गृहकर्ज ही काळाची गरज आहे, याबद्दल कुणाचेच दुमत असायचे कारण नाही. सध्या गृहवित्त कर्जवितरण करणाऱ्या मोजक्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये ‘जीआयसी हाऊसिंग फायनान्स’चा समावेश होतो.
कंपनीने ३० सप्टेंबर २०१२ साठी संपणाऱ्या तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली असून विक्री ३०.३२% वाढ साध्य करून १३६.५० कोटी रुपयांवर गेली आहे. तर नक्त नफा गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत १४९% वाढून २३.१५ कोटी रुपयांवर गेला आहे.
सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन धोरणानुसार आता ‘नॅशनल हाऊसिंग बँक’ आणि अन्य गृहवित्त कंपन्या कमी दराने परदेशातून कर्जे उभारू शकतील. (एक्सटर्नल कमर्शियल बोरोइंग) त्यामुळे गृहवित्त कंपन्या आता छोटी गृहकर्जे कमी व्याजदराने देऊ शकतील.
सध्या कनिष्ट मध्यम वर्गाकडून छोटय़ा गृहकर्जाना चांगली मागणी आहे. मुंबई, हैदराबाद, बंगळुरु, चेन्नई आदी शहरातून ‘लो कॉस्ट हाऊसिंग’च्या योजनांना भरपूर प्रतिसाद मिळत आहे.
येत्या सहामाहीत आणि पुढेदेखील या योजनांना चांगली मागणी राहील, अशी अपेक्षा आहे.
गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत २५% वाढ अपेक्षित असून सध्या १३० रुपयांना उपलब्ध असलेला हा शेअर मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.
जीआयसी हाऊसिंग फायनान्स रु. १२४.२०
मुख्य व्यवसाय : गृह कर्ज वितरण
मुख्य प्रवर्तक : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
भरणा झालेले भागभांडवल : रु. ५३.८५ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा : ४२.९५%
दर्शनी मूल्य : रु. १०
पुस्तकी मूल्य : रु. ९२.३०
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस): रु. १४.४
किंमत/उत्पन्न गुणोत्तर (पी/ई): ८ पट
वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु. १२९/६८
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2012 रोजी प्रकाशित
माझा पोर्टफोलियो : अर्थछत्र!
गृहकर्ज ही काळाची गरज आहे, याबद्दल कुणाचेच दुमत असायचे कारण नाही. सध्या गृहवित्त कर्जवितरण करणाऱ्या मोजक्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये ‘जीआयसी हाऊसिंग फायनान्स’चा समावेश होतो.

First published on: 16-12-2012 at 09:31 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My portfolio