मोइल लिमिटेड
” २६३.००
वार्षिक उच्चांक/नीचांक: ” २७२/ १८२.३५
दर्शनी मूल्य: “१ ०               
पी/ई: ९.४ पट
मूल्यांकन : २०१६ च्या उत्सर्जनात २० टक्के वाढ अपेक्षित आहे. जागतिक मंदी सरत असल्याची लक्षणे व देशात होत असलेल्या राजकीय सुधारणा लक्षात घेता येत्या दोन वर्षांत या समभागात १८ ते २० टक्के भांडवली वृद्धी मिळायला काहीच हरकत नाही.
मोईल लिमिटेड ही केंद्र सरकारच्या मालकीची मिनीरत्न दर्जा असलेली कंपनी आहे. ही कंपनी मँगनिज खनिजाची जगातील पाचव्या  व भारतातील पहिल्या क्रमांकाची उत्पादक आहे. या कंपनीच्या एकूण १० खाणी असून त्यापकी सहा महाराष्ट्रातील नागपूर व भंडारा जिल्’ाात व चार मध्य प्रदेशातील बालघाट जिल्’ाात आहेत. या १० खाणीपकी सात भूगर्भात तर तीन भूपृष्ठावर आहेत. कंपनीकडे ७३.५ मेट्रिक टन खनिज साठा आहे. कंपनीने खनिज उत्पादन क्षमता वाढीचे काम हाती घेतले आहे. या तीन प्रकल्पांपकी दोन प्रकल्प २०१३-१४ मध्ये पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. या क्षमता वाढीसाठी कंपनी एकूण ६०० कोटी खर्च प्रास्तावित असून एकूण ४०० कोटी यापूर्वीच खर्च झाले आहेत. या प्रकल्पामुळे खाण उत्पादन २०१४ मध्ये १.१५ तर २०१६ मध्ये १.२० मेट्रिक टन उत्पादन वाढ अपेक्षित आहे. मोईलने दोन उत्पादन प्रकल्प प्रस्तावित केले असून हे प्रकल्प केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. मोईल या प्रकल्पांच्या अंतर्गत ‘सेल’ व राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड यांच्यासाठी फेरो मँगनीजचे उत्पादन करणार करणार असून १०० टक्के उत्पादन हे दोन उत्पादक विकत घेणार आहेत. या प्रकल्पाची वार्षकि क्षमता १.६३ लाख टन असून ६०६ कोटी खर्चाच्या या प्रकल्पात मोईलचा हिस्सा ५० टक्के राहणार आहे. ही कंपनी आपल्या ताळेबंदात मोठी रोकड बाळगणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. ३१ मार्च २०१३ रोजी संपलेल्या आíथक वर्षांच्या ताळेबंदात कंपनीकडे २,२७७ कोटी रोख रक्कम व रोकडसदृश गुंतवणूक होती. सध्या हाती घेतलेले व प्रस्तावित केलेले प्रकल्प कंपनी स्वनिधीतील रोकड खर्चून राबविणार आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावरही कंपनीवर एका नव्या पशाचे कर्ज असणार नाही. सध्या मोईलने मूल्यवृद्धी करणाऱ्या उत्पादनाची क्षमता वाढविण्याचे धोरण राबविण्याचे निश्चित केले आहे. या धोरणाचा एक भाग म्हणून कंपनीने ‘सेल’ व राष्ट्रीय इस्पात निगमबरोबर संयुक्त प्रकल्प प्रास्तावित केले आहेत. या प्रकल्पा अंतर्गत छत्तीसगढ व आंध्र प्रदेशात दोन कारखाने उभारले जाणार आहेत. सेलसोबतच्या कारखान्याची वार्षकि क्षमता १.०६ लाख टन तर राष्ट्रीय इस्पात निगमसोबतच्या कारखान्याची वार्षकि क्षमता ५७,५०० टन प्रस्तावित आहे.
जागतिक मंदीमुळे गेल्या तीन वर्षांपासून मँगनिजच्या किंमतीत घसरण होत होती. वाढत असलेल्या पोलाद मागणीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून मँगनिजच्या किंमतीत सुधारणा दिसून येत आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. याचा परिणाम गेल्या दोन तिमाही निकालात कंपनीच्या नफ्यात वृद्धी दिसून आली. या वृद्धीचा आणखी एक पदर म्हणजे रुपयाच्या विनिमय दरात वेगाने झालेली घसरण. गेल्या आर्थिक वर्षांचे येत्या मे महिन्यात वित्तीय निष्कर्ष जाहीर होतील तेव्हा खनिज उत्पादनात जरी फारशी वाढ दिसून आली नसली तरी नफ्यात वाढ दिसून येणे अपेक्षित आहे. भारतात खनिज उत्सर्जनावर लादलेले र्निबध व मंदावलेले औद्योगिक उत्पादन यांचा संयुक्त परिणाम मोईलच्या समभागाच्या किंमतीवर होऊन गेल्या दोन वर्षांत मोईलच्या समभागाची किंमत निम्म्यावर आली आहे. म्हणूनच प्रचलित किंमतीचे २०१५ च्या उत्सर्जानाशी प्रमाण (पीई) फक्त ८.९४ पट पडते. मागील दोन वष्रे औद्योगिक उत्पादन निर्देशांकांचा महत्त्वाचा घटक असलेल्या खनिज व खनिकर्म निर्देशांकाची वाढ नकारत्मक राहिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवडय़ात गोव्यातील खाणींतून मर्यादित लोह खनिज काढण्यास दिलेली परवानगी व देशात अपेक्षित असलेला राजकीय बदलाचे परिणाम समभागाच्या किंमतीवर पडू लागलेले दिसत आहेत.
‘अर्थ वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध लेखांमध्ये चर्चिलेल्या समभागांमध्ये लेखकांची व्यक्तिगत गुंतवणूक अथवा अन्य स्वारस्य नाही. परंतु सदर लेखकांचा सल्ला घेणारे ग्राहक, निकटवर्तीयांची त्यात गुंतवणूक असण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.

Story img Loader