जर्मन कंपनी ‘फॅग’ची  उपकंपनी फॅग बेअरिंग्ज इंडिया लिमिटेला भारतात आता ५० वर्षे पूर्ण होत आहेत. ‘फॅग’ या जगप्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीला तब्बल १२० वर्षांची मोठी परंपरा आहे. भारतातील बाजारपेठेत साधारण ६० टक्के हिस्सा असलेल्या या कंपनीचे सर्वच वाहन उद्योग हे प्रमुख ग्राहक आहेत. यात प्रामुख्याने मारुती, बजाज, अशोक लेलॅण्ड, हीरो, होंडा, हुंदाई, महिंद्र आणि आयशर मोटर आदी सर्वाचाच समावेश आहे. या खेरीज भेल, एबीबी, क्रॉम्प्टन, सीमेन्स वगैरे इंजिनीयरिंग कंपन्यांना देखील फॅगचाच पुरवठा होत आहे. सध्या आशियाई देशात वाहन उद्योगाला उत्तम दिवस असल्याने बेअरिंग्जची मागणी चांगलीच राहील. फॅग जर्मनीचे पाठबळ आणि उत्तम गुणवत्ता यामुळे कंपनीच्या उत्पादनांना देशांतर्गत चांगलीच मागणी आहे आणि यापुढेही राहील. गेल्या मे २०११ पासून उत्पादन क्षमता वाढल्यामुळे तसेच जर्मनीतून आयात होणारी काही उत्पादने आता बारतात उत्पादीत होत असल्यामुळे यंदाच्या डिसेंबर २०१२ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षांसाठी कंपनीकडून साधारण १६०० कोटीच्या उलाढालीची अपेक्षा आहे. तर नक्त नफा २०० कोटींवर जाईल. यंदा ५० वर्ष पूर्ण करणाऱ्या या कंपनीकडून बोनसची किंवा मोठय़ा लाभांशाचीही अपेक्षा आहे. कंपनी व्यवस्थापन नेमके काय देते याची सर्वच जण उत्सुकतेने प्रतीक्षा करीत आहेत.     
फॅग बेअरिंग्ज इंडिया लि.      रु. १६८५
मुख्य प्रवर्तक     :    फॅग जर्मनी
मुख्य व्यवसाय     :    बेअरिंग्जचे उत्पादन
भरणा झालेले भागभांडवल     :    रु. १६.६२ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा     :    ५१%
दर्शनी मूल्य     :     रु. १०    
पुस्तकी मूल्य     :     रु. ४३८
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस)    :    रु. १०३.८
किंमत/उत्पन्न गुणोत्तर (पी/ई)    :    १६.२ पट
वर्षभरातील उच्चांक/नीचांक  :   रु. १८२७/९७८

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा