जमिनीतील गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा निर्विवादपणे असामान्य आणि अतुलनीय असाच असतो. शहरी लोकांकरिता बिनशेती जमीन सांभाळणे फारसे कठीणही राहिलेली नाही. जमिनीची अस्सल कागदपत्रे तपासून एकदा खरेदीचा निर्णय घेतला आणि समाधान झाले की पुढील अनेक पिढय़ांकरिता आपण निश्चित राहू शकतो. त्यावर सेकंड होम म्हणजेच बंगला किंवा घर बांधले असेल तर त्याची किंमत आणखीनच वाढते.
पूर्वी स्वत:च्या जमिनीवर कुटुंबासाठी घर बांधण्याची पद्धत होती, ती आता नव्या अवतारात सेकंड होमच्या स्वरुपात पुन्हा पुढे आली आहे. एका जमान्यात सेकंड होम ही संकल्पना खरं तर उच्चभ्रू वर्गात सर्रास होती. भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण झाल्यानंतर नोकरदार वर्गाच्या पगाराचा स्तर एका नव्या पातळीवर गेला. लोकांकडे पसा जमू लागल्यानंतर स्थावर मालमत्ता उद्योगाचं लक्ष त्यावर पुन्हा एकदा केंद्रीत झाले आणि चाकरमान्यांकरिता आटोपशीर सेकंड होम किंवा प्लॉटचे पयार्य उपलब्ध होऊ लागले.
सेकंड होमच्या माध्यमातून मुंबई-पुणे-नाशिकच्या जवळ प्रकल्प आकारास येऊ लागले. स्वत:च्या नावावर जमिनीचा छोटा तुकडा असावा हे प्रगतीचं लक्षण आहे. जमीन नावावर असण्याचे अनंत फायदे आहेतच, पण  गुंतवणुकीचं सर्वाधिक परतावा देणारी जमिनीसारखी दुसरी गोष्ट नाही.
एकदा जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आपले नाव लिहिले गेले की त्याचा लँड रकॉर्ड सरकारी दप्तरात जातोच. जमिनीत गुंतवणुकीचे वैशिष्टय़च हे की, जे अन्य मालमत्तेत शक्य नाही ते म्हणजे जमिनीच्या प्रत्येक तुकडय़ाचे सर्व रेकॉर्ड सरकार कायम जपतं. आपले पूर्वज व वारस एकाच कागदावर अस्तित्वात असणारी गोष्ट म्हणजे आपला सातबाराचा उतारा. म्हणजे एकापरीने भूतकाळ ते भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा म्हणजे जमीन होय. त्यामुळेच जमीन ही पिढय़ांपिढय़ांची गुंतवणूक आहे. तुमच्या नावावर जमीन असेल तर  पाश्चिमात्य देशांचा व्हिसा मिळविण्यासाठी प्राधान्य मिळते असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. मायदेशात मालकीची जमिन आहे म्हणजे तुम्ही मायभूमीत परत येणार हे नक्की, असा परराष्ट्र विचार करते.    
मध्यमवर्गीय खरेदीदार हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा राहिला आहे. त्यामुळे अर्थातच त्यांच्या गरजांप्रमाणे विक्रीचे तंत्र बनवले गेले. मुंबई-पुण्यातील अनेक कुटुंबांमध्ये तर घरातील आई-वडिल व मुलगा-सुनबाई असे सर्वजण नोकरदार आहेत. त्यामुळे स्वत:च्या जमविलेल्या पशातून किंवा गृहकर्जाच्या माध्यमातून सेकंड होमचे स्वप्न साकार करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. मुंबईकरांकरिता ठाणे जिह्यातील मुरबाड परिसर, रायगड जिह्यातील नेरळ-कर्जत किंवा अगदी रत्नागिरी जिह्यातील दापोली येथील सेकंड होम प्रकल्प उत्तम पर्याय उपलब्ध करुन देणारे आहेत. पुण्याच्या लोकांना लोणावळा किंवा लवासासारखे प्रकल्प खुणावू लागले आहेत. नाशिकजवळचे कसारा-इगतपुरीदेखील लोकांचा कौल मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. आजकाल प्लॉट्सच्या माध्यमातून सेकंड होमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. प्लॉटसच्या योजनेतून ग्राहकाला सर्व कागदी सोपस्कार पूर्ण झालेली रेडीमेड जमीन किंवा थेट सेकंड होम देण्याचा कल खूप लोकप्रिय झाला आहे. त्यामध्ये ग्राहकाला जमिनीच्या व्यवहारासोबत येणारी सरकारी कागदपत्रांच्या पूर्ततेची कटकट सहज टाळता येते. मोठय़ा योजनेतून मिळणारे लाभ ग्राहकांना कमी जाचक वाटतात. कारण योजनेतून जमीन अतिशय सुरळीतपणे व मुख्य म्हणजे स्वतच्या सोयी-सुलभतेने घेता येते हा सर्वात मोठा फायदा ग्राहकांचा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
जमिनीत-सेकंड होममध्ये गुंतवणूक करण्याचे क्षेत्र भारतात तसे नवीनच आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात या क्षेत्राचा  चांगला जम बसत आहे. नवीन गुंतवणूक करण्याचा मानस असलेल्या ३५ ते ४५ वयोगटातील लोकांना हा पर्याय सर्वाधिक फायदेशीर आहे. कारण झालेला फायदा हयातीतच उपभोगण्याची सर्वाधिक संधी या वयोगटाला आहे. कारण असं म्हणतात की जमिनीच्या व्यवहारामध्ये एका पिढीने गंतवणूक केली की दुसरी-तिसरी पिढी ती उपभोगू शकते. जर चाळीशीत गुंतवणूक केली तर निवृत्तीचे सुखी जीवन आपण स्वत:च उपभोगू शकतो. बंपर प्रॉफिट देणारे विश्वसनीय अशा गुंतवणुकीचे माध्यम म्हणजे जमीन खरेदी-विक्री हेच निर्वविाद!    
लेखक ‘सेकंड होम’ उद्योगात गेली आठ वष्रे कार्यरत आहेत.
उणी बाजू  दक्षता
जमिनीत गुंतवणुकीचे वैशिष्टय़च हे की, जे अन्य मालमत्तेत शक्य नाही ते म्हणजे जमिनीच्या प्रत्येक तुकडय़ाचे सर्व रेकॉर्ड सरकार कायम जपत असते.
जमीन ही पिढय़ांपिढय़ांची गुंतवणूक म्हणून दीर्घावधीसाठी अतुलनीय परतावा देणारी आहे.
तुमच्या नावावर जमीन असेल तर  पाश्चिमात्य देशांचा व्हिसा मिळविण्यासाठी प्राधान्य मिळते
भारतात स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीच्या परताव्याचा वस्तुनिष्ठ मागोवा उपलब्ध नाही. शहरवार परताव्याच्या प्रमाणात बरीच तफावत शक्य आहे.
कर्ज काढून जमीन वा दुसऱ्या घरातील गुंतवणूक कदाचित जोखमेचीही ठरू शकते.
अन्य मालमत्ता वर्गाच्या तुलनेत या गुंतवणुकीत वैविध्य मिळत नाही, त्यामुळे जोखीम-मात्राही मोठी आहे.

गेल्या २० वर्षांत शेअर बाजारातील गुंतवणुकीवर साधारण १६.७% परतावा (लाभांश वगळता) मिळवून दिला आहे. या पाश्र्वभूमीवर जमिनीतील गुंतवणुकीतून दीर्घावधीत साधारण १६-१७% परताव्याचे गणित जुळते का ते तपासून घ्यावे.