त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी तो थोडा मागे फिरला. पण ६०३८ वर तो जाऊ शकला नाही व त्याच दिवसापासून त्याची घसरण सुरू झाली. मंगळवारी तर त्याने खालच्या बाजूस पोकळी तयार करून दिवसाची सुरुवात केली. ती पोकळी भरून काढण्यासाठी तो बुधवारी वर गेला व ती भरून निघताच परत खाली सरकू लागला.
शुक्रवारी शेवटच्या सत्रात वेगात झालेल्या घसरणीमुळे निफ्टी ५८८३ ही नीचतम पातळी दाखवून आला. हे करताना त्याने आठवडय़ाच्या आलेखावरील ५९४९ व दैनिक आलेखावर दीर्घकालीन एटअ ५८९३ हे आधार त्याने तोडले आहेत. आठवडय़ातील त्याची घट (१.५८%) होती.
गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी अशा ५% विकासदराची वाढ होण्याची शक्यता केंद्रीय सांखिकी संस्थेने वर्तवली व बाजाराला गडगडायला कारण मिळाले. निफ्टीचा पुढील आधार आठवडय़ाच्या आलेखावर ५८८५ इतक्या जवळ आहे.
६१११ पासून चालू असलेली ही घसरण अव्याहत नवव्या दिवशी चालू असल्याने आता दैनिक आलेखावर फरक अतिविक्री क्षेत्रात जाऊन सकारात्मक संकेत देऊ लागला आहे. सतत झालेल्या २२६ अंकांच्या घसरणीनंतर तो थोडा वर जाण्याची शक्यता वाटत आहे. गेल्या सप्टेंबर व नोव्हेंबरला दैनिक आलेखावर दीर्घकालीन एटअच्या खाली बाजार जाताच तो सावरला होता.
परकीय गुंतवणूक संस्थांनी १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत ४,०७२ कोटी (२०१३ मधील सहा आठवडय़ात २४,४७१ कोटी) रुपयांची गुंतवणूक केली तर देशी गुंतवणूक संस्थांनी याच काळात ४,८३१ कोटी रुपयांची (या दरम्यान २२,३६२) नक्त विक्री केली.
बाजार वेध.. : दमछाक.. निरंतर घसरणीने!
सरलेल्या आठवडय़ातील शेअर बाजाराच्या आलेखावर नजर टाकून चालू सप्ताहासाठी त्याचा कल सांगणारे हे नवीन साप्ताहिक सदर.. गेल्या शुक्रवारी निफ्टी ५९८३ चा नीचांक दाखवत असताना दैनिक आलेखावर मध्यमकालीन एटअ, जो ५९९१ वर होता तो आधार तोडताना आढळून आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-02-2013 at 11:59 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market target exhaustion due to continuous fall down