अजय वाळिंबे
जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड ही जेएसडब्ल्यू समूहाच्या ऊर्जा व्यवसायातील कंपनी आहे. जेएसडब्ल्यू आणि तिच्या उपकंपन्या प्रामुख्याने कर्नाटक, महाराष्ट्र, नंद्याल (आंध्र प्रदेश) आणि सालबोनी (पश्चिम बंगाल) येथे वीजनिर्मिती करतात. कंपनीची एक उपकंपनी खाणकाम उद्योगात संयुक्त भागीदारीत कार्यरत असून दुसरी सहयोगी कंपनी टर्बाइनच्या उत्पादनात कार्यरत आहे. सध्या कंपनीचे संपूर्ण भारतात सहा वीज प्रकल्प सुरू असून एकूण वीजनिर्मिती क्षमता ४,५५९ मेगावॅट आहे. त्यापैकी १,३९१ मेगावॅट जलविद्युत, ३,१५८ मेगावॅट औष्णिक वीज, तर १० मेगावॅट सौर
ऊर्जेची निर्मितीही कंपनीकडून केली जाते.

कंपनीकडे तिच्या एकूण क्षमतेच्या ८१ टक्क्यांपर्यंत विजेसाठी दीर्घकालीन ऊर्जा खरेदी करार अर्थात ‘पीपीए’ आहेत, तर उर्वरित वीज अल्प मुदतीच्या व्यापारी आधारावर विकली जाते. दीर्घकालीन ‘पीपीए’अंतर्गत एकूण क्षमतेपैकी ९८ टक्के वीज ‘टेक अँड पे’ कराराच्या अंतर्गत आहे आणि उर्वरित २ टक्के निश्चित शुल्कावर आधारित आहे. सध्या, कंपनी तीन नवीन ऊर्जा प्रकल्पांवर काम करते आहे. सोलार एनर्जी कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे ८१० मेगावॅट मिश्रित पवन आणि सौर क्षमता प्रदान केली गेली आहे. प्रकल्पासाठी डिस्कॉम्सबरोबर ‘पीपीए’ कराराची प्रतीक्षा आहे. तसेच २४० मेगावॅटचा कुटेहर जलविद्युत प्रकल्प आणि हरियाणा डिस्कॉम्ससोबत ३५ वर्षांचा दीर्घकालीन ऊर्जा खरेदी करार अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Sharad Pawar on EVM machine
Sharad Pawar: “EVM सेट होऊ शकतं, याचं प्रेझेंटेशन…
Assembly Election 2024 Extra Rounds of Best Bus on Polling Day Low floor deck buses will run for disabled elderly voters
मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या; दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बस धावणार
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
book review Navi Pidhi Navya Vata book by Prakash Amte
पुढच्या पिढीची कर्तबगारी!
moody forecasts indian economy
मूडीजला ७.२ टक्के अर्थवेगाचा विश्वास

येत्या तीन वर्षांत स्थापित क्षमता ७.३ गिगावॅटवरून १० गिगावॅटपर्यंत वाढवण्याचे जेएसडब्ल्यूचे उद्दिष्ट आहे. ही क्षमता अक्षय्य ऊर्जेमार्फेत वाढवण्यात येईल. २०३० पर्यंत कंपनीच्या एकूण ऊर्जा क्षमतेपैकी ८५ टक्के क्षमता अक्षय्य ऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे. तसेच २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जनात ५० टक्के कपात करण्यासाठी आणि २०५० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन लक्ष्य गाठण्याचा कंपनीचा निर्धार आहे.

कंपनीचे जून २०२२ मध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीच्या आर्थिक कामगिरीचे निकाल जाहीर झाले आहेत. या कालावधीत कंपनीने ३,०२६ कोटी रुपयांच्या महसुलासह ४७१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील तिमाहीच्या तुलनेत आर्थिक कामगिरीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. कंपनीचा सरलेल्या जून तिमाहीत गेल्या वर्षांतील याच तिमाहीशी तुलना करता महसूल आणि नफा अनुक्रमे ७५ टक्के आणि १३४ टक्क्यांनी वधारला आहे. सध्या ३१५ रुपयांच्या आसपास व्यवहार करत असलेला हा समभाग मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून तुमच्या पोर्टफोलिओ असायला काहीच हरकत नाही.

सध्याची बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड
(बीएसई कोड – ५३३१४८)
शुक्रवारचा बंद भाव : रु. ३१९/-
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. ४०९/१८२

बाजार भांडवल : रु. ५२,५६८ कोटी
भरणा झालेले भागभांडवल : रु. १,६३९.७२ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७४.६९
परदेशी गुंतवणूकदार ५.२७
बँका/ म्यु. फंड/ सरकार १०.०८
इतर/ जनता ९.९६

संक्षिप्त विवरण
शेअर गट : लार्ज कॅप
प्रवर्तक : जेएसडब्ल्यू समूह
व्यवसाय क्षेत्र : वीजनिर्मिती
पुस्तकी मूल्य : रु. १०६
दर्शनी मूल्य : रु. १०/-
गतवर्षीचा लाभांश : २०%
शेअर शिफारशीचे निकष
प्रति समभाग उत्पन्न : १२.१ रु.
पी/ई गुणोत्तर : २६.५
समग्र पी/ई गुणोत्तर : २९.५
डेट इक्विटी गुणोत्तर : ०.५१
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ४.८५
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : १२.१
बीटा : १.१

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.