‘माझा पोर्टफोलिओ’ वाचकांची ही पहिली दिवाळी. या दिवाळीच्या मुहूर्तावर कुठले शेअर खरेदी करायचे हे मी सांगणार नाही. कारण आतापर्यंत सुचविलेले ४२ कंपन्यांचे शेअर (आजचा धरून ४३) हिच आपली खरेदी ज्या वाचकांनी सुचविलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना फायदा झालाच असेल. आणि अपवादाने नुकसान झाले असेल तरीही काही कालावधीत त्यांना फायदाच होईल, अशी आशा करुया. दिवाळीत ‘मुहूर्त सौदा’ हा अनेक जाणकार गुंतवणूकदारांचा आवडीचा सौदा असतो. या मुहूर्त सौद्यासाठी अनेक दूरचित्रवाहिन्यांवरून किंवा नियतकालिकांतून आणि ब्रोकरकडून शेअर खरेदीसाठी सुचविले जातात. मला वाटते, हे सर्व अहवाल आणि टीप्स तुम्ही जरुर अभ्यासावे. अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी हिच उत्तम संधी असते. आतापर्यंत सुचविलल्या शेअरपैकी ज्यात फायदा झाला असेल, त्यात नफा कमवून तुम्ही मुहूर्तावर एखादी नवीन स्क्रिप घेतली तर या स्तंभाचा खरा फायदा झाला, असे म्हणता येईल.  Happy Investing आणि दिवाळीच्या शुभेच्छा!
बालकृष्ण इंडस्ट्रीज्   रु. २५५.६५
मुख्य प्रवर्तक     :    सियाराम पोद्दार समूह
मुख्य व्यवसाय     :    टायर निर्मिती
भरणा झालेले भागभांडवल     :    रु. १९.३३ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा     :    ५४%
दर्शनी मूल्य     :    रु. २
पुस्तकी मूल्य     :    रु. ११.८०
प्रती समभाग उत्पन्न (ईपीएस)    :    २९.५
किंमत/उत्पन्न गुणोत्तर (पी/ई)    :    ८.८ पट
वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु. ३०३/१५१

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा