भक्ती रसाळ
करसवलत आणि करमुक्त लाभाच्या प्रलोभनांना बळी पडून आणि याच दृष्टिकोनातून विम्याची आजही खरेदी होताना दिसते. विमा योजनांकडे गुंतवणूक पर्याय म्हणूनही पाहिले जाते. विम्याकडे पाहण्याची ही सदोष वृत्ती आहे, ती वेळीच दुरूस्त होणे गरजेचे..

करोना महासाथीतील भयगंडामुळे आयुर्विमा आणि आरोग्यविमा क्षेत्रात प्रचंड मागणी नोंदवली गेली. जीवनातील अकल्पित जोखमांवर विमा सुरक्षा कवच ही एकमेव पर्यायी व्यवस्था आहे. वैद्यकीय आणीबाणीत आरोग्य विमा आणि आयुर्विमा आर्थिक संरक्षण उपलब्ध करून देतो. याचबरोबर ग्राहकांचा मोठय़ा प्रमाणात आर्थिक मनस्ताप विम्याद्वारे सुसह्य होतो. हे अनुभवाने आलेले शहाणपण ग्राहकांच्या वाढत्या मागणीतून प्रकर्षांने लक्षात येते.
गेल्या आठवडय़ात विमा नियामक मंडळाने विमा वितरक (एजंट), विमा दलाल (ब्रोकर), ऑनलाइन विमा विपणन संकेतस्थळ यांनी विमा हप्ता पावतीद्वारे विम्याचे कमिशन ग्राहकांना सांगणे बंधनकारक व्हावे अशी कल्पना मांडली आहे. विमा क्षेत्रातील वाढती फसवणूक अशा उपाययोजनांनी आटोक्यात यावी अशी नियामक मंडळाची भूमिका आहे. विमा क्षेत्रातील अभूतपूर्व मागणी लक्षात घेतली तर आजही पारंपरिक विमा योजनांकडे ग्राहकांचे झुकते माप आढळते. विमा योजनांचा अंतर्भाव आर्थिक नियोजन प्रक्रियेत अपमृत्यू, अपघात, अशा घटनांद्वारे होणारे आर्थिक नुकसान विमित करणे यांकरिता होणे अपेक्षित आहे. आजही मोठय़ा प्रमाणात ग्राहक वर्ग विमा कवच संरक्षण योजना न मानता गुंतवणूक पर्याय, बचत योजना याच दृष्टिकोनातून विकत घेतो. ग्राहकवर्ग मुदत विम्याद्वारे कुटुंबाचे भविष्य सुरक्षित होते, हे ठाऊक असूनही विमा हप्ते हा खर्च असून विनामोबदला टर्म योजना फायदेशीर नाही असा अपसमज आजही बाळगून आहे. विमा क्षेत्रातील गैरव्यवहार, विक्रीतील फसवणूक यांचे मूळ कारण ग्राहकांची विमा योजनांकडे पाहण्याची सदोष वृत्ती आहे.

overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sensex gains , stock market rise , Sensex ,
मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!
Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
eps 95 pension scheme loksatta
ईपीएस-९५ वाढीव पेन्शन धोक्यात, खासगी कंपन्यांचे असहकार्य
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक

मनी बॅक, एन्डोमेन्ट, गॅरंटीड बेनिफिट योजनांमधील करसवलत आणि दीर्घ मुदतीत मिळणारे एकरकमी करमुक्त लाभ याचे संधान विविध तक्त्याद्वारे सादरीकरण करून ग्राहकांपुढे मांडले जाते. ग्राहक आजही करसवलत आणि करमुक्त लाभाच्या प्रलोभनांना बळी पडतो आहे.
टर्म विमा योजनांवरील विमा हप्तादेखील करोनाकाळानंतर दरवाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला परवडेलच असे नाही. हा हप्ता दीर्घ मुदतीत केवळ मृत्युपश्चात विमाराशी लाभार्थीला देत असल्याने विमा हप्ता भरणा करण्याला ग्राहकास फक्त खर्च याच भावनेचा अनुभव देतो. बाजारातील ‘रिटर्न ऑन प्रीमियम’ प्रकारातील मुदत विमा हप्त्यांवर लाभ देत नाही. ही वस्तुस्थिती आहे.

वरील परिस्थितीत ग्राहकाने गोंधळून न जाता केवळ स्वत:च्या कुटुंबाची आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेणे आवश्यक आहे. विमा योजनांची सर्वसमावेशक पुनर्बाधणी करणे गरजेचे आहे.

विमा पुनर्बाधणी
१. चालू योजनांचे अवलोकन : तरुण ग्राहकवर्ग सुरुवातीच्या कुटुंबाची जबाबदारी नसणाऱ्या जीवन टप्प्यात आर्थिक साक्षरतेअभावी विमा योजना गुंतवणूक पर्याय म्हणून निवडतो, अशा योजना किमान १० ते कमाल ३० वर्षे मुदतकाळ असलेल्या दिसतात. हाच वर्ग कुटुंबप्रमुख भूमिकेत आल्यावर विमा हप्त्याच्या आर्थिक बोज्याखाली येताना आढळतो. कोणतीही आर्थिक जबाबदारी नसताना मुदतविमा अत्यल्पदरात वय वर्षे ३५ वयोगटात आज उपलब्ध आहे. चालू पारंपरिक विमा योजनांवरील परताव्याचे योग्य आर्थिक सूत्रांच्या आधारे मूल्यमापन करून विमा हप्त्यांची पुनर्बाधणी केली तर वार्षिक बचतीत वाढ होऊ शकते.

२. रिडय़ूस पेडअप आणि सरेंडर : विमा योजना मुदतपूर्व बंद करणे हा महत्त्वाचा आर्थिक निर्णय आहे. ज्याप्रमाणे विमा योजना उघडताना घाई केली असता आर्थिक नुकसान उद्भवते. तीच शक्यता विमा योजना बंद करताना नाकारता येत नाही. कमीत कमी नुकसान साध्य करत टप्प्याटप्प्याने विमा योजना योग्य मार्गाने बंद करता येते.

३. विमा संरक्षण कवचाची योग्य गरज : टर्म योजनेचे दरपत्रक, विमा कंपन्यांची दावे देण्याची क्षमता, मागील वर्षांची कामगिरी. नावाजलेल्या कंपन्यांचे वार्षिक ठोकताळे, पुरस्कार, मानांकने इत्यादी माहिती एका क्षणात उपलब्ध होते. माहितीचा पूर ग्राहकांच्या मुठीत आहे. ग्राहकास माहिती आणि अभ्यासपूर्ण ज्ञान यांची डोळसपणे निवड करणे गरजेचे आहे. स्वत:च्या मासिक उत्पन्नानुसार, कुटुंबाच्या वार्षिक खर्चानुसार, जोडीदार आणि अपत्यांच्या आर्थिक गरजेनुसार अपेक्षित विमा कवच रक्कम ठरवणे गरजेचे आहे.

४. जीवन टप्प्यांनुसार फेरबदल : विमा संरक्षणाची गरज, तीव्रता जीवन टप्प्यांनुसार बदलते. ग्राहकांनी मुदत विमा नाकारताना महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवावा. तो म्हणजे, अपत्यांचे वय, गृहकर्जे, स्थावर मालमत्तेचे मूल्यांकन अशा सतत बदलत असणाऱ्या घटकांनुसार आयुर्विमा रकमेची गरज बदलत राहते. यामुळे मुदतविमा हप्ता काही काळाने आर्थिक अग्रक्रमानुसार कमी महत्त्वाचा देखील ठरू शकतो. त्यामुळे विमा योजनांचा जीवनक्रमानुसार, वार्षिक आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.

विमा नियामक मंडळ ग्राहकाभिमुख नियमावलीद्वारे विमा क्षेत्रातील गैरसोयींना आळा घालण्याचा प्रयत्न करत राहील. मात्र ग्राहकांचे अर्थभान आणि तारतम्यच प्रभावशाली अंकुश खरे तर ठरेल.

लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आणि व्यावसायिक विमा सल्लागार
bhakteerasal@gmail. Com

Story img Loader