आज ‘माझा पोर्टफोलियो’ स्तभांला एक वर्ष पूर्ण झालं. २०१२ हे वर्ष शेअर बाजारासाठी तितकेसे चांगले गेले नसले तरीही ज्या गुंतवणूकदारांनी उत्तम कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले असतील आणि मुख्य म्हणजे पडेल काळातही संयम दाखवला त्या गुतवणूकदारांनी नफा कमावला असेलच. ‘माझा पोर्टफोलियो’ लेखमालेचा मुख्य उद्देश ‘टिप्स’ देणे नव्हताच. मराठी वाचकांना शेअर बाजारात गुंतवणूक करताना कंपन्या कशा निवडाव्यात, शेअर बाजाराचा अभ्यास कसा करावा आणि गुंतवणुकीची गोडी लागावी असा तिहेरी हेतू त्यात होता. वाचकांचा प्रतिसाद पाहता हा हेतू बहुतांशी सफल झाला असे वाटते. नीट अभ्यास करून गुंतवणूक केली तर आपणही शेअर बाजारात चांगली कमाई करू शकतो असा विश्वास आता वाचकांना वाटत असेल अशी आशा आहे.
या स्तंभातून वर्षभरात एकंदर ४९ शेअर्स गुंतवणुकीसाठी सुचविले होते. सुचविलेल्या अनेक कंपन्या मिडकॅप किंवा स्मॉलकॅप आहेत आणि तरीही बहुतांशी शेअर्सनी चांगला फायदा करून दिला आहे. सुचविलेला प्रत्येकी एक शेअर खरेदी केला असेल तर तुमच्या ३६,७७८ रुपयांचे आज ४४,२८१ रुपये झाले असतील. म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीत २०.४०% वाढ झाली आहे. परंतु ही गुंतवणूक दर आठवड्याला केली असल्याने आपल्याला ‘आयआरआर’ पद्धत्तीने परतावा काढायल हवा. असा परतावा ३९% इतका येईल. इतर कुठल्याही गुंतवणुकीत इतका चांगला फायदा मिळणे कठीण आहे. शेजारच्या तक्त्यात सुचविलेल्या शेअर्सचा पुन्हा फिरून घेतलेला वेध या दृष्टीने पुरता बोलका आहे. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे आणि काही लेखांतून सांगितल्याप्रमाणे वाचकांचाही अभ्यास यात अपेक्षित होता. ज्या वाचकांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करून, खरेदीचे निकष तपासून योग्य वेळी शेअर्स खरेदी केले असतील आणि योग्य वेळी विकलेही असतील त्यांना फायदा झालाच असेल. केवळ या स्तंभातून सुचविलेलेच नव्हे तर तुम्ही स्वत: अभ्यास करून शेअर्स खरेदी/ विक्री केली असेल तर त्यातही किती फायदा किंवा तोटा झाला आहे तो तपासून पाहा. कंपनीचे फंडामेंटल्स चांगले असतील तर संयम दाखवून शेअर्स राखून ठेवा. आत्मविश्वासाने केली गेलेली आणि दीर्घकालीन स्वरूपाची गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरते हे तुमच्या लक्षात येईलच!
टीप : गुंतवणुकीच्या नफाक्षमतेच्या तौलनिक मापनाचे internal rate of return- IRR
(आयआरआर) हे उत्तम साधन आहे. एकापरीने याला वार्षिकीकृत परतावा दरही म्हणता येईल. हा दर इंटर्नल अर्थात अंतर्गत असल्याने त्यात चलनवाढ, कर, दलाली शुल्क, व्याजाचे दर वगैरे परताव्याला प्रभावित करणारे घटक गृहित धरलेले नाहीत. मात्र काल-परिमाणाला या मापनात महत्त्व आहे. म्हणजे तुम्हाला विशिष्ट गुंतवणूक काळात मिळालेला परतावा, वर्षांगणिक कसा वाढेल याचा त्यामुळे नेमका अंदाज येतो.
* २८ डिसेंबर २०१२ रोजी बंद झालेला शेअर्सचा भाव
पोर्टफोलियोतील सर्वोत्तम कामगिरीचे शेअर्स
पोर्टफोलियोतील वाईट कामगिरीचे शेअर्स
सुचविलेला शिफारस तेव्हाचा * सध्याचा लाभ/हानी लाभ/हानी काय वार्षिक परतावा
समभाग दिनांक बाजारभाव बाजारभाव (रु.) (%) करावे? ( कफफ %)
ग्रीव्हज् कॉटन २ जाने. ७५ ८० ५ ७ राखून ठेवा ७
बॉश लि. ९ जाने. ६९०० ९२७६ २३७६ ३४ नफा कमवा ३६
मॅरिको १६ जाने. १५१ २१९ ६८ ४५ राखून ठेवा ४८
ग्राइंडवेल नॉर्टन २३ जाने. २३८ २६८ ३० १३ खरेदी करा १४
हक्र्युलस हॉइस्ट (बोनसपश्चात) ३० जाने. १२३ १३५ १२ १० खरेदी करा ११
गेल (इं.) लि. ६ फेब्रु. ३९१ ३५२ -३९ -१० राखून ठेवा -११
आयएल अँड एफएस –
ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लि. १३ फेब्रु. २०६ १९९ -७ -३ राखून ठेवा -४
आयएफजीएल रिफ्रॅक्टरीज् २० फेब्रु. ४२ ४० -२ -५ विक्री करा -६
व्हिल्स इंडिया लि. २७ फेब्रु. ३७५ ८१७ ४४२ ११८ नफा कमवा १५४
गुजरात रिक्लेम अँड
रबर प्रॉडक्ट्स लि. ५ मार्च १४२२ १५४८ १२६ ९ राखून ठेवा ११
जेएमसी प्रोजेक्ट्स लि. १२ मार्च १२५ ११५ -१० -८ राखून ठेवा – १०
मुंजाल शोवा लि. १९ मार्च ७० ६७ -३ -४ राखून ठेवा -५
रिलॅक्सो फूटवेअर २६ मार्च ३०९ ७९० ४८१ १५६ नफा कमवा २४४
मॉईल लि. ९ एप्रिल २६२ २६७ ५ २ खरेदी करा ३
हैडलबर्ग सीमेंट १६ एप्रिल ३७ ५६ १९ ५१ राखून ठेवा ८१
काबरेरंडम युनिव्हर्सल लि. २३ एप्रिल १६७ १५२ -१५ -९ खरेदी करा -१३
ब्ल्यू डार्ट एक्स्प्रेस लि. ३० एप्रिल १९८७ २००५ १८ १ विक्री करा १
येस बँक लि. ७ मे ३५० ४६३ ११३ ३२ खरेदी करा ५४
एमसीएक्स लि. १४ मे १०४१ १४८३ ४४२ ४२ खरेदी करा ७६
अलकार्गो लॉजिस्टिक्स २१ मे ११४ १२७ १३ ११ राखून ठेवा २०
तळवळकर्स बेटर व्हॅल्यू
फिटनेस लि. २८ मे १६० १९६ ३६ २३ राखून ठेवा ४१
सुंदरम क्लेटन ४ जून १५५ ३४७ १९२ १२४ खरेदी करा ३१४
सन फार्मा लि. ११ जून ५८४ ७३८ १५४ २६ खरेदी करा ५३
सुचविलेला शिफारस तेव्हाचा * सध्याचा लाभ/हानी लाभ/हानी काय वार्षिक परतावा
समभाग दिनांक बाजारभाव बाजारभाव (रु.) (%) करावे? ( कफफ %)
झायडस वेलनेस लि. १८ जून ३८५ ४९५ ११० २९ खरेदी करा ६१
बजाज इलेक्ट्रिकल्स २५ जून १९१ २०८ १७ ९ खरेदी करा १८
अॅबट ९ जुलै १५०३ १४८४ -१९ -१ खरेदी करा -३
एमआरएफ १६ जुलै १०,१०६ १२,७११ २,६०५ २६ खरेदी करा ६६
केर्न इंडिया २३ जुलै ३२७ ३२० -७ -२ राखून ठेवा -५
क्रिसिल ३० जुलै ९२९ १०४४ ११५ १२ खरेदी करा ३३
सियाराम सिल्क ६ ऑगस्ट २९० ३०३ १३ ४ खरेदी करा १२
मोन्सॅन्टो १३ ऑगस्ट ६१४ ६४७ ३३ ५ राखून ठेवा १५
इंगरसॉल रॅण्ड २० ऑगस्ट ४५० ४९८ ४८ ११ खरेदी करा ३३
गुजरात स्टेट पेट्रोनेट २७ ऑगस्ट ७९ ७८ -१ -१ विक्री करा -४
पीव्हीआर ३ सप्टेंबर १८६ २७९ ९३ ५० खरेदी करा २५८
व्हीएसटी टिलर्स १० सप्टेंबर ४४३ ४०१ -४२ -९ खरेदी करा -२८
विजया बँक १७ सप्टेंबर ५० ६२ १२ २४ खरेदी करा ११६
डाबर २४ सप्टेंबर १२५ १२९ ४ ३ खरेदी करा १३
टाटा स्टील ८ ऑक्टोबर ३९० ४२८ ३८ १० खरेदी करा ५२
नवनीत पब्लिकेशन्स १५ ऑक्टोबर ५९ ६५ ६ १० खरेदी करा ६१
टाटा ग्लोबल बेव्हरेजेस २२ ऑक्टोबर १६३ १६१ -२ -१ खरेदी करा -७
टेक महिंद्र २९ ऑक्टोबर ९३४ ९६७ ३३ ४ खरेदी करा २४
इरॉस इंटरनॅशनल ५ नोव्हेंबर १६८ २०४ ३६ २१ खरेदी करा २८१
बालकृष्ण इंडस्ट्रीज १२ नोव्हेंबर २५६ २८९ ३६ १३ खरेदी करा १६२
बामर अॅण्ड लॉरी १९ नोव्हेंबर ६७९ ६५१ -२८ -४ खरेदी करा -३३
महिंद्र अॅण्ड महिंद्र १९ नोव्हेंबर ९५४ ९२४ -३० -३ खरेदी करा -३१
फॅग बेअरिंग्ज ३ डिसेंबर १६८५ १६८३ -२ ० खरेदी करा -२
नीलकमल १० डिसेंबर २५३ २३५ -१८ -७ खरेदी करा -१०२
जीआयसी हाऊसिंग १७ डिसेंबर १२४ १२६ २ २ खरेदी करा ७०
टेकप्रो सिस्टीम्स २४ डिसेंबर १५१ १४९ -२ -१ खरेदी करा -२
एकूण ३६,७७८ ४४,२८१ ७५०३ २०.४०% ३९%