सचिन रोहेकर
कोटक मिहद्र बँकेची १०० टक्के अंगीकृत कंपनी असलेल्या कोटक महिंद्र लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे अनोखेपण म्हणजे ती एकमेव बँकसमर्थित संपूर्ण भारतीय मालकीची आयुर्विमा कंपनी आहे आणि नजीकच्या काळातही भांडवलासाठी देशातून अथवा विदेशातून भागीदार मिळविण्याचे तिचे कोणतेही नियोजन नाही, असे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बालासुब्रमणियन आवर्जून सांगतात. ‘लोकसत्ता’ला त्यांनी दिलेल्या या मुलाखतीत कंपनीच्या व्यवसायवाढीबाबतचे त्यांचे आडाखे व योजनांबद्दल सांगतानाच, त्यांनी एकंदर विमा उद्योगातील बदलत्या प्रवाहांवर प्रकाशझोत टाकला.
* गेल्या काही महिन्यांत विमा क्षेत्राची नियंत्रक ‘इर्डा’ने अनेकांगी पावले टाकताना, कंपन्यांसाठी व्यवसायवाढीची उद्दिष्टेही आखून दिली आहेत, याकडे तुम्ही कसे पाहता?
भारतात विमा क्षेत्राचा सर्वदूर विस्तार फैलावत जावा यावर ‘इर्डा’च्या नवनियुक्त अध्यक्षांचा सुस्पष्ट भर दिसून येतो आणि तो स्वागतार्हच आहे. भारतात विमा क्षेत्राची व्याप्ती पाहिल्यास ती विकसित राष्ट्रांच्या तुलनेत खूपच मागासलेली आहे. अगदी थायलंड, कोरिया या आशियाई देशांच्या तुलनेतही आपण खूप मागे आहोत. भारतात विमा क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले होऊन २० वर्षे लोटली आहेत. पहिला टप्पा हा नव्याने आलेल्या कंपन्यांना या बाजारपेठेत स्थिरावण्याचा आणि त्यांचे सुयोग्य नियमन व सुरळीत कारभाराचा होता. येथून पुढे सुरू होणारा दुसरा टप्पा हा विकासाचा आहे. अर्थात ‘इर्डा’च्या नावातच नियमन आणि विकास असा दोन्हींचा उल्लेख आहे. त्यामुळे खरोखरच विकासपर्वाच्या दिशेने सुरुवात झाली असल्यास एक विमा कंपनी म्हणून ती बाब तक्रारीची असूच शकत नाही. २०४७ साली स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षांत ‘सर्वाना विम्याचे कवच’ या देशाच्या पंतप्रधानांनी हाक दिलेल्या उद्दिष्टाला साकारण्याची सुरुवात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत संकल्प सोडून व्हावी, यापेक्षा दुसरे चांगले औचित्य असू शकत नाही.
* आयुर्विमा कंपन्यांनी आरोग्य विमा उत्पादने विकण्याची परवानगी मागितली आहे, ‘इर्डा’कडून यासंबंधाने काय संकेत आहेत?
ही बाब सध्या केवळ चर्चेच्या पातळीवर आहे, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आयुर्विमा कंपन्यांना आरोग्य विमा योजना विकण्याला परवानगी मिळावी असा प्रस्ताव जरूर दिला आहे. हा प्रस्ताव देखील विमा संरक्षणाच्या व्याप्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्नांच्या आवश्यकतेतूनच पुढे आला आहे. आरोग्य विम्याचे कवच किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करोनासारख्या महासाथीच्या संकटात लोकांना पुरेपूर झाली आहे. तरीही आजही देशात जवळपास ७० ते ७५ टक्के रुग्णालयीन उपचार आणि खर्च हे कोणत्याही विमा संरक्षणाविना, स्वत:च्या पुंजीतून अर्थात ज्यांची ऐपत आहे त्यांनाच शक्य बनते. शिवाय आजवर फक्त आयुर्विमा योजनांची विक्री करीत असलेल्या विमा विक्रेत्याला त्या सोबतीने आरोग्य विमा योजनाही विकता आल्या तर ते त्याच्यासाठीही अतिरिक्त उत्पन्न ठरेल.
* करोनाकाळाने विमा उद्योगाला भरपूर उत्तेजन मिळवून दिले, आता त्या पश्चात त्याचा वृद्धीदर पुढील काळात कायम ठेवता येईल, असे वाटते काय?
माझ्या मते, सरासरी १५-१६ टक्के हा वाढीचा दर यापुढेही टिकवून ठेवता येणे माझ्या दृष्टीने कठीण दिसत नाही. यातही शुद्ध मुदत विमा हे सर्वात महत्त्वाचे कवच आहे, अशी शिकवण करोनाकाळाने आपल्याला दिली. घरातील कर्ता व्यक्ती अकस्मात जाण्याने कुटुंबाची होणारी आर्थिक परवड टाळण्याचे हा एक सर्वोत्तम आणि तुलनेने किफायतशीर मार्ग देखील आहे. त्यामुळे सध्याच्या विमा उद्योगाच्या एकंदरीत वाढीत, मुदत विम्यात दिसून येत असलेली लक्षणीय वाढ ही माझ्यामते सर्वाधिक आश्वासक गोष्ट आहे.
* कोटक लाइफचे वाढीचे उद्दिष्ट कसे आहे आणि ती कशी साध्य केली जाईल?
कोटक मिहद्र लाइफने सुरुवातीपासून एक प्रकारचे संतुलन कायम सांभाळले असून, वाढीची मात्राही संतुलित राहिली आहे. म्हणजे सरलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीचे प्रीमियमपोटी उत्पन्न सुमारे १३,००० कोटींचे होते, त्यापैकी जवळपास निम्मे हे नवीन व्यवसायाच्या प्रीमियमपोटी, तर निम्मे हे नूतनीकरण व्यवसायातून आले. नवीन व्यवसायातही व्यक्तिगत विमा आणि गट विमा यांची हिस्सेदारी जवळपास समसमान आहे. व्यक्तिगत विम्यातही, लाभाच्या (पार्टिसिपेटिंग) आणि लाभरहित (नॉन-पार्टिसिपेटिंग) विमा व्यवसायाची हिस्सेदारी प्रत्येकी सुमारे ३३ टक्क्यांच्या घरात, तर २७-२८ टक्के व्यवसाय हा बाजारसंलग्न ‘युलिप’ योजनांचा आणि उर्वरित ३-४ टक्के हा मुदत विम्याचा व्यवसाय आहे. एकूण नवीन व्यवसाय प्रीमियममध्ये ३० टक्के वा अधिक दराने वाढ साधण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यात मुदत विम्याची हिस्सेदारी दुपटीने वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. ग्राहकांच्या बदलत्या दृष्टिकोन आणि मानसिकतेला लक्षात घेतल्यास ते शक्यही आहे.
* अपेक्षित व्यवसाय वाढ कशी साध्य केली जाईल?
कोटक लाइफची देशभरात २५३ शाखा कार्यालये आणि मार्च २०२३ पर्यंत त्यात आणखी ४७ नवीन कार्यालयांची भर पडणार आहे. शिवाय तिचे एक लाखाहून अधिक विमा विक्रेत्यांचे जाळे फैलावले आहे. विमा विक्रेते आणि बँकअॅश्युरन्स या दोन्ही माध्यमातून जवळपास ५४ /४६ अशा संतुलित प्रमाणात कंपनीला व्यवसाय मिळत आला आहे, तो पुढेही मिळत राहील. शिवाय कंपनीने नवीन तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराची योजना बनविली आहे. एकूण विमा उद्योगाच्या तुलनेत कोटक लाइफच्या ऑनलाइन व्यवसाय वाढीचे प्रमाण सरस असून ते उत्तरोत्तर वाढत आहे. शिवाय कंपनी आपला डिजिटल व्यवसाय ‘बॉटम-अप’ पद्धतीने तयार करत आहे. डिजिटल परिसंस्थेचा वापर सर्वोत्कृष्ट ग्राहक अनुभूती, मशीन लर्निग व डेटा अॅनालिसिसद्वारे नावीन्यपूर्ण उत्पादनांची रचना व विकास यासाठी तसेच प्रक्रिया आणि ग्राहक सेवा गुणवत्ता उंचावण्यासाठीही तंत्रज्ञानाचा हिरिरीने वापर करून कंपनीने अपेक्षित परिणामही मिळविले आहेत.