शालान्त परीक्षेत गाळलेल्या जागा भरा, जोडय़ा जुळवा या सारखे विकल्पात्मक लघोत्तरी तर संदर्भासहित स्पष्टीकरण, पाठय़पुस्तकाबाहेरील कवितेचे रसग्रहण असे दीघरेत्तरी प्रश्न असतात. वाचकांच्या प्राप्त झालेल्या बहुतांश ई-मेलमधून विचारलेले प्रश्न हे विकल्पात्मक पद्धतीचे आहेत. उदाहरण सांगायचे तर एका वाचकांनी त्यांना दरमहा १० हजार रुपये गुंतवायचे आहेत; ते पसे कुठे गुंतवू, असा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यांची सध्याची गुंतवणूक कुठे व कशी आहे. गुंतवणूकदाराच्या जबाबदाऱ्या काय आहेत, त्याने त्याची वित्तीय लक्ष्ये काय निश्चीत केली आहेत या माहिती शिवाय आíथक नियोजन करणे शक्य नसते. एखाद्या वाचकाकडून आíथक नियोजन करून घेण्याची इच्छा व्यक्त करणारी ई-मेल आल्यानंतर एक प्रश्नावली वाचकाला पाठविण्यात येते. वाचकाने या प्रश्नावलीत विचारलेली माहिती जमा करून पाठवणे अभिप्रेत आहे. ही सर्व माहिती जमा केल्या नंतरोकठअटएळफकउअ नावाच्या संगणक प्रणालीत या माहितीची नोंद केली जाते. या नोंदीवरून नंतर जो विश्लेषणात्मक अहवाल तयार होतो. या अहवालानुसार ज्याचे आíथक नियोजन करायचे आहे त्याला त्याच्या जोखीम सहन करण्याची क्षमतेनुसार अर्थ नियोजन सुचविले जाते. ज्यांना आपले आíथक नियोजन करून हवे आहे त्यांनी ही प्रश्नावली भरून देणे आवश्यक आहे.
सुनिता यादव यांचे अर्थनियोजन :
आजच्या या स्तंभाच्या मानकरी आहेत ठाण्याच्या सुनीता यादव. या नियोजनासाठी होणाऱ्या संभाषणात सुनिता या उत्तम इंग्रजीतून संवाद साधत होत्या. आडनांव यादव संवादासाठी इंग्रजीभाषेचा उपयोग आणि आíथक नियोजनासाठी मराठी वर्तमानपत्राचे सहाय्य हे कसे असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही मूळचे बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील. आजोबा स्वातंत्र्यपूर्व काळात नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रातील वास्तव्याला आजच्या घडीला १०० वष्रे उलटली असावीत. वडील महाराष्ट्र पोलीस दलात होते. माझा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचा. माझे व भावाचे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले. वडिलांची नोकरीत सारखी बदली होत असे. त्यामुळे शालेय शिक्षण महाराष्ट्रात बुलढाणा, नागपूर आणि बार्शी येथे महाविद्यालयीन शिक्षण झाले. परंतु मागील २२ वष्रे ठाण्यातील एका प्रसिद्ध शाळेत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शास्त्र व गणित हा विषय शिकवत असल्यामुळे संवादासाठी नकळत इंग्रजी भाषा वापरली जाते.’’
गेल्या पंधरा सोळा वर्षांपासून त्या ‘लोकसत्ता’च्या वाचक आहेत. मागील दोन वर्षांपासून वर्गात शिकविताना फळ्यावर लिहिण्यासाठीसाठी वापरावयाच्या खडूच्या धुळीचा त्रास होऊ लागला. मोठ्या आवाजात बोलणे अशक्य झाले. घशाच्या शिरा ताणताना त्रास होऊ लागला. म्हणून शेवटी २०१२ मध्ये स्वेच्छानिवृती घेतली. सध्या एका टयूशन्स क्लासमध्ये शिकवणी वर्ग घेतात. जवळचे नातेवाईक म्हणजे धाकटा भाऊ. जो मागील १५ वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुलगे आहेत. सुनीता यांची नोकरी ठाण्यात असल्यामुळे व भाऊ परदेशात जाणार असल्यामुळे वडिलांनी सेवानिवृत्तीनंतर कायम मुक्कामाला ठाण्याला पसंती दिली. त्यांच्या आईचे २००५ मध्ये व वडिलांचे २०११ मध्ये निधन झाले. त्यांच्या भावाने ठाणे येथे घेतलेल्या सदनिकेत सध्या त्या एकटय़ाच वास्तव्य करतात. त्यांच्या बचतीतून येणारे व्याजाचे उत्पन्न, वडिलांच्यापश्चात त्यांच्या नावे झालेल्या सदनिकेचे भाडे व त्या घेत असलेल्या शिकवणी वर्गातून येणारे उत्पन्न हे त्यांच्या उत्पन्नाचे तीन स्त्रोत आहेत.   
सुनिता यांचे अर्थ नियोजन करताना दोन गोष्टी जाणवल्या. सुनीता यांचे सध्याचे वय लक्षात घेता त्या अजून २० वष्रे कार्यक्षम राहू शकतील. त्यांची इच्छा असल्यास आणखी २० वष्रे त्या कमावू शकतील व सध्या त्यांची सर्व गुंतवणूक बँक ठेवींच्या स्वरूपात आहे. त्यांच्या बचत खात्याला नामनिर्देशन आहे पण प्रत्येक मुदत ठेवीला नामनिर्देशन नाही. त्यांनी आणीबाणीच्या प्रसंगात कामी येईल म्हणून आपला वारस ठरविणे अत्यंत आवश्यक आहे. नुकत्याच वाचलेल्या बातमीनुसार तब्बल ४५०० कोटींच्या ठेवी वेगवेगळ्या बँकात नामनिर्देशन अर्थात वारसाअभावी ना-हक्क पडून आहेत. योग्य ते नामनिर्देशन नसेल तर ठेवीधारकाच्या मृत्यूनंतर वारसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणून आजच बँकेत जाऊन नामनिर्देशानाचा अर्ज भरून बँकेकडे द्या व त्याची पोच घ्या. हीच गोष्ट भविष्यातील कुठल्याही गुंतवणुकीला लागू होते. म्हणून प्रत्येक गुंतवणुकीबरोबर नामनिर्देशन अग्रक्रमाने करा.
तुमच्या गुंतवणुकीवर सरासरी ८% परतावा असून करपश्चात परतावा ५.६७% आहे. म्युच्युअल फंडांचा लाभांश व दीर्घकालीन भांडवलवृद्धी करमुक्त असल्यामुळे सध्या बँक ठेवीच्या स्वरूपात असलेली गुंतवणूक म्युच्युअल फंडांच्या योजनेत गुंतवली तरी कर कार्यक्षमता वाढेल व करपश्चात परतावा सध्याच्या पातळीवरून १०% अधिक शक्य आहे.  
तुम्ही समभाग या गोष्टीचा गुंतवणूक म्हणून कधीच विचार केलेला नाही.  सध्याचा १०-१२% महागाईचा दर गृहित धरला तरी दरवर्षी तुमच्या गुंतवणुकीची ७% क्रयशक्ती कमी होते. ही क्रयशक्ती वाढविण्यासाठी त्यांनी पुढील १० वष्रे दरमहा २५ हजार रुपये डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडात गुंतवणूक करावी. फंडाची योग्य निवड करण्यासाठी या ‘अर्थ वृत्तान्त’ पुरवणीचे वाचन जे तुम्ही करीतच आहात ते यापुढेही सुरु ठेवावे.
सुनीता यादव यांना सल्ला
* सुनीता यांच्याकडे दर महिन्याच्या स्त्रोतामधून खर्च वजा जाता चार लाख रुपये शिल्लक राहतात. ही मोठी रक्कम पाहता त्यांना चांगल्या गुंतवणूक सल्लागाराची गरज आहे.
* पाच लाखांचा आरोग्य विमा सर्वप्रथम घ्यावा.
* तुमच्या प्रत्येक गुंतवणुकीला नामनिर्देशन करणे आवश्यक वाटते.
* सुनीता यांच्या समोर सध्याच्या व नवीन गुंतवणुकीची क्रयशक्ती (Purchasing Power) टिकविण्याचे आव्हान आहे.
* सुनीता यांची सर्व बचत बँकांच्या ठेवीत आहे. त्या ऐवजी त्यांनी स्थिर उत्पन्न योजनांमध्ये, रोखे गुंतवणूक असणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी.
* सध्या बँक ठेवींच्या स्वरूपात असलेली गुंतवणूक प्रत्येकी सहा लाखाप्रमाणे पाईनब्रिज इंडिया शॉर्टटर्म फंड, बिर्ला सनलाईफ डायनॅमिक बॉंड फंड, एचडीएफसी हाय इंटरेस्ट फंड, एसबीआय डायनॅमिक बॉंड फंड यामध्ये गुंतवावी
* सुनीता यांची गुंतवणूक बँक ठेवींमध्ये असल्यामुळे त्याचे उत्पन्न आयकराच्या ३०% दर कक्षेत आहे. रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युचल फंडात गुंतवणूक केलीत तर तुमची गुंतवणूक कर-कार्यक्षम होईल.
* पुढील पाच वष्रे दरमहा २५ हजार रुपये डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडात गुंतवणूक करावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा