर्निग पॉइंट) असेल. भविष्यात निफ्टी निर्देशांकाने १७,६०० चा स्तर राखल्यास निफ्टी निर्देशांक आपल्याभोवती ३०० अंशांचा परीघ (बॅण्ड) निर्माण करत पुढे चाल करेल, तांत्रिक विश्लेषणात, निर्देशांक अथवा समभाग आपल्या परिघातच (शेअर मूव्हज इन बॅण्ड) फिरत असतो या सोनेरी नियमाचे प्रत्यंतर आणून देत, निफ्टी निर्देशांकाच वरचे लक्ष्य हे १७,६०० अधिक ३०० अंश १७,९००, पुढे १८,२०० आणि १८,५०० असे असेल.’

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
nada update on hima das suspension creates confusion
हिमा दासच्या निलंबन कालावधीवरून गोंधळ

सरलेल्या सप्ताहात बाजारात तेजीचे पोषक वातावरण निर्माण झाले. आपल्याकडे उत्साहाचे, आनंदाचे असे दिवाळीच वातावरण होते. त्या वेळेला सोमवारच्या लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला अमेरिकेतील भांडवली बाजारातील ‘डाउ जोन्स’वर शुक्रवारी ७५० अंशांची नितांत सुंदर तेजी अवतरली आणि मुहूर्त सौद्याच्या संध्येला म्हणजे सोमवारीही आपल्यासाठी ‘दुग्धशर्करा’ योगाची पर्वणीच होती. अशा वेळेला सर्वाचीच मनोमन खात्री होती की, आज लक्ष्मीपूजनाला निफ्टी निर्देशांकावर १८,००० चे दर्शन होणारच.

मात्र नितांत सुंदर तेजीच्या वातावरणात कुठे माशी शिंकली कोण जाणे! निफ्टीला आपल्या सोनेरी नियमांची अर्थात निर्देशांक अथवा समभाग आपल्या परिघातच (शेअर मूव्हज इन बॅण्ड) फिरत असतो याची आठवण होत, निफ्टी निर्देशांकाने आपल्या ३०० अंशांच्या परिघातील परिक्रमेत तसूभरही फरक न करता १७,६०० ते १७,९०० मध्येच मार्गक्रमण करत, सरलेला संपूर्ण सप्ताहात १७,६०० चा स्तर तोडला नाही की उत्साहाच्या, आनंदाच्या, मनातील उधाण वाऱ्यात १७,९०० चा स्तरदेखील तो पार करू शकला नाही.

निफ्टी निर्देशांकावर १८,००० चे दर्शन झाले नाही याचे निश्चितच दु:ख आहे. पण या परिघातील परिक्रमेतील शिस्तबद्धतेला एकच कृती समर्पक ठरते..‘येथे कर माझे जुळती’ या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.     

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५९,९५९.८५

 निफ्टी : १७,७८६.८०

येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाला १७,६०० ते १७,४५० चा भरभक्कम आधार असेल. या स्तरावर निफ्टी निर्देशांकाने पायाभरणी केल्यास निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १७,९००, १८,२००, १८,५०० असे असेल. अर्थात ही नाण्याची एक बाजू झाली.

आंतरराष्ट्रीय युद्ध, आर्थिक अनागोदींच्या वातावरणामुळे निफ्टी निर्देशांक १७,४५० ते १७,२०० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास त्याचे खालचे लक्ष्य हे १७,००० असेल.

(या स्तंभात निफ्टी निर्देशांकाची वाटचाल, निकालपूर्व विश्लेषण या घटकांसोबतच गुंतवणुकीच्या अथांग महासागरात बुडी मारून उदयोन्मुख समभागांचे मोती वेचणारे ‘शिंपल्यातले मोती’ हा नवीन विभाग पुढील सोमवारपासून सुरू होईल.)

निकालपूर्व  विश्लेषण

१) भारती एअरटेल लिमिटेड 

तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, ३१ ऑक्टोबर     

२८ ऑक्टोबरचा बंद भाव – ८१६.८५ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ८००

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८४० रुपये, द्वितीय लक्ष्य ८९० रुपये.

ब)निराशादायक निकाल : ८०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७६० रुपयांपर्यंत घसरण.

२)  टाटा स्टील लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- सोमवार, ३१ ऑक्टोबर   

२८ ऑक्टोबरचा बंद भाव – १०१.६० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ११० रुपये, द्वितीय लक्ष्य १३५ रुपये.

ब)निराशादायक निकाल : १०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ९० रुपयांपर्यंत घसरण.

३) टायटन कंपनी लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, ४ नोव्हेंबर    

२८ ऑक्टोबरचा बंद भाव – २,७३६.४० रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ४८५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : २,७०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,८४० रुपये, द्वितीय लक्ष्य २,९५० रुपये.

ब)निराशादायक निकाल : २,७०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २,५०० रुपयांपर्यंत घसरण.

4)  स्टेट बँक ऑफ इंडिया

तिमाही वित्तीय निकाल- शनिवार, ५ नोव्हेंबर   

२८ ऑक्टोबरचा बंद भाव – ५७०.७५ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ५७५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५७५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६०० रुपये, द्वितीय लक्ष्य ६२५ रुपये.

ब)निराशादायक निकाल : ५७५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ५५० रुपयांपर्यंत घसरण.

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

Story img Loader